नवी दिल्ली, 21 डिसेंबर : देशात कोरोनाची दुसरी लाट येणार की काय (coronavirus live updates) अशी भीती तज्ज्ञांमध्ये व्यक्त केली जात असताना विदेशातून मात्र अजून एक गंभीर बातमी समोर आली आहे. ब्रिटन (UK) अर्थात युनायटेड किंग्डममध्ये कोरोनाच्या (corona) अधिक घातक रुपातलं उत्परिवर्तन (mutation) आढळलं आहे. याबाबत देशातही विविध प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. ब्रिटनमधून येणाी सगळी फ्लाइट्स बंद करा, अशी मागणी होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही आग्रही मागणी केली आहे.
आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले, "भारतातील नागरिकांनी घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. शासन पूर्णत: सावध आणि तयार आहे. मागच्या वर्षात आपण पाहिलं, की शासनानं अतिशय जास्त खबरदारी घेत जनतेला सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिलं. पुढेही काय केलं जावं याबाबत आम्ही जाणून आहोत. मला विचाराल, तर अस्वस्थ होण्याची काहीएक गरज नाही." त्यांचं हे विधान दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर आलं. याकेजरीवाल यांनी केंद्राला विनंती केली की, UK मधल्या नव्या कोरोनाच्या प्रकाराचा संसर्ग भारतात पसरू नये यासाठी युकेतून येणारी सगळी विमानं तातडीनं रोखून धरावीत. या विमानांना भारतात येण्यास बंदी घातली जावी. करोनाचं नवं म्युटेशन युकेमध्ये आढळून आलं आहे. त्याचा संसर्ग सध्याच्या कोरोना वायरसपेक्षाही अधिक वेगानं होतो आहे. त्यामुळे लवकरात लवकर केंद्रानं युकेतून येणाऱ्या विमानांना बंदी घालावी. केजरीवाल यांचं हे वक्तव्य इतर काही देशांनीही अशीच बंदीची पावलं उचलल्यावर आलं आहे.
New mutation of corona virus has emerged in UK, which is a super-spreader.
I urge central govt to ban all flights from UK immediately.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही यासंदर्भात ट्विट केलं आहे.
<blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr">The new strain of novel coronavirus emerging in the UK is a matter of great concern. GoI must take prompt action, prepare a contingency plan to contain the same & also immediately ban all flights from the UK & other European countries.<br>1/</p>— Ashok Gehlot (@ashokgehlot51) <a href="https://twitter.com/ashokgehlot51/status/1340907375151091712?ref_src=twsrc%5Etfw">December 21, 2020</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>
दरम्यान इटलीमध्येही याच नव्या कोरोनावायरसचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला असल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हा रुग्ण आणि त्याचा जोडीदार नुकतेच युकेहून परत आले होते. त्यांचं विमान रोमच्या विमानतळावर काही काळ थांबलं होतं असंही मंत्रालयानं सांगितलं. ब्रिटनच्या युरोपियन शेजाऱ्यांनी रविवारपासून युकेसाठी आपले दरवाजे बंद करणं सुरू केलं आहे. मिडल ईस्टच्या काही राष्ट्रांनीही हेच पाऊल उचललं आहे.