मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /स्वत:ला विविध कामात गुंतवून घेणं यासाठी आहे गरजेचं; या गंभीर आजाराचा धोका होतो कमी

स्वत:ला विविध कामात गुंतवून घेणं यासाठी आहे गरजेचं; या गंभीर आजाराचा धोका होतो कमी

Busyness will reduce The Risk of Dementia :  अनेक प्रकारच्या कामात व्यग्र असलेल्या वृद्ध व्यक्तींना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता कमी असते. डिमेंशिया (Dementia) हा मेंदूचा आजार आहे, ज्यामध्ये मेंदूची क्षमता (Brain capacity) सतत कमी होत जाते. मेंदूच्या संरचनेत बदल झाल्यामुळे हे घडते. हे बदल स्मरणशक्ती, विचार, वर्तन आणि भावनांवर परिणाम करतात.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : रिकामं डोकं सैतानाचं घर, असं आपल्याकडे म्हटले जाते. याचाच अर्थ आपण नेहमी कामात असू तर डिप्रेशन, चिंता (Tension) आणि चुकीचे विचार डोक्यात येत नाहीत. याविषयी कॅनडातील सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटीच्या (Simon Fraser University) संशोधकांनी त्यांच्या नवीन अभ्यासात सांगितले आहे की, अनेक प्रकारच्या कामात व्यग्र असलेल्या वृद्ध व्यक्तींना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता कमी असते. डिमेंशिया (Dementia) हा मेंदूचा आजार आहे, ज्यामध्ये मेंदूची क्षमता (Brain capacity) सतत कमी होत जाते. मेंदूच्या संरचनेत बदल झाल्यामुळे हे घडते. हे बदल स्मरणशक्ती, विचार, वर्तन आणि भावनांवर परिणाम करतात. संशोधकांना त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले की, तुम्ही कामात व्यग्र असाल तर स्मरणशक्ती अधिक मजबूत (memory impairment) होते. विशेषत: 65 ते 89 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये व्यायाम करण्याबरोबर नातेवाइकांच्या संपर्कात राहण्याने स्मरणशक्ती चांगली (Busyness will reduce The Risk of Dementia) राहते, असेही दिसून येते.

वाढत्या वयाबरोबर विविध प्रकारच्या गोष्टींमध्ये सहभागी होण्याचा अधिक सकारात्मक परिणाम दिसून येतो, असा निष्कर्षही या अभ्यासातून काढण्यात आला आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष अमेरिकन मेडिकल जर्नल एजिंगमध्ये प्रकाशित झाले आहेत.

अभ्यास कसा झाला?

या अभ्यासात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंग्स हेल्थ अँड रिटायरमेंट स्टडीद्वारे (एचआरएस) (National Institute on Aging) 65 ते 89 वयोगटातील 3,210 सहभागींचा डेटा समाविष्ट आहे. सहभागींना 33 प्रकारच्या कामांमधील सहभागाबद्दल विचारण्यात आले.

या क्रियाकलापांच्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी संशोधकांनी मशीन लर्निंग मॉडेल विकसित केले. या वेळी, स्वयंपाक करणे, पत्ते खेळणे, वाचन ते 20 मिनिटे जॉगिंग करणे किंवा कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांशी भेटणे जसे की पत्र, ईमेल, फोनवर संपर्कात राहणे किंवा थेट भेटणे यासारख्या क्रियांचा समावेश होता.

तज्ज्ञ काय म्हणतात

सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंटरएक्टिव्ह आर्ट्स अँड टेक्नॉलॉजी (SIAT) चे सहयोगी प्राध्यापक आणि या अभ्यासाचे सह-लेखक सिल्वेन मोरेनो म्हणाले की, आमच्या अभ्यासाचा निष्कर्ष असा आहे की, सक्रिय राहणे किंवा कामात व्यग्र असल्याने वापर केल्याने संज्ञानात्मक कमतरता कमी केली जाऊ शकते.

हे वाचा - Methi-Ajwain Water: मेथी-ओव्याचे पाणी हिवाळ्यात पिण्याचे इतके आहेत फायदे; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

ते पुढे म्हणाले की, शास्त्रज्ञांना खात्री पटली आहे की संज्ञानात्मक आरोग्यावर प्रभाव पाडणारा आनुवंशिकता हा मुख्य घटक आहे, परंतु आमचे निष्कर्ष याच्या उलट आहेत. तुमचे वय वाढत असताना, तुमची दैनंदिन कामकाजाची निवड आनुवंशिकी किंवा विद्यमान संज्ञानात्मक कौशल्यांपेक्षा अधिक महत्त्वाची असते.

अभ्यासात काय झाले

अभ्यासाचे निष्कर्ष वृद्धांच्या आरोग्य धोरणासाठी महत्त्वाचे ठरू शकतात, असे संशोधकांचे मत आहे. यामध्ये सामाजिक कार्याला चालना दिल्यास वृद्धांना मानसिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्यास मदत होऊ शकते. यामध्ये सामुदायिक बागकाम, कला वर्ग यासारख्या उपक्रमांचा समावेश असू शकतो.

हे वाचा - Reduce Belly Fat: सुटलेलं पोट म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण; हे घरगुती उपाय करून रहाल फिट

डिमेंशिया आणि वयोवृद्ध लोकांमध्ये मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे होणार्‍या इतर रोगांवर कोणताही इलाज नसल्यामुळे, प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, त्यांच्या संशोधनाच्या आधारे असे म्हणता येईल की सामाजिक दृष्टिकोनाची रणनीती अवलंबणे वृद्धांमधील मानसिक आरोग्य राखण्यासाठी आणि स्मृतिभ्रंश सारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी अधिक प्रभावी सिद्ध होईल.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips