हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी 'या' 7 पदार्थांचा आहारात समावेश कराच

हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी 'या' 7 पदार्थांचा आहारात समावेश कराच

निरोगी राहण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'या' फळांचा आणि भाज्यांचा समावेश तुम्ही रोजच्या आहारात करायलाच हवा.

  • Share this:

मुंबई, जून 21 : फळं आणि भाज्यांचा रोजच्या आहारात समावेश असणं किती आवश्यक आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. निरोगी राहण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सुदृढ शरीरासाठी पौष्टिक आहार घेणं फार आवश्यक आहे. फळं आणि भाज्यांचे दररोज सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतात. जीवनसत्त्व, प्रथिनं आणि खनिजांनी समृद्ध असलेल्या पालेभाज्या आपल्या आहारात समाविष्ट केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.

बाल्टीमोर कनवेनश्न सेंटरमधील न्युट्रिशन 2019 या मीटिंगमध्ये मांडल्या गेलेल्या अभ्यासानुसार, आरोग्याला पुरक अशी फळं आणि भाज्या खाल्याने ह्रदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि अशा गंभीर आजारांचा धोका टळू शकतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:ला निरोगी ठेवण्याकरीता तुमच्या आहारात पुढील फळं आणि भाज्यांचा समावेश नक्की करा.

(वाचा :मुलांना घरी एकटं सोडताना लक्षात ठेवा 'या' 6 गोष्टी)

भाज्यांमधले पोषक घटक रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. फळांमध्ये 90 ते 95 टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्त शुद्धीकरण होतं. फळं आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशीयम, अँटीऑक्सीडंट, मिनरल, कॅल्शियम असतात. अँटीऑक्सीडंट आणि फेनोलिक्स उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी, कोलेस्टेरॉलसाठी मदत करतात. ताजी फळ आणि भाज्या अन्नपचनासाठीही उपयुक्त असतात. त्यासाठी पुढील काही फळं आणि भाज्यांच्या समावेश तुम्ही आहारात नक्कीच करू शकता.

(वाचा :Life In लोकल- तिला पाहताच तो प्रेमात पडला आणि तिच्यासाठी तो तीच ट्रेन पकडू लागला)

बेरीज: बेरीजमध्ये भरपुर प्रमाणात अँटीऑक्सीडंट आढळतात. Anthocyanins सारखे अँटीऑक्सीडंट ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि प्रज्नवलन यांपासून बचाव करतात. याशिवाय ह्रदयाकरीता बेरीज अतिशय परिणामकारक आहेत.

ब्रोकोली: यात लुटीन हे अँटीऑक्सीडंट असतं. याशिवाय ब्रोकोलीमध्ये असणारे सी आणि ई अशी जीवनसत्वे, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि ह्रदयविकारांपासून दूर राहण्यास मदत करतात.

शतावरी: ज्या भाजांचे हिरवे कोंब भाजी म्हणून खातात त्याला शतावरी म्हणतात. यामध्ये असणारे बीटा कॅरोटीन आणि फायबर ह्रदयविकाराचा झटका आणि त्याच्या रक्तवाहिन्यांचा विकार अशा समस्यांपासून दूर ठेवतात.

(वाचा :रात्रीच्या जेवणात समाविष्ट करा 'हे' कमी कॅलरीयुक्त पदार्थ)

पालेभाज्या: जेव्हा शरीरातल्या लोह घटकाचं प्रमाण कमी होतं तेव्हा रक्ताची कमी प्रमाणात निर्मिती होते. पालेभाज्या याच लोह घटकाच्या निर्मिचीचं काम करतात. पालक, सोया, मेथी यामध्ये भरपूर लोह घटक असतात. पालेभाज्यांमध्ये लोह तत्त्वाबरोबरच विरघळणारं फायबर, मिनरल्स, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाला तुमच्यापासून दूर ठेवायचं असेल तर आहारात पालेभाज्यांचा समावेश तुम्ही करायलाच हवा.

टोमॅटो: टोमॅटोमध्ये लायकोपेने नावाचं अँटीऑक्सीडंट असतं. जे अनेक गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करतं. टोमॅटोमध्ये असणारं जीवनसत्व सी, अल्फा व बीटा कॅरोटीन तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतात.

गाजर: लाल, पिवळे आणि केशरी रंगाच्या भाज्या म्हणजे गाजर, रताळं आणि लाल भोपळी मिरची यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर व जीवनसत्वे असतात.

जवस:  यामध्ये ओमेगा 3 हे चरबीयुक्त आम्ल आणि फायबर असल्याने ह्रदयाला निरोगी ठेवतं.

SPECIAL REPORT: आता पाऊस पडला नाही तर भीषण दुष्काळ नर्डीचा घोट घेईल!

First published: June 24, 2019, 3:40 PM IST

ताज्या बातम्या