मेंदू तल्लख ठेवण्यासाठी करा हे व्यायाम आणि नियमत खा 'हे' 5 पदार्थ

मेंदू तल्लख ठेवण्यासाठी करा हे व्यायाम आणि नियमत खा 'हे' 5 पदार्थ

मेंदूची आकलन क्षमता वाढवण्यासाठी, बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी मेंदूला वेगळा खुराक देणं आवश्यक आहे आणि मेंदूसाठीसुद्धा वेगळा व्यायाम करायला हवा. काय आहे मेंदूचा व्यायाम आणि आहार?

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीरासोबत मानसिक आरोग्यदेखील सांभाळणं हे एक प्रकारचं आव्हान आहे. पण तुम्हाला आजच्या शर्यतीच्या युगात तग धरून टिकून राहण्यासाठी मानसिक आरोग्याला जास्तीत जास्त सांभाळणं गरजेचं आहे. थोडक्यात काय तर, आपण जे खातो त्यातील आवश्यक पौष्टिक घटकांमुळेच मेंदूला चालना मिळत असते. त्यानेच आपली वाढ होत असते. त्याशिवाय बदलत्या काळासोबत मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश आणि काही क्रियांचा समावेश करणे गरजेचे आहे. जाणून घ्या कोणते पदार्थ आणि काय केल्यानं  मेंदूला चालना मिळेल आणि बुद्धी तल्लख होईल. हे पदार्थ नियमितपणे आहारात असतील तर मानसिक आरोग्य सुरळीत राखण्यास मदत करतील.

अक्रोड आणि बदाम

अक्रोड किंवा walnut हा सुकामेवा नियमितपणे खावा. एक किंवा दोन अखंड अक्रोड खाल्ले तरी पुरेसं आहे. बदाम खाऊनही स्मरणशक्ती वाढते. चार बदाम आदल्या रात्री दुधात भिजत घालावेत आणि ते दुधासह सकाळी अनशापोटी चावून खावेत. यामुळे फायदा होऊ शकतो.

मासे

मांसाहारी असाल तर रेड मीटपेक्षा मासे खाणं कधीही चांगलं. मासे खाणं एकंदरीत मानसिक आरोग्यासाठी चांगलं आहे. स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. रावस, बांगडा या प्रकारच्या माश्यांमध्ये omega-3 fatty acids भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे मेंदू तल्लख राहतो.

(वाचा : जेवल्यानंतर चुकूनही करू नका 'या' 6 गोष्टी)

आठवड्यातून दोन वेळा हे मासे खाल्ल्याने अनेक मेंदूचे विकार दूर रहातात, शिवाय स्मरणशक्ती तीक्ष्ण रहाते.

मेंदूचा व्यायाम

आता तुम्ही म्हणाल मेंदूचा व्यायाम कसा करायचा. मेंदूला सतत चालना देण्यासाठी वेगवेगळे खेळ खेळावेत. सुडोकू, कोडी, बुद्धिबळ अशा प्रकारचे बैठे खेळ खेळावेत. कॅल्क्युलेटरचा उपयोग करण्याऐवजी स्वतः आकडेमोड करावी. याशिवाय चित्रकला, विणकाम शिकावी किंवा एखादी नवी भाषा शिकावी. मेंदू तरुण राहावा, मेंदू तल्लख राहावा, विचार चपळ राहावेत यासाठी असे मेंदूचे व्यायाम करावेत.

पौष्टिक आहार

पौष्टिक आहाराची व्याख्या म्हणजे रोजचं पोळी-भाजी, डाळ आणि भात एवढंच होत नाही. तर त्यामध्ये हिरव्या भाज्या, फळं, दूध, अंडी आणि ड्रायफ्रुट यांचादेखील आर्वजून समावेश झाला पाहिजे.

(हेही वाचा : सावधान! तुम्ही थर्मोकॉलच्या कपामध्ये चहा पिता का? जाणून घ्या काय आहेत गंभीर परिणाम)

फायबर, फॅट, खनिजं, व्हिटामिन यांनी भरपूर असलेल्या अन्न घेणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.

नियमित व्यायाम

पौष्टिक आहाराला जोड हवी असते ती व्यायामाची. व्यायाम तुम्हाला आजारांपासून दूर राहण्यास मदत करतं. त्याचसोबत निरोगी जीवनशैली देतं. त्याने मेंदूला चालनाही मिळते. मानसिक आरोग्य सुरळीत राहण्यास मदत होते.

पुरेशी झोप घेणे

दिवसभर दगदग केल्यावर शरीराला पुरेशी विश्रांती आणि झोपही मिळणं आवश्यक आहे. झोप व्यवस्थित नाही झाली की त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो. म्हणजे चांगली झोप हा आरोग्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. मेंदूला आवश्यक विश्रांती मिळाली की, त्याचं काम सुरळीत राहण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, शरीराला आवश्यक झोप किंवा विश्रांती न मिळाल्यास, आपण आवश्यक गोष्टी विसरायला लागतो. स्मरणशक्तीवर त्याचा थेट परिणाम होतो. त्याने नवीन गोष्टी लक्षात ठेवणंही अवघड होतं.

----------------------------------------------------------------------------

VIDEO: आझम खान यांच्याविरुद्ध स्मृती इराणी आक्रमक, संसदेत रुद्रावतार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 06:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading