दातांच्या प्रत्येक समस्येवर प्रभावी आहेत होमिओपॅथिक उपचार पण...

दातांच्या प्रत्येक समस्येवर प्रभावी आहेत होमिओपॅथिक उपचार पण...

होमिओपॅथिक औषधं शरीराला कोणतीही हानी पोहोचवू न देता आराम देतात.

  • Last Updated: Dec 2, 2020 07:36 AM IST
  • Share this:

दाताच्या (teeth) समस्या कधीकधी इतकी तीव्र असते की खाताना चघळणंही कठीण होतं. या कारणामुळे काही खाण्याचीदेखील इच्छा होत नाही. myupchar.com शी संबंधित डॉ. राजी अहसान यांच्या म्हणण्यानुसार दातदुखी आणि इतर समस्यांमुळे डॉक्टरांकडे जाणं हा एकच पर्याय असल्याचं दिसतं, कारण केवळ डॉक्टरांनाच दंत समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. दातदुखीच्या समस्येसाठी होमिओपॅथिक उपचार प्रभावी आहे. होमिओपॅथिक औषधं शरीराला कोणतीही हानी पोहोचवू न देता आराम देतात. होमिओपॅथिक दंत उपचार करण्यासाठी कोणती औषधं प्रभावी आहेत ते जाणून घ्या.

स्टेफिसिग्रीया संवेदनशीलता दूर करते

संवेदनशीलतेची समस्या बहुतेक लोकांना असतात. काहीही गोड, गरम किंवा थंड खाल्ल्यानंतर दातांत बर्‍याच ठिकाणी तीव्र संवेदना होते, जी सहनही होत नाही. अशा परिस्थितीत स्टेफिसिग्रीयासारख्या होमिओपॅथीची औषधं उपयुक्त आहेत. याशिवाय हे औषध हिरड्यांमधून रक्त येणं किंवा तोंडातून जास्त लाळ येण्याच्या समस्या देखील दूर करतं.

हिरड्यांना सूज, अर्निका आहे योग्य औषध

अर्निकासारख्या होमिओपॅथीची औषधं हिरड्यांच्या दुखण्यात उपयुक्त आहे. हे औषध दंत उपचारादरम्यान हिरड्या दुखण्यावरदेखील वापरलं जाऊ शकतं. दातदुखीच्या समस्येमध्ये केवळ प्रभावीच नाही तर इतर शारीरिक समस्यांसाठी देखील हे औषध घेतलं जाऊ शकतं.

हिरड्यांमध्ये पू जमा झाल्यास प्रभावी आहे सिलिसिया

बर्‍याच लोकांना हिरड्यांमध्ये वेदना जाणवतात, ज्यामुळे गालांवर आणि आजूबाजूच्या भागात सूज येते आणि खूप वेदना होत राहतात. होमिओपॅथिक औषध सिलिसिया यामध्ये फायदेशीर आहे. हे औषध दातदुखी कमी करण्यास आणि सूज कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.

प्लांटॅगोमुळे कमी होते दातदुखी

दातांशी संबंधित प्रत्येक प्रकारच्या वेदना दूर करण्यासाठी प्लांटॅगो एक होमिओपॅथी औषध आहे. एवढंच नव्हे तर दातांची संवेदनशीलता कमी करण्यासही याची मदत होते. बर्‍याच वेळा दातदुखीसह ही वेदना कानांवर देखील परिणाम करते, ज्यामुळे दातापासून कानापर्यंत वेदना सुरू होतात, अशा स्थितीत हे औषध आराम देऊ शकते.

मर्क सोल तोंडाचा दुर्गंध दूर करण्यास सहाय्यक

हे औषध हिरड्यांमधून रक्तस्त्राव, दातांचा सैलपणा आणि संवेदनशीलता यासारख्या सर्व समस्यांसाठी प्रभावी आहे. हेलिटोसिस म्हणजेच तोंडाच्या दुर्गंधाची समस्या दुरूस्त करण्यासाठी  देखील खूप फायदेशीर आहे.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

जर आधीच होमिओपॅथीद्वारे इतर कोणत्याही शारीरिक समस्येचा उपचार करत असाल तर तो उपचार पूर्ण झाल्यानंतरच इतर होमिओपॅथिक उपचार घ्या, अन्यथा त्याचा फायदा होणार नाही. याशिवाय होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच होमिओपॅथिक औषधं घ्या. सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही होमिओपॅथिक औषध वापरू नका.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख – दात दुखी: लक्षणे, कारणे, उपचार ...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीयमाहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेतस्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठीआरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 2, 2020, 7:36 AM IST

ताज्या बातम्या