मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Summer Tips: सनग्लासेस खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्यायची; कम्फर्टसोबतच डॅशिंग लुक दिसेल

Summer Tips: सनग्लासेस खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्यायची; कम्फर्टसोबतच डॅशिंग लुक दिसेल

सनग्लासेस खरेदी करताना काही गोष्टी ध्यानात ठेवून आपण आपली पर्सनॅलिटी आकर्षक बनवू शकतो, शिवाय आपल्या डोळ्यांना UVA आणि UVB किरणांपासूनही संरक्षण मिळू शकते.

सनग्लासेस खरेदी करताना काही गोष्टी ध्यानात ठेवून आपण आपली पर्सनॅलिटी आकर्षक बनवू शकतो, शिवाय आपल्या डोळ्यांना UVA आणि UVB किरणांपासूनही संरक्षण मिळू शकते.

सनग्लासेस खरेदी करताना काही गोष्टी ध्यानात ठेवून आपण आपली पर्सनॅलिटी आकर्षक बनवू शकतो, शिवाय आपल्या डोळ्यांना UVA आणि UVB किरणांपासूनही संरक्षण मिळू शकते.

    मुंबई, 04 जून : उन्हाळ्यात कडक उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून घराबाहेर पडताना टोपी, स्कार्फ, हातमोजे आणि सनस्क्रीन अशा काही गोष्टींचा वापर करणे ही एक मोठी गरज बनते. यापैकीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनग्लासेस, त्यामुळे केवळ सूर्यप्रकाश आणि धुळीपासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण होत नाही तर फॅशनमध्येही भर घालतो. मात्र, सनग्लासेस खरेदी करण्यापूर्वी, काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण योग्य सनग्लासेस निवडू शकता. सनग्लासेस खरेदी करताना काही गोष्टी ध्यानात ठेवून आपण आपली पर्सनॅलिटी आकर्षक बनवू शकतो, शिवाय आपल्या डोळ्यांना UVA आणि UVB किरणांपासूनही संरक्षण मिळू शकते. फ्रेमचा आकार बघा - सनग्लासेस खरेदी करताना आपण सर्वप्रथम लक्षात ठेवली पाहिजे ती गोष्ट म्हणजे फ्रेमचा आकार. सैल फ्रेमचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर वाईट परिणाम होतो, तर अधिक घट्ट फ्रेम तुम्हाला अस्वस्थ करू शकते. यासाठी फ्रेम योग्य पाहिजे. चेहऱ्याचा आकार - सनग्लासेस खरेदी करताना आपल्या चेहऱ्याचा आकारही लक्षात ठेवावा. आपण स्वतःसाठी असे सनग्लासेस निवडले पाहिजेत, जे आपल्या चेहऱ्याच्या आकाराला शोभतील. ज्यामुळे आपला चेहरा अधिक आकर्षक दिसण्यास मदत होईल. कधी- कधी एखाद्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही आकाराचा सनग्लासेस फुलतो, पण तोच गॉगल दुसऱ्या एखाद्याच्या चेहऱ्यावर वापरून पाहिल्यावर तो चांगला दिसत नाही. याचे कारण प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आकार वेगळा असतो. हे वाचा - पारले-जी बिस्कीट, तूप-लोणी खाऊनसुद्धा महिलेनं 40 KG वजन घटवलं; सांगितला हा उपाय फ्रेम साहित्य - सनग्लासेस खरेदी करताना फ्रेमचे मटेरियलही लक्षात घेतले पाहिजे. कारण, गॉगल्सच्या फ्रेमचे मटेरियल आपल्या कंम्पर्टसाठी खूप महत्त्वाचे असते. स्टील फ्रेम उन्हात तापू शकते आणि त्वचेवर व्रण दिसू शकतात. म्हणूनच आपण पॉली कार्बोनेट, प्लास्टिक किंवा नायलॉन टायटॅनियम फ्रेम निवडू शकता. हे वाचा - वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचा असा करा वापर; आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे लेन्स साहित्य - लेन्स मटेरियलचे अनेक पर्याय सनग्लासेसमध्येही सहज उपलब्ध आहेत. डोळ्यांच्या चांगल्या संरक्षणासाठी, आपल्या बजेटनुसार लेन्स निवडा ज्याद्वारे आपल्या डोळ्यांचे UVA आणि UVB किरणांपासून संरक्षण होते आणि डोळ्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत नाहीत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Summer, Summer hot

    पुढील बातम्या