मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वॉटर पार्कमध्ये जाण्याचा केलाय प्लॅन? या गोष्टींची काळजी घ्या म्हणजे कसलाच त्रास नाही होणार

वॉटर पार्कमध्ये जाण्याचा केलाय प्लॅन? या गोष्टींची काळजी घ्या म्हणजे कसलाच त्रास नाही होणार

कुटुंब आणि मित्रांसह वॉटर पार्कला जाणं अनेकांना आवडतं. मात्र, वॉटर पार्कमध्ये काही गोष्टींची काळजी घेतल्यास आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही, त्याविषयी जाणून घेऊया.

कुटुंब आणि मित्रांसह वॉटर पार्कला जाणं अनेकांना आवडतं. मात्र, वॉटर पार्कमध्ये काही गोष्टींची काळजी घेतल्यास आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही, त्याविषयी जाणून घेऊया.

कुटुंब आणि मित्रांसह वॉटर पार्कला जाणं अनेकांना आवडतं. मात्र, वॉटर पार्कमध्ये काही गोष्टींची काळजी घेतल्यास आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही, त्याविषयी जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : उन्हाळा असो किंवा हिवाळा मौजमजेसाठी म्हणून अनेकजण वॉटर पार्कमध्ये जाण्याचा बेत आखतात. या दरम्यान, कडक उन्हात जास्त वेळ पाण्यात राहिल्याने आपल्यासाठी आणि तुमच्या जवळच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे वॉटर पार्कमध्ये जाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कुटुंब आणि मित्रांसह वॉटर पार्कला जाणं अनेकांना आवडतं. मात्र, वॉटर पार्कमध्ये काही गोष्टींची काळजी घेतल्यास आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होणार नाही. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, वॉटर पार्कमध्ये जाण्यापूर्वी कोणत्या टिप्स पाळणे आवश्यक (Tips to follow if you are visiting water park) आहे.

सनस्क्रीन -

वॉटर पार्कमधील बहुतेक स्विमिंग पूल आणि फन एक्टिविटीज मोकळ्या जागेत होतात. ज्यामुळे आपले शरीर थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते. तासन्तास उन्हात राहिल्यामुळे तुमच्या त्वचेवर टॅनिंग किंवा सनबर्नची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे उन्हात राहण्यापूर्वी सनस्क्रीन लावल्याची खात्री करा.

योग्य आहार -

वॉटर पार्कमधील मौजमजेमध्ये खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. वॉटर पार्कमध्ये जाताना घरातून हलका नाश्ता आणि पाण्याच्या बाटल्या सोबत घ्यायला विसरू नका. तसेच, काही गोष्टी अधूनमधून थोड्या अंतराने खात राहा, जेणेकरून शरीरातील ऊर्जा पातळी कायम राहते.

नाश्ता करा -

वॉटर पार्कमध्ये जाण्यापूर्वी जास्त खाणे टाळा. वॉटर पार्कमध्ये पोहोचताच आपल्या जास्त अ‌ॅक्टिविटी सुरू होतात, पोट जास्त भरलेले असल्यामुळे उलट्या, पोटदुखी आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. म्हणून, वॉटर पार्कमध्ये जाण्यापूर्वी हलका नाश्ता करून घरातून निघा आणि नंतर खाण्यासाठी काही हलका नाश्ता सोबत घ्यायलाही विसरू नका.

हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार

इतरांचे टॉवेल चुकूनही वापरू नका -

वॉटर पार्कच्या मौजमजेमध्ये अनेक वेळा लोक मित्र किंवा जवळच्या व्यक्तींचे टॉवेल वापरतात. पण, असे करणे टाळले पाहिजे. यामुळे तुम्हाला त्वचा आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे वॉटर पार्क आणि पोहायला गेल्यानंतर फक्त स्वतःचा टॉवेल वापरा.

हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम

मुलांना हे समजावून सांगा -

वॉटर पार्कमध्ये जाण्यापूर्वी मुलांना एकत्र राहण्याचा सल्ला द्या. तसेच, त्यांना त्यांच्या वयानुसार योग्य ठिकाणी जाण्याची परवानगी द्या. याशिवाय वॉटर पार्कमध्ये मौजमजा करताना मुलांवर लक्ष ठेवा आणि त्यांना स्वत:पासून फार दूर राहू देऊ नका.

First published:

Tags: Summer, Summer season