आता केबीसीनं दुसऱ्या करोडपतीचा जो प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये मोहिताला एक कोटी रुपयाचा प्रश्न विचारला जातो. तेव्हा ती त्याचं योग्य उत्तर दिल्याचं दिसतं आहे. कारण अमिताभ बच्चन ती एक कोटी रुपये जिंकल्याची घोषणा करतात आणि त्याचा आनंदही तिच्या चेहऱ्यावर दिसून येतो. हे वाचा - अक्षय कुमारचा 'Laxmii' दोन दिवसातच झाला लीक, टेलिग्रामवर पायरेटेड कॉपी व्हायरल यानंतर अमिताभ बच्चन मोहिताला सात कोटी रुपयांचा प्रस्न विचारताना दिसतात. आता मोहिता या प्रश्नाचं उत्तर देऊन सात कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकणार की नाझियाप्रमाणे एक कोटी रुपये जिंकून खेळ सोडणार हे आता येणाऱ्या एपिसोडमध्येच दिसेल. हा एपिसोड 17 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. हे वाचा - राहुल वैद्य आणि दिशा परमारचा साखरपुडा आधीच झालाय? दिशाने केला हा खुलासा मोहितानं सात कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला तर ती खऱ्या अर्थाने KBC 12 ची विजेती ठरेल आणि इतिहास रचेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan