या देशात जास्त मुलांना जन्म दिला तर मिळतं 'सुवर्ण पदक'

या देशात जास्त मुलांना जन्म दिला तर मिळतं 'सुवर्ण पदक'

जगात असे अनेक देश आहेत ज्यांची लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढतेय की ती कमी करण्यासाठी कायदे लागू करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे असेही काही देश आहेत जिथली लोकसंख्या ही अत्यंत कमी आहे.

  • Share this:

या जगात असे अनेक देश आहेत ज्यांची लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढतेय की ती कमी करण्यासाठी कायदे लागू करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे असेही काही देश आहेत जिथली लोकसंख्या ही अत्यंत कमी आहे. अधिकाधिक मुलांना जन्म देण्यासाठी तिथली सरकार महिलांना पुरस्कारही देत आहे. आज याच विषयावर जाणून घेऊ की असा कोणता देश आहे जिथली सरकार महिलांना अधिकाधिक मुलं जन्माला घालण्यासाठी सुवर्ण पदक देत आहे.

कजाखस्तान हा एक असा देश आहे जिथे लोकसंख्या वाढण्याऐवजी कमी होत आहेत. यामुळे कजाखस्तानच्या सरकारने मोठ्या कुटुंबाला प्रोत्साहन देण्याचं ठरवलं आहे. इथल्या सरकारच्या मते, एका कुटुंबात जास्तीत जास्त मुलं असावीत. यामुळेच लोकसंख्या वाढीला हातभार लावणाऱ्या महिलांना सरकार 'हीरो मदर्स' हे पदक देतात.

जर एखाद्या महिलेने सहा मुलांना जन्म दिला तर तिला रौप्य पदक दिलं जातं. तर सात किंवा त्याहून जास्त मुलांना जन्म देणाऱ्या आईला सूवर्ण पदकाने गौरवलं जातं. एवढंच नाही तर पदक मिळणाऱ्या महिलेला आयुष्यभर मासिक भत्ताही मिळतो. तसेच त्या मुलांना सरकारी नोकरीत सवलतही मिळते.

मातांचा पदकांनी गौरविण्याचा आणि आर्थिक मदत करण्याची प्रथा सोवियत संघाच्या वेळेपासूनच सुरू झाली होती. 1944 मध्ये सोवियत संघाने 'मदर हिरोइन' हा पुरस्कार सुरू केला होता. हा पुरस्कार त्या कुटुंबाला दिला जायचा ज्यात 10 हून अधिक मुलं असतील. एवढ्या वर्षांनंतरही लोकसंख्या वाढवणं ही कजाखस्तान सरकारची प्राथमिकता आहे.

सेक्सविषयी बदलले लोकांचे विचार, पाहा नवीन Research काय म्हणतो!

विराट कोहलीचा हा आहे फिटनेस मंत्र, जाणून घ्या त्याचं Diet Plan

वाघिणीसाठी दोन सख्खे भाऊ भिडले, जंगलातील थरारक घटनेचा Viral Video

आता ब्रेकअप झाल्यावरही व्हा खूश, कारण त्याचेही आहेत अनोखे फायदे!

या सोप्या घरगुती उपायांनी कमी करा डोळ्यांखालची काळी वर्तुळं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Nov 5, 2019 06:47 PM IST

ताज्या बातम्या