सीमरच्या वडिलांचं तो लहान असतानाच निधन झालं होतं. त्याच्या आजी-आजोबांनीच त्याला सांभाळलं. दोन महिन्यांपूर्वी तेही गेले. समीरला आणखी एक चुलता आहे. मात्र, आजोबांची मालमत्ता देण्यास त्यांनी नकार दिला. अशा स्थितीत काय करावं? याची समीरला काहीच माहिती नाही.
कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.
भारतात वडिलोपार्जित मालमत्तेचे वाटप ही अत्यंत अवघड प्रक्रिया आहे. कदाचित त्यामुळेच देशातील न्यायालयातील बहुतांश खटले हे वडिलोपार्जित मालमत्तेशी म्हणजेच वडिलांच्या किंवा आजोबांच्या मालमत्तेशी संबंधित असतात. त्यांना सामोरे जाणे किती कठीण आहे हे प्रत्येकाला माहित आहे. कारण वर्षानुवर्षे या प्रकरणांबाबत खटले सुरूच राहतात आणि त्यावर तोडगा निघत नाही. मुलाच्या जन्मासह, तो त्याच्या वडिलांचा मालमत्तेचा हक्क बनतो. पण आजोबांच्या मालमत्तेचा मुद्दा असेल तर त्यात नातवाचा किंवा नातीचा किती अधिकार आहे? हे माहीत आहे का?
वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय?
वडील, आजोबा किंवा पणजोबा (आजोबांचे वडील) यांच्याकडून वारशाने मिळालेल्या मालमत्तेला वडिलोपार्जित मालमत्ता म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे तर, पुरुषांना गेल्या चार पिढ्यांपासून वारसाहक्काने संपत्ती मिळाली असेल, तर त्याला वडिलोपार्जित मालमत्ता म्हणतात. दुसरीकडे, वडिलोपार्जित संपत्तीवर कोणत्याही व्यक्तीचा हक्क जन्मानंतरच प्राप्त होतो. कोणतीही संपत्ती दोन प्रकारची असते. ज्यामध्ये पहिली वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि दुसरी स्व-कर्जित मालमत्ता आहे. पण त्याआधी आजोबांच्या संपत्तीत नातवाचा किंवा नातीचा किती अधिकार आहे हे जाणून घेऊया.
वाचा - मृत्यूपत्रावर समाधानी नाही? कोर्टात देऊ शकता आव्हान, फक्त ही कारणे हवीत
वडिलोपार्जित संपत्तीवर कोणाचा किती अधिकार आहे?
वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये भूखंडानुसार हक्क निश्चित केला जातो, म्हणजेच कोणत्याही व्यक्तीनुसार हक्क दिला जात नाही. तर जन्मानंतरच ठरवले जाते. पण जर पिढ्यानपिढ्याचा प्रश्न असेल तर हे सर्व आधीच ठरलेले असते. उदाहरण- समजा एका पिढीत मालमत्तेचे 5 भाग आहेत. आता त्या 5 भागांचे पुढच्या पिढीतही भाग असतील. म्हणजे त्या भागाची पुढील विभागणी केली जाईल. हे तेच भाग आहेत जे मागील पिढीला वारशाने मिळाले आहेत. आता एक भाग झाल्यानंतर पुढच्या पिढीलाही तो वारसा म्हणून मिळाला आहे.
मृत्यूपत्र न लिहिता वडील मेले तर...
मृत्युपत्र न लिहिता वडिलांचा मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत कायदेशीर वारसांना वडिलांच्या मालमत्तेत समान हक्क मिळेल. यात त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना समान अधिकार असतील, इतर कुणालाही नाही.
आजोबांच्या स्वअर्जित मालमत्तेवर कोणाचा अधिकार आहे?
वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये अर्थातच जन्मानंतरच हक्क मिळतो, पण आजोबांची संपत्ती स्वकष्टाची असेल तर ती वडिलोपार्जित नसते. त्यामुळे त्या मालमत्तेत नातवाला जन्मतःच हक्क असणार नाही किंवा त्यात हक्क मागता येणार नाही. पण आजोबांची इच्छा असेल तर ते ही मालमत्ता कोणत्याही व्यक्तीला देऊ शकतात.
वाचा - गिफ्ट मिळालेल्या मालमत्तेवर कोणी दावा सांगितला तर? या तरतुदी माहिती हव्यात
वडिलोपार्जित मालमत्तेत नातवंडांचा किती अधिकार आहे?
वास्तविक, वडिलोपार्जित मालमत्तेत नातू आणि नातीचा समान वाटा असतो. पण जर नातू आजोबांच्या नातीला मालमत्तेतील हिस्सा देण्यास नकार देत असेल. तर अशा स्थितीत नात गुन्हा दाखल करू शकते. पण लक्षात ठेवा की नातवाला आजोबांकडून वडिलांना मिळणाऱ्या मालमत्तेमध्येच वाटा मिळू शकतो. वडील हयात असतील तर कुणालाही वाटा मिळणार नाही. (कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.