मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

#कायद्याचंबोला : उपचारात हलगर्जीपणा झाल्यास कायद्याने शिकवा धडा; SC ने 6 कोटींची दिलीय भरपाई

#कायद्याचंबोला : उपचारात हलगर्जीपणा झाल्यास कायद्याने शिकवा धडा; SC ने 6 कोटींची दिलीय भरपाई

उपचारात हलगर्जीपणा झाल्यास कायद्याने शिकवा धडा

उपचारात हलगर्जीपणा झाल्यास कायद्याने शिकवा धडा

उपचारात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 304-अ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

वैद्यकीय उपचार ही आजच्या काळाची मूलभूत गरज आहे. लोक अजूनही डॉक्टरांना देवाच्या जागी मानतात. पण, काही वेळा असे दिसून येते की डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे चुकीचे ऑपरेशन केले जाते किंवा काही चुकीची औषधे दिली जातात, ज्यामुळे रुग्णाला कायमचे नुकसान होते. काही वेळा रुग्णांचा मृत्यूही होतो.

Kaydyach bola Legal

कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.


डॉक्टरांनी उपचारात निष्काळजीपणा केला आणि रुग्णाचा मृत्यू झाला किंवा त्याला गंभीर समस्या निर्माण झाली, तर कुटुंबीयांनी डॉक्टरांशी भांडण करण्याची गरज नाही. कायद्याच्या कक्षेत राहून अशा डॉक्टरांना धडा शिकवला जाऊ शकतो. तुम्ही डॉक्टर, हॉस्पिटल, नर्सिंग होम आणि आरोग्य केंद्रावर गुन्हा दाखल करू शकता.

फौजदारी आणि दिवाणी दोन्ही खटले दाखल करण्याचा पर्याय

फौजदारी खटला केल्यास डॉक्टरांना तुरुंगवासही होऊ शकतो. तुम्ही दिवाणी खटला दाखल केल्यास न्यायालय तुम्हाला भरीव भरपाई देऊ शकते. अशा वेळी पीडित पक्षाला जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी यासाठी न्यायालय प्रयत्न करते, जेणेकरून डॉक्टरांनी कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यामध्ये भीती निर्माण होऊ शकते.

बलराम प्रसाद विरुद्ध कुणाल साहा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पीडित कुणाल साहाला 6 कोटी आणि 8 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. कुणाल साहाची पत्नी अनुराधा साहाच्या उपचारात डॉक्टरांनी निष्काळजीपणा दाखवला, त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे उपचारात निष्काळजीपणा केल्याबद्दल कोलकाता येथील एएमआरआय हॉस्पिटलने पीडित कुणाल साहाला 6 टक्के व्याजासह 6 कोटी 8 लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय दिला होता.

कायदा काय म्हणतो?

उपचारात निष्काळजीपणा केल्याबद्दल डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा दाखल करायचा असेल, तर भारतीय दंड संहितेच्या कलम 304-A, 337 आणि 338 अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. या कलमांनुसार डॉक्टरला सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी दोन्ही शिक्षा होऊ शकते.

वाचा - ..तर पोटगी मिळणार नाही; लग्नासंबंधीच्या वादात मेंटेनन्स कसा ठरवला जातो?

रुग्णावर अत्यंत सावधगिरीने आणि काळजीपूर्वक उपचार करणे हे डॉक्टरांचे कायदेशीर कर्तव्य आहे. जर डॉक्टरने उपचारात निष्काळजीपणा दाखवला तर तो (डॉक्टर) फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही प्रकारे जबाबदार ठरतो. म्हणजे उपचारात हलगर्जीपणा केल्याबद्दल डॉक्टरांवर फौजदारी किंवा दिवाणी कारवाई होऊ शकते. याशिवाय ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक मंचात डॉक्टरवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

उपचारात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 304-A अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. कोर्टाला उपचारात निष्काळजीपणा केल्याबद्दल डॉक्टर दोषी आढळल्यास, त्याला दोन वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. वास्तविक, एखाद्या गुन्हेगारी प्रकरणात, mens rea म्हणजे म्हणजे गुन्हेगारी हेतू सिद्ध करणे फार महत्वाचे आहे.

दिवाणी कार्यवाही अधिक सोयीस्कर

फौजदारी कारवाईऐवजी दिवाणी कार्यवाही अधिक सोयीस्कर आहे आणि डॉक्टरांची दिवाणी दायित्व सिद्ध करणे खूप सोपे आहे. डॉक्टरांविरुद्ध तसेच रुग्णालय, आरोग्य केंद्र आणि नर्सिंग होम यांच्याविरुद्ध दिवाणी खटला दाखल केला जाऊ शकतो. याशिवाय ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक मंचात गुन्हा दाखल करून भरपाईची चांगली रक्कम मिळू शकते. अशा प्रकरणात न्यायालय मृत रुग्णाचे वय, शिक्षण आणि कमाईच्या आधारावर नुकसान भरपाईचा निर्णय घेते.

डॉक्टरांचा उपचारात निष्काळजीपणा होता की नाही हे कसे कळणार

रुग्णाची काळजी घेणे हे डॉक्टरांचे कायदेशीर कर्तव्य आहे. डॉक्टरांनी रुग्णाची काळजी घेण्याचे कर्तव्य पार पाडले नाही, तर त्याच्यावर उपचारात निष्काळजीपणाचा गुन्हा मानला जाईल. डॉक्टरांनी आपले कर्तव्य बजावले की नाही हे तीन मुद्द्यांवरून समजू शकते.

वाचा - पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार; कुठे मागावा न्याय? FIR नोंदवण्याची A टू Z माहिती

1. डॉक्टरांनी ज्या रुग्णाला उपचारासाठी दाखल केले आहे, तो त्या रुग्णावर उपचार करण्यास सक्षम आहे की नाही? म्हणजे त्या रुग्णावर उपचार करण्याचे व्यावसायिक कौशल्य डॉक्टरांकडे आहे की नाही? जर त्याच्याकडे व्यावसायिक कौशल्य नसेल आणि त्याने पैशाच्या लालसेने किंवा इतर कोणत्याही हेतूने रुग्णाला दाखल केले असेल, तर उपचारात निष्काळजीपणासाठी डॉक्टर जबाबदार असेल.

2. डॉक्टरांनी रुग्णावर त्याच्या आजारानुसार उपचार केले आहेत की नाही? म्हणजे रुग्णाला टीबी असेल तर डॉक्टरांनी फक्त टीबीचेच औषध द्यावे. तो क्षयरोगाच्या रुग्णाला कर्करोगाचे उपचार देऊ शकत नाही. तसे केल्यास त्याला उपचारात निष्काळजीपणाचा दोषी मानला जाईल.

3. डॉक्टर रुग्णावर अत्यंत प्रामाणिकपणे आणि काळजी घेऊन उपचार करत आहेत की नाही? डॉक्टरांनी अत्यंत सावधगिरीने रुग्णावर उपचार केले नाही तर उपचारात निष्काळजीपणासाठी त्याला जबाबदार धरले जाईल.(कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

First published:

Tags: Legal, Private hospitals