मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

#कायद्याचं बोला: ऑनलाईन मागवलेला TV रिप्लेस करण्यास कंपनीची चालढकल! पुण्याच्या तरुणीने एका कॉलने आणलं वठणीवर

#कायद्याचं बोला: ऑनलाईन मागवलेला TV रिप्लेस करण्यास कंपनीची चालढकल! पुण्याच्या तरुणीने एका कॉलने आणलं वठणीवर

ऑनलाईन मागवलेला TV रिप्लेस करण्यास कंपनीची चालढकल! पुण्याच्या तरुणीने एका कॉलने आणलं वठणीवर

ऑनलाईन मागवलेला TV रिप्लेस करण्यास कंपनीची चालढकल! पुण्याच्या तरुणीने एका कॉलने आणलं वठणीवर

ऑनलाईन मागवलेला टीव्ही डॅमेज निघाल्यानंतर कंपनीकडे तक्रार केली असता फक्त चालढकल होत होती. कायदेशीर अधिकाराचा वापर करत एक फोन केला अन् सात दिवसाच्या आत नवाकोरा टीव्ही घरी आला.

कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.

ऑनलाईन शॉपींगमुळे आता कुठलीही वस्तू तुम्ही घरपोच मागवता येते. ऑनलाईन शॉपींगमुळे गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी यात आर्थिक फसवणूक होण्याचंही प्रमाण वाढलं आहे. अनेकदा खराब वस्तूंची डिलीव्हरी दिली जाते. कंपनी चांगली असेल तर ते तुम्हाला वस्तू बदलून देतात. मात्र, काही कंपन्या ग्राहकांना अजिबात दाद देत नाही. अशावेळी अनेकांना काय करावं कळत नाही. अशीच घटना ऋतुजा सुपेकर या बारावीच्या विद्यार्थीनीसोबत घडली. त्यांनी मागवलेला ऑनलाईन टीव्ही खराब निघाला. त्यानंतर तब्बल 11 महिने आज करू, उद्या करू यातच गेली. अखेर तिन आपला ग्राहकाचा अधिकार वापरत फक्त एक कॉल केला अन् सात दिवसात टीव्ही घरपोच झाला. याबद्दल ऋतुजाने सांगितलं, की आम्हाला मोठ्या टीव्हीची हौस होती. यासाठी आम्ही पप्पांकडे हट्ट धरला. आम्ही बाजारात जाऊन मोठा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत होतो. मात्र, पप्पांनी मित्रांच्या मदतीने अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपींग प्लटफॉर्मवरुन TCL या कंपनीचा अँड्रॉइड स्मार्ट एलईडी (55 इचं) टीव्ही ऑडर केला. ज्याची किंमत 31999 रुपये इतकी होती. ऑर्डरनंतर अवघ्या पाच दिवसांत टीव्ही घरपोच झाला. मात्र, त्यावेळी नेमकं घराचं नुतनीकरण सुरू होतं. त्यामुळे टिव्ही फक्त उघडून व्यवस्थित आहे का? इतकाच चेक केला. घरातील सर्व आवराआवर झाल्यानंतर जवळपास 20 दिवसांनी टीव्ही भिंतीवर इन्स्टॉल केला. प्लगइन केल्यानंतर टीव्ही चालू केल्यावर टीव्हीचा अर्धा स्क्रीन सुरुच होत नव्हता. त्यानंतर तात्काळ आम्ही अ‍ॅमेझॉनवर रिटर्न पॉलिसी चेक केली. मात्र, रिटर्न पॉलिसीचा अवधी संपला होता. मग आम्ही अ‍ॅमेझॉनशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही फक्त विक्रेता आणि ग्राहक यांना प्लॅटफॉर्म देतो. त्यामुळे तुम्हाला संबंधित कंपनीशी संपर्क साधावा लागेल. त्यावर आम्ही टीसीएल कंपनीच्या हेल्पलाईनशी संपर्क केला. सोबत त्यांच्या मेल आयडीवरही तक्रार दाखल केली. त्यावर कंपनीने सांगितले की 7 दिवसांत आमचा टेक्नीशीयन येईल. वाचा - खात्यातून 300 रुपये झाले वजा! तरुणाने RBI नियमांच्या मदतीने कसे मिळवले 9600? कंपनीने सांगितल्याप्रमाणे सात दिवसात त्यांच्या टेक्नीशीयनने घरी येऊन टीव्ही चेक केला. तपासणीनंतर टीव्हीचा पॅनल गेला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर कंपनीने काहीच प्रोसेस केली नाही. यामध्ये जवळपास एक ते दोन महिन्याचा कालावधी गेला. मी कंपनीला पुन्हा संपर्क केला. त्यांनी पुन्हा तेच उत्तर दिलं, त्यानुसार पुन्हा त्यांचा माणूस येऊन टीव्ही चेक करुन केला. त्यानेही पॅनल गेल्याचं सांगितलं. मात्र, पुढे काहीच झालं नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये 9 ते 10 महिने उलटून गेले होते. घरच्यांनी तर आशाच सोडून दिली होती. पण, मला कुठंतरी हे खटकत होतं. आपलं 32 हजार रुपयांचं आर्थिक नुकसान का करुन घ्यायचं? ज्यात आपली काहीच चूक नाही. त्या काळातच माझी मावशी एलएलबी करत होती. मी तिच्याशी संपर्क साधला, तिला सर्व घडलेला प्रकार सांगितला, यावर काही होईल का? असं विचारलं. त्यावर तिने मला ग्राहक मंचाचा हेल्पलाईन नंबर दिला. मग मी त्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क केला, त्यांनी माझी तक्रार कॅालवरच नोंदवून घेतली. हेल्पलाईन नंबरवर तक्रार केल्यानंतर सात दिवसाच्या आत मला त्या कंपनीचा स्वतःहून कॅाल आला. जे गेले काही महिने माझ्या कॉलला उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यांनी सांगितल की, सात दिवसात आमचा माणूस येईल. त्याप्रमाणे तो आला आणि टीव्ही चेक करुन गेला. त्यानंतर कंपनीकडून फोन आला की तुम्हाला टीव्ही बदलून मिळेल. घडलंही अगदी तसच. सात दिवसाच्या आत नवाकोरा टीव्ही आमच्या घरपोच झाला. जे कित्येक मेल आणि फोन करुन झालं नाही. ते फक्त ग्राहक मंचाच्या एका हेल्पलाईन नंबरमुळे घडलं, याचा मला आनंद झाला. तुमच्या सोबतही असं घडल्यास कुठे आणि कशी करावी तक्रार?
  • सर्वप्रथम ज्या कंपनीची वस्तू किंवा सेवा घेतली असेल त्या कंपनीकडे लेखी, ई-मेल किंवा पत्राद्वारे तक्रार करू शकता.
  • कंपनीने दखल घेतली नाही तर 8130009809 या क्रमांकावर एसएमएस करून तक्रार करू शकता. एसएमएस व्यतिरिक्त, टोल फ्री ग्राहक हेल्पलाइन नंबर 1800-11-4000 किंवा 1915 वर कॉल करू शकता. येथे तुम्हाला संभाव्य उपाय किंवा पुढे काय करायचे आहे, ही माहिती दिली जाईल.
  • तुम्ही http://consumerhelpline.gov.in/ या पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. येथे तुम्ही तुमच्या तक्रारीची माहिती, कंपनीचे नाव आणि विवाद संबंधित कागदपत्रे देखील शेअर करू शकता.
  • येथेही तुमच्या तक्रारीचे निवारण झाले नाही तर तुम्ही ग्राहक मंचाकडे धाव घेऊ शकता.
  • NCH ​​आणि UMANG या दोन्ही मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता. (कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)
Published by:Rahul Punde
First published:

Tags: Legal, Online fraud, Online shopping

पुढील बातम्या