मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

#कायद्याचंबोला : नावात काय आहे? नसेल आवडत नाव तर लगेच करा अर्ज; फीसह सर्व प्रक्रिया

#कायद्याचंबोला : नावात काय आहे? नसेल आवडत नाव तर लगेच करा अर्ज; फीसह सर्व प्रक्रिया

नाव ठेवणे जेवढं सुलभ आहे, तेवढच नाव बदलण्याची प्रक्रिया अवघड आहे.

नाव ठेवणे जेवढं सुलभ आहे, तेवढच नाव बदलण्याची प्रक्रिया अवघड आहे.

नाव ठेवणे जेवढं सुलभ आहे, तेवढच नाव बदलण्याची प्रक्रिया अवघड आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

पदवीच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या दादासाहेब याने एक दिवस तावातावाने मला फोन केला. सुजाता मॅडम मला माझं नाव बदलायचं आहे, काय करावं लागेल? अरे पण का बदलायचं आहे? मला आवडत नाही. का? सर्व मुली मला दादा म्हणून हाक मारतात. यावर मी माझं हसू आवरत म्हटलं. मग त्यात वाईट काय आहे? वाईट काही नाही. पण, मला बदलायचं आहे. बरं कॉलेज सुटल्यावर ऑफिसला ये आपण सविस्तर बोलुयात. दादाला तर मी समाजावलं. पण खरच नाव बदलायचं असेल तर काय करावं लागतं? हे माहीत असणे आवश्यक आहे.

Kaydyach bola Legal

कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.


इंग्रजी नाटककार विल्यम शेक्सपियर याचे 'नावात काय आहे?' हे वाक्य जगभरात प्रसिद्ध आहे. तुम्ही देखील कधीतरी हे वाचले किंवा ऐकले असेलच. पण, नावात सगळंकाही आहे, हेही तितकेच खरं आहे. प्रत्येकाची ओळख ही त्याच्या नावानेच तर होते. आपण नावानेच कोणाशीही संभाषण सुरू करतो. वास्तविक, आपल्याकडे बहुतेक लोकांना दोनतीन तरी नावं असतातच. एक जे अधिकृतपणे ठेवलेलं आहे. तर दुसरं नाव कुटुंबातील सदस्यांकडून प्रेम आणि आपुलकीने ठेवले जाते. कधी कधी काही कागदपत्रांमध्ये वेगवेगळी नावे असतात. अशा परिस्थितीत आपल्याला नाव बदलणे अपरिहार्य होते. तर काही लोकांना आपलं नाव आवडत नसल्यानेही बदलण्याची इच्छा असते.

भारतात नाव बदलण्यासाठी या तीन प्रक्रिया अनिवार्य आहेत. त्याशिवाय तुम्ही नाव बदलू शकत नाही. ती एक लांब प्रक्रिया आहे. यामध्ये नाव बदलण्यासाठी प्रतिज्ञापत्र तयार करणे, नाव बदलण्याची घोषणा वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे आणि नाव बदलाबाबत भारताच्या राजपत्रात अधिसूचना प्रकाशित करावी लागते.

शपथपत्र

नाव बदलण्यासाठी प्रथम तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. यासाठी तुम्हाला नोटरीशी संपर्क साधावा लागेल. यानंतर, नोटरी आवश्यक स्टॅम्प पेपरवर नाव बदलण्यासाठी प्रतिज्ञापत्र तयार करेल. त्यावर तुम्ही तुमचे सध्याचे नाव आणि तुम्ही अर्ज करत असलेले नवीन नाव लिहावे. यासोबतच सध्याचा पत्ताही आवश्यक आहे. यासोबतच नाव बदलण्याचे कारणही सांगावे लागणार आहे.

वाचा - ..तर पोटगी मिळणार नाही; लग्नासंबंधीच्या वादात मेंटेनन्स कसा ठरवला जातो?

प्रतिज्ञापत्र साध्या स्टॅम्प पेपरवर छापल्यानंतर त्यावर दोन साक्षीदारांची स्वाक्षरी असावी. कायदेशीर प्रक्रियेवर राजपत्रित अधिकारी दर्जाच्या दोन व्यक्तींची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. तुमच्या स्वाक्षरीसोबत त्यांचा शिक्का असल्याची खात्री करा. प्रतिज्ञापत्र तुमचे जुने आणि नवीन नाव दाखवते. पूर्ण नाव, आडनाव किंवा फक्त काही अक्षरे बदलण्यासाठी शपथपत्र वापरले जाऊ शकते. एखाद्या अनिवासी भारतीयाला त्याचे नाव बदलायचे असल्यास, त्याच्याकडे भारतीय उच्चायुक्त कार्यालय किंवा भारतीय दूतावासाने रीतसर स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र असणे आवश्यक आहे.

वर्तमानपत्रात जाहिरात

जर तुम्ही प्रतिज्ञापत्र केले असेल तर तुम्हाला स्थानिक वृत्तपत्रात अधिसूचना प्रकाशित करावी लागेल. यामध्ये तुम्ही तुमचे नाव बदलल्याचे सांगावे लागेल. यासाठी तुम्हाला दोन वृत्तपत्रे निवडावी लागतील, एक राज्याच्या अधिकृत भाषेत प्रकाशित होणारे आणि दुसरे इंग्रजी दैनिक वृत्तपत्र. नोटिफिकेशनमध्ये तुमचे नवीन नाव, जुने नाव, जन्मतारीख आणि सध्याचा पत्ता असणे आवश्यक आहे.

अर्ज

नाव बदलण्याच्या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा आणि अंतिम दस्तऐवज म्हणजे अर्ज. असा अर्ज कोणत्याही व्यक्तीला प्रकाशन विभागाच्या वेबसाइटवरून मिळू शकतो. या अर्जावर प्रौढ आणि अल्पवयीन दोघांसाठी स्वतंत्रपणे प्रक्रिया केली जाते. जर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीचे नाव बदलायचे असेल, तर त्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने त्याच्या पालकाकडून सर्व कार्यवाही केली जाईल. अर्ज वेबसाइटवरून डाउनलोड केल्यानंतर तो भरावा. अशा अर्जावर दोन साक्षीदारांची स्वाक्षरी आवश्यक असते.

वाचा - #कायद्याचंबोला : गिफ्ट मिळालेल्या मालमत्तेवर कोणी दावा सांगितला तर? या तरतुदी माहिती हव्यात

कुठे जमा करायचे

राजपत्र अधिसूचनेसाठी नाव बदल अर्ज थेट प्रकाशन विभाग, दिल्लीच्या कार्यालयात सादर केला जातो. हा अर्ज पोस्टाद्वारे देखील प्रकाशन विभागाकडे पाठविला जाऊ शकतो. हा अर्ज केवळ प्रकाशन विभागाकडे गेला पाहिजे. कारण नाव बदलाची राजपत्र अधिसूचना या विभागाकडून केली जाते.

किती खर्च येतो?

नाव बदलण्यासाठी साधरण फी जमा करावी लागते. त्यानंतरच राजपत्र अधिसूचना जारी केली जाते. अशा कोणत्याही अर्जाची फी अकराशे रुपये आहे. हे शुल्क प्रकाशन विभागाच्या कार्यालयात जमा केले जाते. या शुल्काची पावती अर्जासोबत जोडली जाते.

राजपत्र अधिसूचना

शेवटी, तुम्हाला तुमच्या बदललेल्या नावाची माहिती राजपत्रातील अधिसूचनेत प्रकाशित करावी लागेल. नाव बदल राजपत्र अधिसूचना सरकारमध्ये काम करणाऱ्या आणि इतर लोकांसाठी पर्यायी आहे. पण हा तुमच्या नावातील बदलाचा पुरेसा पुरावा आहे. तुम्ही तुमच्या नावातील बदलाची राजपत्र सूचना वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता आणि त्याची सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे ठेवू शकता. त्या डाउनलोड नोटिफिकेशनद्वारे सर्व कागदपत्रांमध्ये नाव सहज बदलता येते. विद्यापीठापासून महसूल विभाग कार्यालयापर्यंत सर्व ठिकाणी ही सूचना देऊन नाव बदलता येईल. (कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

First published:

Tags: Law, Legal