तुम्हाला बर्फ पडताना बघायला आवडतं का ? मग या ट्रेनने करा सफर

तुम्हाला बर्फ पडताना बघायला आवडतं का ? मग या ट्रेनने करा सफर

कल्पना करा, तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताय आणि त्याच ट्रेनधून तुम्हाला 360 अंशातला सुंदर नजारा दिसतोय, हिमवर्षाव होताना तुम्ही तो प्रत्यक्ष पाहू शकताय. आता ही केवळ कल्पना नाही तर खरोखरच भारतीय रेल्वे काश्मीरमध्ये अशी ट्रेन घेऊन येते आहे.

  • Share this:

श्रीनगर, 30 जुलै : तुम्हाला बर्फ पडताना पाहायला आवडतं का? हिमवर्षावामध्ये गोठून न जाता तो नुसता बघत राहाण्याची मौज काही वेगळीच आहे. जर तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर आता एक मस्त संधी आहे.

कल्पना करा, तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताय आणि त्याच ट्रेनधून तुम्हाला 360 अंशातला सुंदर नजारा दिसतोय, हिमवर्षाव होताना तुम्ही तो प्रत्यक्ष पाहू शकताय. आता ही केवळ कल्पना नाही तर खरोखरच भारतीय रेल्वे काश्मीरमध्ये अशी ट्रेन घेऊन येते आहे.

या ट्रेनचं पूर्ण छप्पर काचेचं असेल. ट्रेनच्या खिडक्याही मोठ्या असतील. त्यामुळे हिमवर्षाव होताना पाहता येईल. सोबतच मोठ्या खिडक्यांमधून काश्मीरचा नजाराही अनुभवता येणार आहे. चेअर कार असलेल्या या ट्रेनमध्ये हिटर आणि पॅन्ट्री कारही असेल.

पुराच्या पाण्यात अडकली ST बस, 29 प्रवाशांची थरारक सुटका

खरंतर 2017 मध्येच काश्मीरमध्ये ही विस्टाडोम ट्रेन सुरू करण्याची घोषणा झाली होती. पण या ट्रेनची ट्रायल घेतल्यानंतर काही कारणांमुळे हे लाँचिंग मागे पडलं. गेलं वर्षभर ही विस्टाडोम कोचची एसी ट्रेन बडगाम स्टेशनवरच उभी आहे.

काश्मीरमध्ये गेल्या दोन वर्षांत दगडफेक आणि हिंसक आंदोलनं सुरू होती. अशा स्थितीत पहाडी भागांतून प्रवास करताना दगडफेक झाली तर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली होती. त्यामुळेच काचेच्या या ट्रेनचं लाँचिंग थांबवण्यात आलं होतं. पण आता काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे ही ट्रेन सुरू करण्याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या या मेसेजपासून सावध राहा, माहिती होईल Leak

यावर्षीच्या पर्यटन हंगामात तुम्हाला काश्मीरमध्ये हिमवर्षावाचा आनंद घ्यायचा असेल तर या ट्रेनने प्रवास करायलाच हवा. शिवाय ही ट्रेन तुम्हाला निसर्गसुंदर काश्मीरची मनोहारी सफर घडवू शकते.

या ट्रेनसोबतच काश्मीरमध्ये मेट्रो प्रकल्पाचाही सरकारचा प्रस्ताव आहे. त्यामुळे काश्मीरच्या पहाडी भागाचा विकास होईल आणि पर्यटन उद्योगालाही चालना मिळेल.

========================================================================================

VIDEO: 'फक्त 4 नाही तब्बल 50 आमदार भाजपच्या पाईपलाईनमध्ये'

Published by: Arti Kulkarni
First published: July 30, 2019, 4:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading