Home /News /lifestyle /

बापरे! एका छोट्याशा चुकीचा भयंकर परिणाम; हत्तीसारखा झाला त्याचा पाय, आता उभंही राहता येईना

बापरे! एका छोट्याशा चुकीचा भयंकर परिणाम; हत्तीसारखा झाला त्याचा पाय, आता उभंही राहता येईना

तीन वर्षांपूर्वी त्याच्या पायात एक छोटीशी गाठ आली आणि तिने असं विक्राळ रूप धारण केलं.

    बंगळुरू, 03 डिसेंबर : अनेकदा आपल्याला छोट्याछोट्या वेदना, दुखापती होतच असतात. कधी कधी आपल्याला आपल्या त्वचेवर किंवा शरीराच्या कुठल्यातरी भागावर काहीतरी संशयास्पद जाणवतं. पण काहीतरी छोटंसं असेल असं समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याला फार गांभीर्याने घेत नाही. कर्नाटकातील (Karnataka) नागेशनेसुद्धा (Nagesh) असाच हलगर्जीपणा केला आणि त्याचे त्याला भयंकर परिणाम भोगावे लागत आहेत. नागेशने स्वतः आपली व्यथा मांडली आहे आणि लोकांना सावध केलं आहे. त्याच्या पायात एक छोटीशी गाठ (Lump on leg) आली होती. 2018 साली अचानक त्याच्या पायात ही गाठ तयार झाली. ज्याकडे त्याने फार लक्ष दिलं नाही आणि आता त्याचा परिणाम म्हणजे तो अंथरूणालाच खिळला आहे. चालणं दूर त्याला साधं आपल्या पायावर उभंही राहता येत नाही आहे. नागेश गेल्या तीन वर्षांपासून लिम्फेडेमा एल्फन्टायसिसने (Lymphedema Elephantiasis) म्हणजे हत्तीरोगाने ग्रस्त आहे. आपल्या आजाराबाबत माहिती देताना नागेशने सांगितलं, सुरुवातीला त्याच्या पायात फक्त एक छोटीशी गाठ आली होती. ही गाठ डोळ्यांनी दिसत नव्हती. हात लावल्यावर पायात गाठीसारखं काहीतरी आहे हे जाणवायचं. नागेश बालपण रस्त्यावरच गेलं, त्यामुळे त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचं नव्हतं. हे वाचा - बायको इतकी स्वच्छ राहते की वैतागला नवरा; म्हणे, 'मला घटस्फोट हवा' पण ही गाठ पुढे जाऊन इतकं मोठं विक्राळ रूप धारण करेल. याची कल्पनाही त्याने केली नव्हती. त्याचा पाय सुजला. तो इतका मोठा झाला की एखाद्या झाड्याच्या खोडासारखा किंवा हत्तीच्या पायासारखाच दिसू लागला. त्याला आता चालणं दूर उभं राहणंही शक्य होत नाही आहे. सर्जरीशवाय नागेश बरा होऊच शकत नाही हे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे. गरीब असल्याने एक वेळचं खाणंही मिळायचं नाही. अशात डॉक्टरांकडे जाऊन पैसे खर्च करणं त्याला परवडणारं नव्हतं. पण या छोट्याशा चुकीची इतका भयंकर परिणाम झाले. त्याला उभंही राहता येईना. कुणीच त्याच्या मदतीलाही येत नव्हतं. रस्त्यावर तो तसाच पडून होता. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने नागेशला डोक्यावर छप्पर मिळालं. दिवसेंदिवस त्याची प्रकृती बिघडते आहे. आता त्याने लोकांसमोर मदतीसाठी हात पसरले आहेत. हे वाचा - नारळ पाणीही ठरू शकतं हानिकारक; याचे गंभीर दुष्परिणाम माहिती आहेत का? डॉक्टरांच्या मते, नागेशच्या उपचारासाठी जवळपास  30 लाख रुपये खर्च येईल. हा खर्च नागेशच्या आवाक्याबाहेर आहे त्यामुळे एनजीओ त्याच्यासाठी निधी जमा करते आहे. लोकांनी त्याला मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे आता आपण लवकर बरे होऊ अशी आशा नागेशलाही आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Disease symptoms, Health, Karnataka, Lifestyle, Rare disease

    पुढील बातम्या