मुंबई, 31 ऑगस्ट : सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींचीदेखील फेव्हरेट स्टार असतात आणि त्यांच्यासह काम करण्याची संधी मिळणं म्हणजे या सेलिब्रिटींसाठी खूप अनमोल असा क्षण असतो. अभिनेत्री करीना कपूरही (kareena kapoor) सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तिला आता तिच्या आवडत्या सहकलाकारासह काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे करीनाला इतका आनंद झाला आहे की तिने आपल्या सोशल मीडियावर त्याच्यासह व्हिडीओ शेअर केला आहे.
करीना कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर आपला फेव्हरेट को-स्टार कोण आहे, हे सांगितलं आहे. किंबहुना त्याच्यासह तिने व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
करीना यामध्ये ब्लॅक ड्रेसमध्ये दिसते आहे. तिच्या मांडीवर एक डॉग आहे. करीनाने या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. माझा फेव्हरेट को-स्टार माझा लिओ याच्यासह मी शूटिंग करत आहे. या व्हिडीओतील करीनाचा आनंद पाहण्यासारखा आहे.
करीना कपूर आता दुसऱ्यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सैफ आणि करीनाने ही बातमी शेअर केली होती. दरम्यान करीनाने आपलं काम सुरू ठेवलं आहे. तिचं शूटिंग सुरूच आहे. करीना लवकरच 'लाल सिंह चड्ढा' फिल्ममध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्यासह अभिनेता आमिर खानही मुख्य भूमिकेत आहेत. याआधी ती अंग्रेजी मीडियममध्ये दिसली होती.