Home /News /lifestyle /

5 महिन्यांच्या प्रेग्ननंट करीना कपूरचा PHOTO व्हायरल; बेबोने सांगितली आपली अवस्था

5 महिन्यांच्या प्रेग्ननंट करीना कपूरचा PHOTO व्हायरल; बेबोने सांगितली आपली अवस्था

  मुंबई, 03 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आता पाच महिन्यांची प्रेग्ननंट आहे. याआधी तिचे प्रेग्नन्सीनंतरचे फोटो तुम्ही पाहिले आहेत. आता करीनाने आपल्या पाच महिन्यांच्या प्रेग्नन्सीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिनं आपली अवस्था काय झाली आहे, तेदेखील सांगितलं आहे. करीना कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला आहे. यामध्ये करीना नो मेकअप लूकमध्ये दिसते आहे. तिने ब्लॅक अँड व्हाइट चेक्स ड्रेसमध्ये दिसते आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लो दिसतो आहे.  या पोस्टसह तिनं कॅप्शन लिहिलं आहे, "5 महिने झाले आणि आणखीन मजबूत होते आहे"
  View this post on Instagram

  5 months and going strong PS : The #KaftanSeries continues

  A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

  करीनाचा हा फोटो पाहिल्यानंतर यावर बऱ्याच कमेंट येत आहे. हे वाचा - रश्मी देसाईचं सर्वात हॉट फोटोशूट व्हायरल, Bold फोटोंवर चाहते फिदा गेल्या महिन्यातच करीना चाळीस वर्षांची झाली आहे. तिने आपल्या कुटुंबासह वाढदिवस साजरा गेला. एरवी ग्लॅमरस लूकमध्ये दिसणारी करीना बर्थ डेच्या दिवशी अगदी सिम्पल लूकमध्ये दिसली. वाढदिवसाच्या निमित्ताने करीनाने भावुक पोस्टही केली होती. "मला खूप प्रेम करायचं आहे, हसायचं आहे, माफ करायचं आहे, विसरायचं आहे आणइ सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रार्थना करायची आहे आणि मला ताकद देणाऱ्यांचे आभार मानायचे आहे आणि आज मी जशी आहे तशी महिला बनवणारे माझे अनुभव आणि विचार यांचीही मी आभारी आहे. त्यापैकी काही योग्य, काही अयोग्य, काही खूप चांगले आणि काही चांगलेही नव्हते. पण तरी, हे बिग 40! आणखी बिग करू", अशी पोस्ट तिने केली होती. हे वाचा - सुशांतची आत्महत्याच; AIIMS च्या रिपोर्टनंतर बहीण श्वेता किर्ती सिंह म्हणाली... करीना सध्या आपली आगामी फिल्म लाल सिंह चड्ढाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तिनं करण जोहरची मल्टी स्टारर फिल्म तख्तही साइन केली आहे. या फिल्ममध्ये तिच्यासह अनिल कपूर, रणवीर सिंह, विकी कौशल, आलिया भट्ट, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असणार आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bollywood actress, Kareena Kapoor

  पुढील बातम्या