40 वर्षांची झाली करीना कपूर; BIRTHDAY च्या आधीच बेबोने सांगितली आपली WISH

40 वर्षांची झाली करीना कपूर; BIRTHDAY च्या आधीच बेबोने सांगितली आपली WISH

करीना कपूरने आपल्या बर्थडेच्या (kareena kapoor birthday) काही तास आधी इमोशनल पोस्ट केली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor birthday) चाळीशीत पदार्पण करणार आहे. 21 सप्टेंबरला ती आपला बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. बेबो आपल्या बर्थडेच्या तयारीला लागली आहे. आपल्या वाढदिवसाच्या काही तास आधीच तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिनं आपली WISH सांगितली आहे.

आपल्या बर्थडेसाठी करीना खूपच उत्साहात आहे. तिने आपल्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये आपला एक सुंदर फोटो शेअर केला आहे आणि त्यासह एक भावुक पोस्टही लिहिली आहे. आपल्या इतक्या वर्षांचा अनुभव आणि आपल्या इच्छा तिनं या पोस्टच्या माध्यमातून मांडल्या आहेत.

करीना म्हणाली, "मी वयाच्या चाळीशीत पदार्पण करत आहे. मला खूप प्रेम करायचं आहे, हसायचं आहे, माफ करायचं आहे, विसरायचं आहे आणइ सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रार्थना करायची आहे आणि मला ताकद देणाऱ्यांचे आभार मानायचे आहे आणि आज मी जशी आहे तशी महिला बनवणारे माझे अनुभव आणि विचार यांचीही मी आभारी आहे. त्यापैकी काही योग्य, काही अयोग्य, काही खूप चांगले आणि काही चांगलेही नव्हते. पण तरी, हे बिग 40! आणखी बिग करू"

Published by: Priya Lad
First published: September 20, 2020, 10:37 PM IST

ताज्या बातम्या