सर्वात बेस्ट Birthday गिफ्ट; करणवीर बोहराने चाहत्यांसह शेअर केली आनंदाची बातमी

सर्वात बेस्ट Birthday गिफ्ट; करणवीर बोहराने चाहत्यांसह शेअर केली आनंदाची बातमी

अभिनेता करणवीर बोहराने (Karanvir Bohra) आपल्या वाढदिवशी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट : कोरोना लॉकडाऊनमध्ये आता आणखी एका अभिनेत्याने चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. नागिन 2 (NAAGIN 2) मधील अभिनेता करणवीर बोहरा (Karanvir Bohra) पुन्हा बाबा होणार आहे. करणवीरला त्याची पत्नी तीजे सिद्धूने (Teejay Sidhu) दिलेलं हे स्पेशल असं बर्थडे गिफ्ट आहे. दोन जुळ्या मुलींनंतर त्यांच्या घरी आणखी एक नवा पाहुणा येणार आहे.

करणवीर आज आपला 37 वा बर्थडे साजरा करतो आहे. त्यानिमित्ताने आपल्या पत्नीने दिलेल्या या स्पेशल गिफ्ट त्याने आपल्या चाहत्यांनाही सांगितलं आहे. करणवीर आणि तीजेने आपल्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. दोघांनीही आपल्या या खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तीजे सिद्धूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या बेबी बंपसह फोटो ठेवला आहे. यामध्ये करणवीर तिच्यासह आहे. दोघांनीही बेबी बंपवर हात ठेवत पोझ दिली आहे.

तीजे म्हणाली, "आम्हाला अनेक आशीर्वाद लाभले आणि आता आणखी एक मिळतो आहे. प्रत्येक आत्म्याचा एक उद्देश असतो. आपण त्याला निवडत नाही, ते आपल्याला निवडतात. आम्ही तुझ्यासाठी योग्य आहोत याचा विश्वास ठेवल्याबद्दल चिमुकल्या आम्ही तुझे खूप आभार"

हे वाचा - अनुष्काप्रमाणे अनेक सौंदर्यवतींनी सोशल मीडियावर दिली गूड न्यूज! दाखवलं BABY BUMP

तर करणवीरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक अनोखा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघंही मातीचं छोटं बाळ घडवताना दिसत आहेत.

करणवीर म्हणाला, "आपल्यामार्फत मुलं या जगात येतात, मात्र सर्वकाही देवाच्या हातात असतं. तो खरा महान निर्माता आहे, तोच सर्वकाही नीटपणे घडवतो आणि आपण फक्त त्याच्या आशीर्वादाची वाट पाहत होतो. आम्हाला असं सरप्राइझ दिल्याने मी देवाचे आभार मानतो. आम्हाला पुन्हा आईबाबा होण्याासठी निवडलं. माझ्यासाठी हे सर्वात अनमोल असं बर्थडे गिफ्ट आहे"

फक्त करणवीर आणि तीजेच नाही तर त्यांच्या मुली बेला आणि व्हिएनाचंदेखील स्वतंत्र इन्स्टाग्राम पेज आहे. त्यावरदेखील आपल्या दोन्ही मुलींचे फोटो टाकून त्यांच्यासमोर 2016, 2016 असं लिहिलं आहे आणि 2020 समोर त्यांनी छोटेसे दोन शूझ दाखवले आहेत.

हे वाचा - 2020 मध्ये सेलिब्रिटींनी केलं नव्या पाहुण्याचं स्वागत; चाहत्यांना दिली GOOD NEWS

करणवीर आणि तीजे या दोघांचं 2006 साली लग्न झालं. 2016 साली त्यांना जुळ्या मुली झाल्या. क्यों की साँस भी कभी बहू थी, शरारत, कसौटी जिंदगी की, नागिन 2 या मालिकेत करणने काम केलं. याशिवाय तो खतरों के खिलाडी, बिग बॉस 12 या रिअॅलिटी शोमध्येही होता.

Published by: Priya Lad
First published: August 28, 2020, 4:49 PM IST

ताज्या बातम्या