गर्भातच मुलांना मिळणार सर्टिफिकेट! या विद्यापीठानं सुरू केला 6 महिन्यांचा 'गर्भसंस्कार' कोर्स

गर्भातच मुलांना मिळणार सर्टिफिकेट! या विद्यापीठानं सुरू केला 6 महिन्यांचा 'गर्भसंस्कार' कोर्स

आता मुलांना गर्भातच मिळणार प्रमाणपत्र, असा असेल अभ्यासक्रम.

  • Share this:

कानपूर, 04 डिसेंबर : भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक संस्काराला एक विशिष्ट महत्त्व आहे. त्यामुळं बाळ जन्मा येण्याआधीच त्याच्यावर गर्भात असताना संस्कार केले जातात. यालाच ‘गर्भसंस्कार’ असे म्हणतात. गर्भसंस्कारांमुळे जन्माला येणारं बाळ हुशार आणि बुद्धीमान होते, असा एक समज आहे. मात्र आता गर्भाशयात मुलांना संस्कार देण्यासाठी विद्यापीठात एक कोर्स असणार आहे. त्यामुळं गरोदर महिलांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे.

कानपूरच्या छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठानं या अनोख्या मोहीमेला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान ही मोहीम सुरू करण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. या अभ्यासक्रमात मातांना गरोदर बाळांना संस्कार देण्यासाठी युक्त्या शिकवण्यास येणार आहेत. 1 जानेवारीपासून या कोर्सला सुरुवात होणार असून यात अविवाहित महिलांसह मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे.

वाचा-OMG! 7 कोटी 16 लाखांच्या नोटा वापरून तयार केला सिंहासन, तुम्हीही काढू शकता फोटो

छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ (सीएमजेएमयू) कुलगुरू प्रा. नीलिमा गुप्ता यांनी एन आयएनएस यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आज या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष दिले जात नाही. कोर्सची सुरूवात जनजागृतीपासून होते. आतापासून सुरू होणाऱ्या या पाठ्यक्रमाची अधवी तीन ते सहा महिने असणार आहे. हा कोर्स पूर्ण झाल्यांनंतर प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या कोर्ससाठी 12वी पास महिला प्रवेश घेऊ शकतात”. त्यामुळं आता गर्भसंस्काराचे शिक्षण पुस्तकातून नाही तर विद्यापीठात होणार आहे.

वाचा-मातेला सलाम! रस्त्याच्या कडेला सोडून दिलेल्या बालकाचे स्वीकारले पालकत्व

नीलिमा गुप्ता यांनी, या महिन्यात अकादमी परिषदेच्या बैठकीत हा कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर 1 जानेवारीपासून पुन्हा याचे वर्ग सुरू केले जाणार आहे. सुरुवातीला, प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला गेला, जेणेकरुन लोकांना माहिती होईल”, असे सांगितले. दरम्यान हा कोर्स सुरू करण्यामागे गर्भवती महिला भावी पिढीचे भविष्य योग्य ठेवतील तसेच त्यांना निरोगी बनविणे आवश्यक, हा उद्देश आहे.

वाचा-सावधान! लहान मुलांना पोलिओ टाइप-2 व्हायरसचा धोका

असा आहे अभ्यासक्रम

या तीन महिन्यांच्या कोर्सला गर्भसंस्कारातील प्रमाणपत्र कोर्स आणि संस्कारातील-महिन्यांचा अदवानास प्रमाणपत्र कोर्स असे नाव देण्यात येईल. गर्भाशयात गर्भवती महिलांना संस्कार देण्याची पूर्ण तयारी आहे. त्यांनी सांगितले की नवीन वर्षात संस्काराचा अभ्यास सुरू होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2019 09:01 AM IST

ताज्या बातम्या