मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

...आणि कांगारूनं चक्क वाघालाच मिठी मारली; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

...आणि कांगारूनं चक्क वाघालाच मिठी मारली; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

कांगारू (kangaroo) आणि वाघाची (tiger) मिठी... ज्याचा आपण विचारही करू शकत नाही जे स्वप्नातही पाहू शकत नाही, ते प्रत्यक्षात घडलं आहे.

कांगारू (kangaroo) आणि वाघाची (tiger) मिठी... ज्याचा आपण विचारही करू शकत नाही जे स्वप्नातही पाहू शकत नाही, ते प्रत्यक्षात घडलं आहे.

कांगारू (kangaroo) आणि वाघाची (tiger) मिठी... ज्याचा आपण विचारही करू शकत नाही जे स्वप्नातही पाहू शकत नाही, ते प्रत्यक्षात घडलं आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 10 जानेवारी : वाघ (Tiger) म्हटलं की माणसंच नाही तर प्राण्यांनाही धडकी भरते. समोर वाघ दिसताच प्राणीही आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागतात. आपल्यापेक्षा कमी ताकदीचा प्राणी समोर दिसताच वाघ त्याच्यावर हल्ला चढवतो, त्याला आपला सावज बनवतो. वाघाच्या शिकारीतून शक्यतो कुणीच सुटत नाही. अशा वाघाशी मैत्री कोण बरं करेलं.

वाघाशी मैत्री करण्याची हिंमत तशी कुणातच नाही. पण एका कांगारूनं (kangaroo) ती दाखवली. त्यानं चक्क एका वाघाशी मैत्री केली आहे. फक्त मैत्री नव्हे तर त्याला प्रेमानं मिठीही मारली आहे. वाघ आणि कांगारूच्या मिठीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  द सननं आपल्या ट्विटवरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक कांगारू वाघाला आलिंगन देताना दिसतो आहे.

हा खराखुरा वाघ नव्हे तर खेळण्यातील वाघ आहे. एक सॉफ्ट टॉय वाघ आहे. या वाघाला दोरीनं बांधण्यात आलं आहे. कांगारू त्याच्यासोबत खेळताना दिसतं आहे. तो त्या वाघाला ढकलतो, त्याला आपल्या तोंडात धरतो, आपल्या मिठीतही घेतो. बराच वेळ तो त्याला तशाच आपल्या कुशीशी धरून ठेवतो. त्याच्यासोबत झोकेही घेतो. या व्हिडीओतून कांगारूचं या वाघावर असलेलं प्रेम स्पष्टपणे दिसून येतं आहे. भले तो वाघ खोटा का असेना पण कांगारू त्याच्यावर भरभरून प्रेम करतो आहे.

हे वाचा - हत्तीने गेंड्याला मारली मिठी; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाला प्रेमाला उपमा नाहीच

म्हणतात ना प्रेमाला उपमा नाही, हेच प्रत्यक्षात दाखवणारा हा व्हिडीओ आहे.  प्रेम ही व्यक्त करण्याची भावना. कोण कुणावर किती प्रेम करतं हे मोजून सांगता येत नाही तर ते कृतीतून दिसून येतं. प्रेम म्हणजे फक्त मानवी भावना नाही तर मुक्या जीवांमध्येही ही भावना असते. जरी त्यांना आपलं प्रेम किती आहे हे सांगता येत नसलं तरी आपल्या कृतीतून ते व्यक्त करून दाखवतात. माणसं माणसांवर प्रेम व्यक्त करताना आपण पाहतच आलो आहोत. असंच प्रेम प्राणीदेखील एकमेकांप्रती दाखवतात. बरं प्राण्यांचं प्रेम हे फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित नसतं तर इतर आपल्या जातीचा नसणाऱ्या आपल्यासारख्या न दिसणाऱ्या इतर प्राण्यांवरही ते प्रेम करतात.

याआधीदेखील एका हत्तीनं एका गेंड्याला मिठी मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हत्ती आणि गेंडा शरीराने मोठे असले तरी दोघेही वेगळे प्राणी. मात्र तरी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्यातील वेगळेपण आपल्यासाठीही क्षणभर बाजूला राहतो आणि आपल्याला दिसतं ते फक्त त्यांच्यातील खरं प्रेम.

हे वाचा - हल्ला करणाऱ्या सिंहाला श्वानानं पळव, पळव पळवलं, पाहा शिकारीचा थरारक VIDEO

आयएफएस ऑफिसर सुशंता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हत्ती आणि गेंड्याची ही गोड अशी मिठी पाहून अनेकांना मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील जादू की झप्पी आठवली आहे.

तसंच एका चिंपाझीनं सिंहाच्या बछड्याला दूध पाझलं होतं.  फक्त दूधच पाजलं नाही तर दूध पाजता पाजता त्याच्या डोक्यावर मायेनं चुंबनही घेतलं. या व्हिडीओमधील चिंपाजीचं बछड्याप्रती प्रेम पाहून अनेक युझर्सचे डोळे पाणावले.

First published:

Tags: Viral, Viral videos, Wild animal