मुंबई, 23 डिसेंबर : अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती सोशल मीडियावर (Social media) ट्रोल होते आहे ती तिच्या एका फोटोमुळे. कंगनाने आपला बिकिनी फोटो (bikini photo) सोशल मीडियावर पोस्ट केला आणि नेटिझन्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. कंगनानं या ट्रोलर्सला सणसणीत उत्तरही दिलं आहे.
थलायवीचं शूटिंग संपवून कंगना सुट्ट्या एन्जॉय करायला मेक्सिकोला गेली आहे. आपल्या भटकंतीचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती चक्क बिकीनीमध्ये दिसत आहे.
Good morning friends, one of the most exciting places that I visited in my life is Mexico, beautiful but an unpredictable place, here’s a picture from Tulum a little island in Mexico ❤️ pic.twitter.com/8b0M7ymMiX
एरवी संस्कृतीबद्दल बोलणाऱ्या कंगनाने चक्क बिकिनी घातली म्हणून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. यावर कंगनानं आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगनानं फेसबुक पोस्ट केली आहेत.
कुछ लोग मेरी बिकिनी पिक्चर देखकर मुझे धर्म और सनातन का लेक्चर दे रहे हैं, अगर कभी माँ भैरवी बाल खोल, वस्त्रहीन, ख़ून...
कंगना फेसबुक पोस्टमध्ये म्हणाली, "बिकिनीमध्ये माझा फोटो पाहिल्यानंतर काही लोक मला धर्म आणि सनातनवर लेक्चर देत आहेत. समजा जर कधी आई भैरवी केस सोडून, वस्त्रहिन, रक्त पिणारी अशी प्रतिमा घेऊन तुमच्यासमोर आली तर तुमचं काय होईल? तुम्हारी तो फट जाएगी? आणि तुम्ही स्वत:ला भक्त म्हणता? धर्माचं पालन करा, त्याचे कंत्राटदार बनू नका. जय श्री राम"
कंगनाने नुकतंच तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्या ‘थलायवी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटात ती जयललितांची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर कंगना रणौत 'धाकड' चित्रपटात दिसणार आहे.