मनाली, 22 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) पुन्हा प्रेमात पडली आहे. गेली काही वर्षे आदित्य पंचोली, ऋतिक रोशन आणि अध्ययन सुमन यांच्यासह असलेल्या कंगनाच्या अफेअर्सच्या चर्चेने ब्रेक घेतला होता. सध्या ती आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत होती. मात्र आता ती पुन्हा प्रेमात पडली आहे आणि हे दुसरं तिसरं कुणी नाही तर कंगनानेच सांगितलं आहे. सोशल मीडियावर तिनं खुलेआम आपलं प्रेम जाहीर केलं आहे.
कंगना सध्या आपल्या हिमाचल प्रदेशच्या मनालीत आपल्या घरी आपल्या कुटुंबासह राहत आहे. तिथंच ती एका मुलाच्या प्रेमात पडली. तिनं या मुलाचा फोटोही आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्याने माझं सर्वकाही चोरून नेलं असं तिनं म्हटलं आहे.
एक छोटा सा लड़का है जिसने मेरी सूरत चुरा ली, मेरी हंसी, मेरे बलों के कर्ल्ज़, मेरा दिल सब चुरा लिया इस लड़के को कोई कुछ क्यूँ नहीं कहता ❤️ pic.twitter.com/RPTwuQ7Kth
कंगनाने ट्वीट केलं आहे, "एक छोटासा मुलगा ज्याने माझं हसू, माझ्या केसांचे कर्ल्स, माझं हृदय सर्वकाही चोरून नेलं. या मुलाला कोण का नाही बोलत?"
हा मुलगा दुसरा तिसरा कुणी नाही तर कंगनाचा भाचा आहे. कंगनाची बहीण रंगोलीचा हा मुलगा. कंगना आपला सर्वाधिक वेळ सध्या याच्यासह घालवते आहे. म्हणजे कंगना ज्याच्याशी लग्न करेल असा मुलगा अजून तरी तिच्या आयुष्यात आला नाही आहे.
कंगना आदित्या पांचोलीहस अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर हृतिक रोशनसहदेखील तिनं नातं बनवण्याचा प्रयत्न केला. शिवाय अध्ययन सुमनसहदेखील आपलं अफेअर होतं असं तिनं सांगितलं होतं. गेली काही वर्षे कंगनाच्या या अफेअर्सची चर्चा थांबली. इतक्या वर्षांनंतर तिनं पहिल्यांदाच कुणाबाबत तरी आपलं प्रेम व्यक्त केलं. हे प्रेम लग्नाचं नाही पण मायेचं आहे.