Home /News /lifestyle /

"हो मी ड्रग्ज घ्यायचे", अभिनेत्री कंगना रणौतचा VIDEO VIRAL

"हो मी ड्रग्ज घ्यायचे", अभिनेत्री कंगना रणौतचा VIDEO VIRAL

माझ्यावरील ड्रग्जचे आरोप सिद्ध झाले तर मी मुंबई सोडेन असं म्हणणाऱ्या कंगना रणौतचा (kangana ranaut) हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

    मुंबई, 08 सप्टेंबर : "मी ड्रग्ज घेते,माझे कोणत्या ड्रग्ज डिलरशी संबंध आहेत  किंवा मी माझ्या चुकीची कबुली दिली तर मी कायमची मुंबई सोडून जाईन", असं म्हणताच अभिनेत्री कंगना रणौतचा (kangana ranaut) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये तिने स्वत: आपण ड्रग्ज घेत होतो, असं कंगना म्हणाली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतचीही ड्रग्जसंबंधी चौकशी केली जाणार अशी बातमी समोर आली. कंगनावरील ड्रग्जबाबतच्या आरोपांबाबत मुंबई पोलीस सखोल तपास करतील असं निवेदन आपण विधानसभेत सादर केलं, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. त्यानंतर कंगनाने ट्वीट केलं. "माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. तुम्हाला कोणत्याही ड्रग्ज डिलरशी माझे संबंध सापडले किंवा मी माझ्या चुकीची कबुली दिली तर मी कायमची मुंबई सोडून जाईन", असं कंगना म्हणाली. कंगनाच्या या ट्वीटनंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात कंगना म्हणते, मी घरातून पळून गेले होते. एक-दीड वर्षात मी एक फिल्म स्टार होते. मी ड्रग्ज अॅडिक्ट होते. माझ्या आयुष्यात खूप कांड झाले. किशोरवयातच माझ्या आयुष्यात खूप भयानक घडलं होतं. विचार करा मी किती खतरनाक आहे" कंगनाच्या या व्हिडीओवरून तिच्यावर टिका केली जाऊ लागली आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे आणि कंगनाने खरंच अशी कबुली दिली होती का? याच्या सत्यतेची पुष्टी न्यूज 18 लोकमत करत नाही. हे वाचा - रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेने केलं हे विधान, प्रतिक्रियांचा सूर मात्र बदलला सुशांतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स विभागाने (NCB) रिया चक्रवर्तीला (rhea chakraborty), रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यांना अटक केलेली आहे. रियाने प्रथमच ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली. इतकचं नाही तर रियाने एनसीबीला ड्रग्स घेतल्या जाणाऱ्या बॉलिवूड पार्ट्यांबाबत माहिती दिली. आता NCB ड्रग्स प्रकरणात सुशांतचे सहकलाकार आणि अभिनेत्यांसह 25 बॉलिवूड कलाकारांना समन्स पाठविणार आहे. हे वाचा - 'बालिका वधू'तील दादी सुरेखा सीकरी यांना ब्रेन स्ट्रोक; उपचारासाठी पसरले हात शिवाय कंगनादेखील काही कलाकारांची नावं घेतली होती आणि त्यांनी ड्रग्ज तपासणी करून घ्यावी असं म्हटलं होतं. "रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विकी कौशल यांना विनंती करते की त्यांनी ड्रग तपासणीसाठी त्यांच्या रक्ताचा नमुना द्या, असे चर्चेत आहे की ते कोकेनच्या आहारी गेले आहेत. त्यांनी या अफवा खोट्या ठरवाव्यात असे मला वाटते. या तरुणांचे सँपल्स क्लीन निघाले तर ते लाखाेंची प्रेरणा ठरतील", असं ट्वीट कंगनाने केलं होतं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Kangana ranaut

    पुढील बातम्या