• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • अनुराग कश्यप नेमका कसा आहे? EX WIFE कल्की कोचलिनने सर्वांसमोर आणलं त्याचं खरं रूप

अनुराग कश्यप नेमका कसा आहे? EX WIFE कल्की कोचलिनने सर्वांसमोर आणलं त्याचं खरं रूप

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (anurag kashyap) अभिनेत्री पायल घोषने (payal ghosh) लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर त्याची एक्स वाइफ कल्की कोचलिनही (kalki koechlin) व्यक्त झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) लैंगिक छळाचा खळबळजनक आरोप केला. नशेत अनुरागने आपल्यासह जबरदस्ती केल्याचं ट्वीट तिने केलं. त्यानंतर फक्त अभिनेत्री कंगना रणौत पायल घोषच्या पाठिशी उभी राहिली. तर अनुरागला अनेक अभिनेत्रींनी पाठिंबा दिला आहे. आता अनुरागची एक्स वाइफ अभिनेत्री कल्की कोचलिननेदेखील (Kalki Koechlin) यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या एक्स पतीवर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर कल्की कोचलिनही व्यक्त झाली आहे. सोशल मीडियावर तिनं भली मोठी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिनं अनुराग कश्यप नेमका कसा आहे, हे सांगितलं आहे. कल्की म्हणाली, "प्रिय अनुराग. या सोशल मीडियाच्या सर्कसला स्वत:वर भारी पडू देऊ नको. तू नेहमी आपल्या फिल्म्सच्या स्क्रिप्ट्समधून महिलांच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. तू पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्येही महिलांचा सन्मान राखला आहे. मी याची साक्षीदार आहे. कारण तू मला नेहमी पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनात आपल्या बरोबरीची, समान जागा दिलीस. तू घटस्फोटानंतरही माझा सन्मान राखला, माझी साथ दिलीस" हे वाचा - लैंगिक छळाचा आरोप असलेल्या अनुराग कश्यपबाबत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री म्हणाली... "कामाच्या ठिकाणी जेव्हा मला कधी असुरक्षित वाटलं, जेव्हा आपण एकत्र नव्हतो, तेव्हादेखील तू मला साथ दिलीस. ही वेळ खूप विचित्र आहे. प्रत्येक जण एकमेकांवर खोटे आरोप लावतो आहे. कुटुंबं, मित्र आणि देश उद्धवस्त करत आहेत. मात्र या व्हर्चुअल रक्तरंजित संघर्षाशिवाय एक जग आहे, जिथं गौरव महत्त्वाचा आहे. यावेळी तुला मजबूत राहण्याची गरज आहे आणि तू जे काम करत आहेस ते करत राहा. एक्स वाईफकडून तुला खूप सारं प्रेम", असं म्हणत कल्की अनुरागच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आहे. हे वाचा - "अनुराग कश्यप माझ्यासमोर न्यूड झाला आणि...", पायल घोषने केला 'त्या' घटनेचा उलगडा फक्त कल्की कोचलिन नाही तर अनेक अभिनेत्री अनुरागसाठी सरसावल्या आहेत. अभिनेत्री तापसी पन्नू, अमृता सुभाष, राधिका आपटे या अनुरागच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: