Home /News /lifestyle /

बापरे! फक्त हात लावताच चिमुकलीची भयंकर अवस्था; तुमच्या आजूबाजूलाही हे झाड तर नाहीये ना??

बापरे! फक्त हात लावताच चिमुकलीची भयंकर अवस्था; तुमच्या आजूबाजूलाही हे झाड तर नाहीये ना??

खेळता खेळता झाडाला स्पर्श झाला आणि चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ओढावली.

    लंडन, 15 जून : सध्या पावसाळा म्हटलं की सगळीकडे हिरवंगार होतं. किती तरी नवीन झाडं दिसू लागतात. अशी झाडं जी आपल्याला माहितीही नसतात. यापैकी काही खूप खतरनाक असतात (Most dangerous plant). शक्यतो एखाद्या झाडाचं फळ, फूल, पान खाल्ल्याने ते विष शरीरात जाऊन काहीतरी धोका होणं इतपत ठिक आहे. पण एखाद्या झाडाला हात लावणंही भयानक ठरू शकतं, याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल. असंच एक झाड सध्या चर्चेत आहे. या झाडाला फक्त स्पर्श केल्याने एका चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ओढावली. झाडाला हात लावताच यूकेतील या चिमुकलीची त्वचा पोळून निघाली आहे (Just by touching tree girl burn). ही मुलगी हार्डी मिल प्रायमरी स्कूलमध्ये शिकते. 4 जूनला तिच्यासोबत ही दुर्घटना घडली. त्यानंतर इतर पालकांना जागरूक करण्यासाठी शाळा प्रशासनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. एका खतरनाक झाडाला स्पर्श केल्याने मुलीची अशी अवस्था झाली आहे. सेकंड डिग्री बर्न झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे. मॅनचेस्टरच्या बोल्टनमध्ये हे झाड आहे. शाळेने त्या झाडाचा फोटोही शेअर केला आहे आणि या झाडापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तुमच्या आसपास असं कोणतं झाड नाही ना हे तपासा आणि असेल तर ते तिथून काढून टाका, असं आवाहन केलं आहे. हे वाचा - Optical Illusion: या झाडात लपलंय घुबड, 30 सेकंदात शोधल्यास तुम्ही ठरणार स्मार्ट आता फक्त स्पर्श करताच चिमुकलीची भयंकर अवस्था करणारं हे झाड किती खतरनाक असेल याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. हे झाड नेमकं कोणतं, कसं दिसतं आणि कुठे असतं? असे बरेट प्रश्न तुम्हाला पडले असतील. हे झाड आहे होगवीड. याला Heracleum mantegazzianum सुद्धा म्हटलं जातं. मोठं होगवीड झाड जवळपास वीस फूटपर्यंत वाढतं. एका झाडामुळे त्याच्या आजूबाजूला बरीच झाडं येतात. मेनचेस्ट इव्हनिंग न्यूजच्या मते, 19 व्या शतकात युरेशियाहून ब्रिटनला आलं. हे वाचा - मासे पकडताना जाळ्यात अडकली भलतीच वस्तू; बोलवावे लागले पोलीस ही झाडं उष्ण ठिकाणी असतात. यूकेमध्ये तापमान वाढत असल्याने या कालावधीत ही झाडं तिथं दिसत आहेत. पार्कमध्ये या झाडांची संख्या वाढते आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. कारण जितकी झाडं जास्त तितके जास्त लोक या झाडाच्या संपर्कात येऊन भाजतील. त्यामुळे अशा झाडापासून दूरच राहा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral

    पुढील बातम्या