OMG VIDEO : भंगारातून सुंदर जुगाड! 'रिसायकल कपल'चा चमत्कार

OMG VIDEO : भंगारातून सुंदर जुगाड! 'रिसायकल कपल'चा चमत्कार

तुम्ही एकदा घर आवरायला काढलंत की कितीतरी जुन्यापान्या वस्तू टाकून द्याव्याशा वाटतात. घरामध्ये अडगळ नकोशी वाटते. बरं, जुनं सामान देऊन नवं काहीतरी घ्यावं म्हटलं तरी बरीच उठाठेव करावी लागते. पण जोधपूरच्या एका 'जुगाडू कपल' ने अशाच जुन्या, भंगार वस्तूंमधून मोठा बिझनेस सुरू केला.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : तुम्ही एकदा घर आवरायला काढलंत की कितीतरी जुन्यापान्या वस्तू टाकून द्याव्याशा वाटतात. घरामध्ये अडगळ नकोशी वाटते. बरं, जुनं सामान देऊन नवं काहीतरी घ्यावं म्हटलं तरी बरीच उठाठेव करावी लागते. पण जोधपूरच्या एका 'जुगाडू कपल' ने अशाच जुन्या, भंगार वस्तूंमधून मोठा बिझनेस सुरू केला.

रितेश आणि प्रीतीने आधी केमिकल फॅक्टरी, स्टोन कटींग फॅक्टरी अशा व्यवसायात आपलं नशीब आजमावून पाहिलं पण यामध्ये त्यांना यश आलं नाही. एकदा मात्र त्यांच्या हाती एक पत्र्याचा डबा लागला आणि त्यांना लाखमोलाची आयडिया सुचली. या पत्र्याच्या डब्यातून त्यांनी एक ड्रमच्या आकाराचं स्टूल बनवलं आणि पाहतापाहता त्यांचं हे प्रॉडक्ट प्रचंड लोकप्रिय झालं. या ड्रम स्टूलला त्यांना डेन्मार्कमधून पहिली ऑर्डर मिळाली.

ड्रम स्टूलसारख्या अशा अनेक वस्तू त्यांनी अक्षरश: भंगारसामानातून बनवल्या आहेत. या भंगारात पडलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांनी बाथ टेबल बनवलं. हे बाथ टेबल कुठेही हलवता येतं. चाकं असलेल्या त्यांच्या या प्रॉडक्ट्सना भरपूर मागणी आहे. एका भंगारात पडलेल्या कारचा त्यांनी बनवलेला सोफा तर एकदम हटके आहे.

अशा पद्धतीने बनणाऱ्या त्यांच्या प्रॉडक्ट्सना एवढी मागणी येऊ लागली की मग भंगारसामान कमी पडू लागलं. यासाठी या रितेश आणि प्रीतीने देशभरातल्या भंगार साठवण्याच्या जागांना भेटी दिल्या आणि असं पुन्हा वापरात आणता येऊ शकणारं सामान वेगळं काढून ठेवायला सांगितलं.

बायकोसाठी आपलं गाव सोडणाऱ्या नवऱ्यांची संख्या वाढतेय! 'हे' राज्य आहे आघाडीवर

प्रीती म्हणते, घर, ऑफिस, रेस्टॉरंट, हॉटेल यासाठी कोणत्याही वस्तूचं नाव घ्या... ती वस्तू आमच्याकडे तुम्हाला मिळणारच. या दोघांनी या व्यवसायात फक्त देशातच नव्हे तर जगभरात नाव कमवलं आहे. त्यांनी भंगारातून बनवलेल्या उशा, खुर्च्या, ट्रॅव्हलिंग बॅग यांना चीन, कोरिया, तैवानपासून ते अगदी यूएस, यूके पर्यंत मागणी आहे.

त्यांचे हे जुगाडू प्रॉडक्ट्स 36 देशात पाठवले जातात. केवळ रिसायकल इंडस्ट्रीमध्येच नाही तर डिझायनर मार्केटमध्येही त्याला भरपूर मागणी आहे.

ज्या गोष्टींकडे आपण टाकाऊ, अडगळीतलं सामान म्हणून बघतो त्याच गोष्टींना सुंदर करण्याची नजर या दोघांनी आपल्याला दिली आहे.

==========================================================================================

VIDEO : सत्तेचं कर'नाटक' संपलं, नेमकं विधानसभेत काय घडलं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 08:50 PM IST

ताज्या बातम्या