मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कोरोनाच्या निगेटिव्ह वातावरणातही कसं राहाल आनंदी; तज्ज्ञांनी दिला Happiness मंत्र

कोरोनाच्या निगेटिव्ह वातावरणातही कसं राहाल आनंदी; तज्ज्ञांनी दिला Happiness मंत्र

या काळात मूड स्विंग होण्यास सुरूवात होते. सतत मूड बदलत राहतो. रागावणे आणि रडणे असे बदल जाणत असले तरी  घाबरू नये.

या काळात मूड स्विंग होण्यास सुरूवात होते. सतत मूड बदलत राहतो. रागावणे आणि रडणे असे बदल जाणत असले तरी घाबरू नये.

कोरोनाच्या या परिस्थितीतून स्वतःला कसं सावराल, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

मुंबई, 04 जून: सध्याचा कोरोनाचा (Corona pandemic) काळ हा फार अडचणींचा आहे. अनेक जण कोरोनामुळे घरातच आहेत, तर अनेक लोकांनी कोरोनामुळे (corona) आपल्या जवळची लोकं गमावलीत. त्यामुळे दुःख, निराशा, अस्वस्थता, वेदना आणि जवळच्या व्यक्तीचं जाणं अशा अनेक त्रासांना सामोरं जावं लागतंय. मात्र अशा कठीण काळात स्वतःला सांभाळणं, सावरणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला आनंदी राहावं (Live happy during corona pandemic) लागेल. तसंच स्वतःची काळजी घेत मित्र आणि नातेवाईकांचा आधार बनावं लागेल.

या कठीण काळात आपलं मानसिक आरोग्य (Mental health) कसं सुधारता येईल, यासाठी News18 Hindi च्या असिस्टंट एडिटर पूजा प्रसाद यांनी Let Us Talk च्या फाउंडर आणि इमोशनल-मेंटल वेल बिइंग एक्सपर्ट कंचन राय यांच्याशी फेसबुक लाइव्ह वरून संवाद साधला. कंचन यांनी अशा कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही टीप्स सांगितल्या. त्या टीप्सचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात करू शकता.

हे वाचा - ही गोष्ट बनेल तुमच्या मनाचा आरसा; तणाव आणि एकटेपणा दूर करण्यासाठी अवश्य बाळगा जवळ

कंचन यांच्या मते, माणसाचं स्वतःवर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे या कठीण काळात तुम्हाला स्वतःला स्वतःच समजून घ्यावं आणि समजवावं लागेल.

कंचन राय म्हणाल्या, "सध्याच्या काळात आनंदी राहणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला फक्त तुम्हीच खूश ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल. तुम्ही स्वतःला कायम पॉझिटिव्ह ठेवू शकत नाही. मात्र डोक्यात सुरू असलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करा आणि ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याचाही विचार करा. आपल्या डोक्यात आणि मनात येणाऱ्या विचारांना अनुभवा आणि तुमच्या मनात काय चाललं आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तसंच तुमच्या डोक्यात असे विचार का येत आहेत, याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली, तर परिस्थितीचा सामना तुम्ही सहज करू शकाल. आधी प्रॉब्लेम आहे हे मान्य करा आणि त्यानंतर त्यावर उपाय (remedies) शोधा"

"आता परिस्थिती बदलली आहे. तणावात असल्यास आधीसारखं तुम्ही मित्र-मैत्रिणींना (Friends)भेटू शकत नाही, त्यांच्यासोबत वेळ घालवू शकत नाही. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सचे पालन करून घरीच थांबा. एकटेपणा घालवण्यासाठी स्वतःला कामात व्यस्त ठेवा. तुमच्या आतील भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करा". असा सल्ला त्यांनी दिला आहे.

हे वाचा - कोरोनापासून चिमुकल्यांचा बचाव कसा कराल? तज्ज्ञांनी पालकांना सांगितला मार्ग

तुमच्यासोबत काही वाईट झालंय किंवा जवळचा एखादा व्यक्ती सोडून गेला असेल तर डिप्रेस होण्याऐवजी मनात पॉझिटिव्ह विचार आणा. चांगल्या आठवणी आठवा आणि खूश राहण्याचा प्रयत्न करा, असं त्या सांगतात.

कंचन राय म्हणाल्या, "स्वतःच्या जीवलगांना, जवळच्या लोकांना गमवण्याचं दुःख खूप मोठं असतं मात्र जवळच्या एखाद्या व्यक्तीला गमावल्यानंतर स्वतःच्या भावना मोकळ्या करणं गरजेचं आहे. त्या दुःखांना वाट मोकळी करून द्या. वाटल्यास तुम्ही जोरात रडून घ्या. रडल्याने मन हलकं होतं. लोकांसोबत तुमचे विचार शेअर करा. फोनवर मित्रांशी बोला किंवा सोशल मीडियावर व्यक्त व्हा"

मेडिटेशन करा.

कंचन राय यांच्या मते, मेटिडेशन करणं आणि जिममध्ये वर्कआऊट करणं हे टेक्निकली सारखंच आहे. हे एका कोर्सप्रमाणे असून शरीर या गोष्टींना स्वीकारेपर्यंत त्यात नियमितता असली पाहिजे. मात्र कोणत्याही गोष्टीत ब्रेक (विश्रांती) पाहिजेच. ब्रेक आपली मेंटल हेल्थ (Mental health) आणि फिजिकल हेल्थ (Physical health) दोघांमध्ये समतोल ठेवतं. तसंच स्वतःला वेळ देणंही गरजेचं आहे. त्यामुळे एक टाईम टेबल बनवा आणि शरीराच्या अनुसार मेडिटेशन (Meditation) करा. मेडिटेशन जास्त वेळ केल्यास सगळं लवकर ठीक होतं, असं नसतं. तर, तुम्ही ते किती चांगलं करत आहात, त्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. मेडिटेशन करण्यासाठी कोणतीच वेळ नसते. तुम्हाला जेव्हा तणाव जाणवेल तेव्हा तुम्ही मेडिटेशन करू शकता. त्यासाठी दिवस – रात्र असं बंधन नसतं. तसंच मेडिटेशनसाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता, असंही कंचन राय सांगतात.

First published:
top videos

    Tags: Corona, Coronavirus, Covid-19