वेदना आणि सूज; तुम्हाला माहिती नसलेली Diabetes ची 4 लक्षणं

वेदना आणि सूज; तुम्हाला माहिती नसलेली Diabetes ची 4 लक्षणं

डायबेटिजचा (diabetes) परिणाम हाडे, स्नायू आणि सांध्यांवरही होतो. त्यामुळे सांधेदुखी हे मधुमेहाचं लक्षण आहे.

  • Last Updated: Dec 16, 2020 08:45 PM IST
  • Share this:

मधुमेह (Diabetes) होण्याची अनेक कारणं आहेत. पण जर सांध्यामध्ये विनाकारण वेदना होत असतील तर ते मधुमेहाचं लक्षण असू शकतं. सांधेदुखीची समस्या उद्भवल्यास त्वरित मधुमेहाची तपासणी करावी. अन्यथा नंतर मधुमेहाची पातळी वाढण्याने शरीराचं अधिक नुकसान होऊ शकते. त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मधुमेहाचा परिणाम शरीराच्या हाडे, स्नायू, अस्थिबंधन आणि सांधे इत्यादींवर होतो. मधुमेहाचा केवळ हाडे आणि स्नायूंवरच नव्हे तर शरीराच्या इतर भागांवरही नकारात्मक प्रभाव पडतो. मधुमेहाच्या रुग्णांना सतत वेदना होत असतात.

मधुमेह रुग्णांना हाताच्या स्नायू दुखण्यासारख्या समस्या अधिक असतात. याशिवाय हाताच्या बोटांमध्ये चुरचुरणं, मुंग्या येणं यासारख्या समस्या आहेत आणि हातांना सुन्नपणादेखील जाणवतो आणि याचं कारण आहे, नसा आकुंचिक होणं. मधुमेहाच्या रुग्णांच्या नसा आकुंचित होतात आणि त्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो, ज्यामुळे शरीराचा काही भागात रक्त पोहोचत नाही आणि वेदना त्याच भागात सुरू होतात.

हाताच्या बोटांना वेदना आणि सूज

myupchar.com चे डॉ. अनुराग शाही यांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांना हाताच्या बोटांना सूज येणे आणि वेदना होण्याचा त्रास होतो. या व्यतिरिक्त बोटे हाताकडे वळायला लागतात आणि सरळ झाल्यावर वेदना होतात. अशा लोकांनी भविष्यात मधुमेहाविषयी सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

हाताच्या हालचालीत समस्या

मधुमेह असलेल्या लोकांना हाताच्या हालचालींमध्ये अडचण येते, त्याचबरोबर हाताची त्वचा देखील ताठ होते. याला वैद्यकीय भाषेत डायबेटिक हँड सिंड्रोम म्हणतात. जेव्हा रुग्णाची साखरेची पातळी अनियंत्रित असते तेव्हा अशा प्रकारच्या लक्षणे वारंवार दिसतात, म्हणून साखर वेळेवर तपासली पाहिजे.

खांद्यात घट्टपणाची समस्या

खांद्यावर घट्टपणा देखील मधुमेहाचे आणखी एक कारण आहे. खांद्यांमध्ये देखील जडपणा जाणवतो. या समस्येस फ्रोजन शोल्डर म्हणतात. यात, रुग्णाला तीव्र वेदना होते आणि यामुळे हाताच्या हालचालींमध्ये अडचण येते. कोणतीही कामे करण्यासाठी रुग्णाच्या हातात वेदना होतात.

सांध्यांची समस्या

जेव्हा रक्तवाहिन्या खराब होतात आणि सांध्यातील अस्थिबंधन खराब होते तेव्हा ही समस्या अधिक होते. त्याला न्यूरोपॅथिक समस्या देखील म्हणतात. यात सांध्यामध्ये मुंग्या आल्यासारखे वाटते. यामुळे पायांवर वाईट परिणाम होतो. बहुतेक वेळा असे दिसून येते की मधुमेहाच्या रुग्णांना पाय दुखण्याची तक्रार असते.

हे वाचा - 

myupchar.com चे डॉ. केएम नाधीर यांनी सांगितलं, सांधेदुखी एक सामान्य समस्या आहे. ह्या समस्येतील वेदना तीव्र आणि झिणझिण्या आणणाऱ्या असू शकतात. जर सांधेदुखी होत असेल तर प्रथम डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टर जे सल्ला देतात तो नियमितपणे पाळा, वेळेवर औषधे घ्या. तसेच, चांगला आहार ठेवा, याचा फायदा होईल. मधुमेहाच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. मधुमेह हा एक रोग आहे जो शरीरातील इतर अनेक रोगांना जन्म देतो. म्हणूनच याबद्दल नेहमी जागरूक राहिले पाहिजं.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - सांधे दुखी: लक्षणे, कारणे, उपचार ...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 16, 2020, 8:45 PM IST

ताज्या बातम्या