Home /News /lifestyle /

Joint Pain in Winter: थंडीत सांधे, हाडे दुखण्याचा त्रास वाढलाय का? हे 5 उपाय ठरतील गुणकारी

Joint Pain in Winter: थंडीत सांधे, हाडे दुखण्याचा त्रास वाढलाय का? हे 5 उपाय ठरतील गुणकारी

थंडीत अनेक लोकांना सांधे आणि हाडे दुखण्याचा त्रास सुरू होतो. संधिवात असलेल्या लोकांसाठी हा काळ खूप कठीण असतो. तापमानात घट होताच सांधे जखडून जातात आणि हाडांमध्ये वेदना सुरू होतात.

    नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : हिवाळ्याच्या काळात (Winter Session) अनेक लोकांना सांधे आणि हाडे दुखण्याचा त्रास सुरू होतो. संधिवात असलेल्या लोकांसाठी हा काळ खूप कठीण असतो. तापमानात घट होताच सांधे जखडून जातात आणि हाडांमध्ये वेदना सुरू होतात. वृद्ध लोकांना तर उठणं-बसण्याचा त्रास सहन करावा लागतो. थंडीच्या मोसमात सांधेदुखीच्या रुग्णांना काही टिप्स दिलासा देऊ शकतात, असे डॉक्टरांचे (Joint Pain in Winter) म्हणणं आहे. शरीर उबदार ठेवा- सांधेदुखीच्या रुग्णांनी या ऋतूत खूप काळजी घ्यावी. आपले संपूर्ण शरीर उबदार कपड्यांनी झाकून ठेवावं. शरीर उबदार ठेवल्यानं सांधेदुखी कमी होईल. थंडीत उबदार कपड्यांनी अंग झाकून राहील याची काळजी घ्यावी. पायात मोजे घाला. थंडीत अशी सर्वसाधारण खबरदारी घेतल्यानं सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. बॉडी हायड्रेट - हिवाळ्यात आपल्याला कमी तहान लागते, पण याचा अर्थ आपल्या शरीराला पाणी कमी लागते, असा होत नाही. कोणत्याही ऋतूत शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, ज्यामुळे आपले शरीर अधिक सक्रिय राहते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पाण्याऐवजी चिकन सूप, भाज्यांचे सूप किंवा इतर पेयांनी शरीर हायड्रेट ठेवू शकता. वजन नियंत्रित ठेवा- लठ्ठपणा किंवा जास्त वजनामुळे लोक कमी अॅक्टीव राहतात. सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी आपले वजन नेहमी नियंत्रणात ठेवावे. गरज भासल्यास वजन कमी करण्यासही सुरुवात करावी. यासाठी तुम्ही कार्डिओ, वजन कमी करण्याचे प्रशिक्षण किंवा विशेष आहाराची मदत घेऊ शकता. शरीराच्या वजनाचा संपूर्ण परिणाम आपल्या सांधे आणि हाडांवर पडतो. त्यामुळे त्याबाबत गाफील राहू नका. हे वाचा - Weight Loss Tips : रात्री झोपेतच तुमचं वजन होऊ लागेल कमी, हे 5 सोपे उपाय ठरतील फायदेशीर गरम पाण्याने अंघोळ करा- हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केल्यानेही खूप आराम मिळतो. आर्थरायटिस फाउंडेशनच्या मते, गरम पाण्याने सांधेदुखीच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळतो. यामुळे तुमच्या सांधे आणि स्नायूंना खूप आराम मिळतो. लक्षात ठेवा की आपल्या शरीराचे तापमान सामान्य होण्यास वेळ लागतो, म्हणून थंड तापमानातून लगेच गरम पाण्यानं आंघोळ करण्याची चुकीचे ठरू शकते. हे वाचा - एक झाड वाचवण्यासाठी 25 कोटींची इमारत केली Modify, तयार झालं सुंदर घर; पाहा PHOTOS व्हिटॅमिन डी- हिवाळ्यात व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे आपले शरीर वेदनांबाबत अधिक संवेदनशील असते. व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे तुम्हाला ऑस्टिओपोरोसिसचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात काही काळ उन्हात राहण्याचा प्रयत्न करा. दिवसातून फक्त 15 मिनिटे सूर्यप्रकाश घेतल्याने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन-डी मिळते. यासाठी तुम्ही अंडी, मशरूम, फॅटी फिश, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ देखील घेऊ शकता. (सूचना: ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Winter, Winter session

    पुढील बातम्या