डिप्रेशनग्रस्तांसाठी खास Nasal Spray; आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यापासून रोखणार

डिप्रेशनग्रस्तांसाठी खास Nasal Spray; आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यापासून रोखणार

जॉन्सन अँड जॉन्सनने (johnson-and-johnsons) तात्काळ असा परिणाम देणारा Anti-depressant Nasal Spray आणला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 06 ऑगस्ट : Nasal Spray म्हटलं की आपल्याला सामान्यपणे सर्दी किंवा श्वासासंबंधी समस्यांवर उपाय इतकंच माहिती आहे. मात्र आता हाच छोटासा नेजल स्प्रे आता आत्महत्येवर आळा घालण्यात मदत करणार आहे. ज्यांच्या मनात आत्महत्येसारखे विचार येतात त्यांना टोकाचं पाऊल उचलण्यापासून रोखणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मानसिक आरोग्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली. सुशांतच्या आत्महत्येनंतर कित्येकांनी आत्महत्या केल्या. सध्या कोरोना लॉकडाऊनचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आहे. अनेकांना डिप्रेशनसारख्या गंभीर समस्येनं ग्रासलं आहे. यामधून लोकं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात आणि हेच रोखण्यासाठी आता जॉन्सन अँड जॉन्सनने (johnson-and-johnsons) एक अँटी-डिप्रेसन्ट नेजल स्प्रे (Anti-depressant Nasal Spray) आणला आहे.

ब्लुमबर्गच्या रिपोर्टनुसार वाढती आत्महत्येची प्रकरणं लक्षात घेता अशा लोकांसाठी जॉन्सन अँड जॉन्सनने स्प्रावेटो (Spravato) नेजल स्प्रे तयार केलं आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सनच्या स्प्रावेटोला मंजुरी दिली आहे. ज्या लोकांच्या मनात आत्महत्येसारखे विचार येतात आणि त्या दिशेनं पावलं उचलतात, त्यांच्यासाठी हे नेजल स्प्रे उपलब्ध असेल.

हे वाचा - चीनमधील कोरोनामुक्त रुग्णांची आता अशी अवस्था; वाचून बसेल धक्का

मार्च 2019 मध्ये डिप्रेशनवरील उपचारासाठी स्प्रावॅटोला मंजुरी देण्यात आली त्यानंतर 6000 लोकांनी हा स्प्रे वापरला. आत्महत्येसारखा विचार येणाऱ्या डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांवर याचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासात ज्या रुग्णांना हे औषध देण्यात आलं त्यांच्यामधील आत्महत्येसारखा गंभीर विचार कमी झाला. आत्महत्येसारखा विचार येणाऱ्यांसाठी या नेजल स्प्रेच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे.

डिप्रेशनमध्ये असेलल्या रुग्णांसाठी इतर अँटिडिप्रेसंट आहेत, मात्र स्प्रावेटो त्यापेक्षा वेगळं आहे.  इतर अँटिडिप्रेसंटचा परिणाम व्हायला आठवडा लागतो मात्र याचा परिणाम लगेच दिसून येतो. स्प्रावेटो हे अँथेसेटिक केटामाइनप्रमाणेच आहे. हे इतर अँटिडिप्रेसंटपेक्षा वेगळं आहे कारण ते मेंदूतील सेराटोनन किंवा norepinepherine वर परिणाम करण्यापेक्षा ग्लुटामेटवर परिणाम करतं. हे औषध रुग्णांवर इतक्या लगेच कसं काय परिणाम करतं याचा अभ्यास अद्यापही सुरू आहे.

हे वाचा - लॉकडाऊनमध्ये शरीरासह मन कसं ठेवाल फिट; अभिनेत्री दीपिका पदुकोणने दिल्या टीप्स

जॉन्सन अँड जॉन्सनच्या न्यूरोसायन्सेस मेडिकल युनिट्सचे उपाध्याक्ष मिशेल क्रेमर म्हणाले, "सध्या 17 दशलक्ष अमेरिकनपैकी 11% ते 12% लोक गंभीर अशा डिप्रेशनचे शिकार आहेत"

येल डिप्रेशन रिसर्च प्रोग्रामचे संचालक आणि ट्रायलचे अभ्यासक गेरर्ड सॅनकोरा म्हणाले, "रुग्णामध्ये गंभीर असे डिप्रेशन आल्यानंतर त्यामुळे येणारे गंभीर अशा विचारांवर तात्काळ लगाम घालण्यासाठी या औषधाची मदत होऊ शकते"

Published by: Priya Lad
First published: August 6, 2020, 6:41 PM IST

ताज्या बातम्या