• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • रेल्वेमध्ये नोकरीची संधी; 146 पदांसाठी भरती सुरु

रेल्वेमध्ये नोकरीची संधी; 146 पदांसाठी भरती सुरु

वैदयकीय क्षेत्रात मनुष्यबळ वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वेनंही(Indian Railway)बेरोजगारांना दिलासा देणारी एक बातमी दिली आहे.

 • Share this:
  मुंबई 7 मे: जागतिक कोरोना साथीच्या (Corona Pandemic)काळात सध्या अनेकांच्या नोकऱ्या(Jobs)गेल्या असून अनेकजण बेरोजगार आहेत. नवीन भरतीचे प्रमाणही अत्यल्प आहे. त्यामुळे असंख्य पात्र उमेदवार नोकरीच्या संधीची आतुरतेनं वाट पाहत आहेत. बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी सरकारी पातळीवर कर्मचारी भरतीला चालना देण्यात येत आहे. विविध विभागांमध्ये कर्मचारी भरती केली जात आहे. अलीकडेच वैदयकीय क्षेत्रात मनुष्यबळ वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वेनंही(Indian Railway)बेरोजगारांना दिलासा देणारी एक बातमी दिली आहे. भास्कर डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार,रेल्वे मंत्रालयांतर्गतयेणाऱ्या भारतीयरेल्वेतांत्रिक आणि आर्थिक सेवाविभागानं(RITES)अॅप्रेंटिसपदाच्या(Apprentice)प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एकूण146पदांच्याभरतीसाठी अर्ज मागवलेआहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया12एप्रिलपासून सुरू झाली असूनती 12मेपर्यंत सुरू राहणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्जकरण्याची सुविधा देण्यात आली आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनीएनएटीएस पोर्टलकिंवाmhrdnats.gov.inया वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतरritesapprenticerecruitment2021@gmail.comवर अर्जपाठवायचे आहेत. पदसंख्या आणि पात्रता :एकूण 146 पदांवर भारती करण्यात येणार असून,यातइंजिनीअरिंग डिग्री(Engineering Degree),डिप्लोमा(Diploma),आयटीआय(ITI)आणि इतर पदवीधर(Graduate)यांच्यासाठी वेगवेगळ्या जागा उपलब्ध आहेत. इंजिनीअरिंग डिग्री अर्थातअभियांत्रिकी पदवीप्राप्त केलेल्या उमेदवारांसाठी 76,पदवीधर उमेदवारांसाठी 20,इंजिनीअरिंगडिप्लोमा अर्थात अभियांत्रिकी पदविका प्राप्त उमेदवारांसाठी 15 तर आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी 35 जागा उपलब्ध आहेत. त्या त्या विभागातील पदासाठी आवश्यक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. इंजिनीअरिंग डिग्री अर्थातअभियांत्रिकी पदवीप्राप्त केलेल्या उमेदवारांसाठीच्या जागेसाठी अर्ज केला असेल तरउमेदवारांकडेचार वर्षांचीइंजिनीअरिंगडिग्री असणे आवश्यक आहे. बी.ए,बीसीए किंवा बीकॉमझालेलेउमेदवार अभियांत्रिकीसाठीनसलेल्या पदांसाठी अर्ज करू शकतात. इंजिनीअरिंगडिप्लोमाधारक आणिआयटीआयउत्तीर्ण उमेदवारांकडे संबधित संस्थेचे अधिकृतप्रमाणपत्रअसणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया: या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड आवश्यक पात्रतेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. अधिक माहितीसाठीयासाठी जारी करण्यात आलेलंऑफिशियल नोटिफिकेशननीट वाचा. स्टायपेंड:या पदासाठीपदवीधरअप्रेंटिसला दर महा 14 हजाररुपये,डिप्लोमाधारकाला 12 हजार रुपये,आयटीआयउत्तीर्ण उमेदवाराला10हजार रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे.
  First published: