रांची, 11 सप्टेंबर : हिरोच्या वडिलांना हिरोईनची आई आवडते, असं आपण फिल्ममध्ये अनेकदा पाहिलं आहे. मात्र असं प्रत्यक्षात घडलं आहे ते झारखंडमध्ये. 55 वर्षांच्या व्यक्तीचं आपल्या मुलाच्या सासूवरच प्रेम जडलं. त्याने फक्त प्रेम केलं नाही तर प्रेमात हद्द गाठली आहे. मुलाच्या सासूसाठी त्याने मुलासह त्याच्या आईला म्हणजे बायकोलाही सोडलं आहे.
झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील टिकुलडीहा गावा राहणारे अब्दुल शेख साह. आपल्या मधल्या मुलाच्या प्रेमात पडले. अब्दुल यांनी पत्नी असतानाही त्यांनी मुलाच्या सासूवर प्रेम केलं. 40 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं, मुलं झाली, मुलांची लग्न झाली. मात्र मुलाच्या सासूच्या प्रेमात ते इतके वेडे झाले की आपला 40 वर्षांचा संसार त्यांनी मोडला आहे. पत्नी आणि मुलांना सोडून दिलं आहे.
आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे.
हे वाचा - पत्नीला प्रियकरासोबत रंगेहात पकडलं, पतीनं 1 मिनिटात 31 वेळा चपलेनं केली धुलाई
अब्दुल यांच्या पत्नीने त्यांच्या प्रेमाला विरोध केला, त्यांच्या मुलानंही ते योग्य करत नसल्याचं सांगत त्यांच्याशी भांडण केलं. तर रागात अब्दुल यांनी ज्या भारतात तिहेरी तलाकवर बंदी असताना तलाक... तलाक... तलाक... म्हणत आपल्या पत्नीला सोडून दिलं. आपल्या पत्नीसह घरातील सर्व सदस्यांना घराबाहेर काढलं. घरातील बहुतेक सामान आणि दागदागिने आपली प्रेमिका म्हणजेच मुलाच्या सासूला दिले.
हे वाचा - यालाच म्हणतात खरी माणूसकी! मेट्रोमधला हा VIRAL VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
संपूर्ण कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दिली आणि कारवाईची मागणी केली आहे. याबाबत अब्दुल यांची चौकशी केली असता त्यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळले. आपण असं काहीच केलं नाही, असं काहीच झालं नाही, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणात आता अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.