मुंबई, 30 नोव्हेंबर : प्रेमाची, आनंदाची, जादुई मिठी म्हणजे झप्पी. ही झप्पी देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांनाही आनंद देणारी असते. देशातील आदिवासी परिसरात, दुर्गम भागात राहणाऱ्या अनेक भागातील महिलांना आनंद देण्यासाठी झप्पी मार्केट सुरू झालं आहे. या झप्पीच्या माध्यमातून महिलांनी बनवलेल्या ज्वेलरी ते गृह सजावटीपर्यंत अनेक वस्तू मुंबई आणि ठाणेकरांना खरेदी करण्याची संधी मिळाली आहे.
कशी सुचली कल्पना?
झप्पी स्टोरची कल्पना ही बिपीन जोशी यांची आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या महिलांकडे कला असते, कौशल्य असतं. पण, त्यांना वाव देणारे मार्केट नसतं. त्यामुळे त्यांना अनेकदा शेतीवर अवलंबून राहवं लागतं. अपुऱ्या साधनांमुळे त्यांना सिझनल उत्पन्न मिळतं. त्यांची ही अडचण दूर व्हावी, त्यांना नवी संधी मिळावी म्हणून झप्पी स्टोर सुरू करण्यात आले आहे.
झप्पी स्टोअर मध्ये काय मिळतं?
गृहसजावटीसाठी लागणारे तोरण, बांबूच्या ज्वेलरी,कँडल, वॉलपीस, हँगर्स, वारली पेंटिंग ट्रे, बेडशीट्स, पर्स, झूट बास्केट्स, सॉफ्ट खेळणी, पेन्सिल्स, डायरी अशा अनेक प्रकारच्या वस्तू येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसंच निरनिराळे सण, उत्सवाच्या निमित्तानं लागणाऱ्या आकर्षक वस्तूही इथं मिळतात.
मलावीचा हापूस आंबा मुंबईत दाखल, हिवाळ्यात चाखा रसाळ चव, पाहा video
कोणत्या राज्यांमधील वस्तू मिळतात?
महाराष्ट्रासह, केरळ, आसाम, हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांमधील हॅन्डमेड वस्तू इथं मिळतात. त्याचबरोबर महिला बचत गट तसंच ग्रुपमध्ये काम करणाऱ्या महिलांशी संपर्क साधून त्या वस्तूही थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचं काम या स्टोरच्या माध्यमातून होतं.
काय आहेत दर?
झप्पी स्टोअरमध्ये 50 रुपयांपासून 2500 रुपयांपर्यंत अनेक लहानमोठ्या वस्तू मिळतात. यापैकी 70% ते 80% रक्कम ही या वस्तू बनवणाऱ्या महिलांना मिळते. जास्त नफा न कमावता हे स्टोर चालवलं जातं.
काय सांगता! फक्त अर्ध्या तासांमध्ये 'ती' काढते पिंपळाच्या पानावर अप्रतिम चित्रं, Video
गुगल मॅपवरून साभार
कुठे आहे स्टोर?
मुंबईतील पवई तसंच ठाण्यातील घंटाळी भागात झप्पी स्टोर आहे. आपल्या देशात अनेक लोकं मेहनत करतात पण या मेहनतीच्या बदल्यात काही जणांना भरपूर मिळतं तर अनेकांना काहीच मिळत नाही. त्यांच्याकडे वस्तू निर्मितीचं स्किल असतं पण विकण्याचं स्किल नसल्यानं त्यांना मार्केट मिळत नाही. याच लोकांशी संपर्क साधून आम्ही त्या वस्तू मागवतो आणि त्यांना मार्केट उपलब्ध करून देतो, असं या स्टोरचे मालक बिपीन जोशी यांनी सांगितलं.
अधिक माहितीसाठी संपर्क
बिपीन जोशी - +919223369029
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.