मुंबई, 26 नोव्हेंबर : जेनिफर लोपेझने (jennifer lopez) नेहमीच स्टाईलमध्ये सर्वात टॉपवर कसं राहायचं हे दाखवून दिलं आहे. या गायिकेने तिच्या आगामी इन द मॉर्निंग (In the morning) या अल्बमच्या रिलीजची तयारी करतानाच त्याचे कव्हर पिक्चर इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. तिच्या लेटेस्ट सोशल मीडिया पोस्टने पारा चांगलाच वाढवला आहे. कव्हर पिक्चरमध्ये तिचा बोल्ड न्यूड जलवा ती दाखवत आहे. न्यूड मेकअप आणि वेट वेव्हजसह कॅमेर्यासाठी लूक देताना ती दिसते आहे.
JLo चा सिंगल, इन द मॉर्निंग, शुक्रवारी 27 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. त्याआधी तिनं याची झलक दाखवली आहे, याचं पोस्टर शेअर केलं आहे. तिनं त्या पोस्टला हे कॅप्शन दिलं आहे, "सरप्राईज! शुक्रवारी लाँच होणाऱ्या माझ्या सिंगल #InTheMorning चं ऑफिशियल कव्हर आर्ट इथं पाहा"
तिनं इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओ पोस्टमध्ये तिच्या न्यूड फोटोशूटची झलकदेखील शेअर केली आहे. ज्यात बॅकग्राऊंड स्कोर म्हणून तिच्या सिंगल इन द मॉर्निंग गाण्याचं संगीत आहे.
तिचे सहकारी आणि मित्र या नवीन प्रयोगाबद्दल तिची खूप प्रशंसा करत आहेत. नेटिझन्ससुद्धा तिच्या या रुपाला पाहून अचंबित झाले आहेत आणि या 51 वर्षीय स्टारला जॉर्जस, क्वीन आणि लिजेंड म्हणत आहेत. कव्हर पिक्चरमध्ये गायिकेच्या हातातली रिंग फियान्से अॅलेक्स रॉड्रिग्जने तिला भेट म्हणून दिली आहे.
या महिन्याच्या सुरूवातीला JLo ला ई पीपल्स चॉईस अवॉर्डमध्ये पीपल्स आयकन ऑफ 2020 म्हणून नावाजलं गेलं. हा अवॉर्ड स्वीकारत असताना तिनं सर्व वयोगटातील आणि सर्व वर्णाच्या स्त्रियांना आवाहन केलं होतं. ती म्हणाली, "एक लॅटिन आणि एक महिला म्हणून संधी मिळवण्यासाठी आपल्याला दुप्पट कष्ट करावे लागतात. कधीकधी माझी मोठी स्वप्नX आणि माझ्या महत्वाकांक्षा यांनी माझ्या जवळील लोक निराश झालं आहेत.