जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीशी घटस्फोट घेऊन ही महिला बनली 'इतक्या' कोटींची मालकीण

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीशी घटस्फोट घेऊन ही महिला बनली 'इतक्या' कोटींची मालकीण

त्या कादंबरीकार आहेत. त्यांनी द टेस्टिंग आॅफ लुथर अलब्राइट अशी बरीच पुस्तकं लिहिलीयत.

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल : जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोसच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर त्यांची पत्नी मॅकेंजी जगातली चौथी श्रीमंत महिला झालीय. त्यांच्या वाट्याला ई काॅमर्स कंपनी अ‍ॅमेझाॅनचा 4 टक्के हिस्सा आलाय. त्याची आताची किंमत 36.5 अब्ज डाॅलर म्हणजे 2.52 लाख कोटी रुपये आहे. मॅकेंजीला त्यांचा हिस्सा दिल्यानंतरही जेफ बेजोस यांच्यांकडे 114 अब्ज डाॅलर म्हणजे 7.87 लाख कोटी रुपये संपत्ती राहिलीय. म्हणजे अजूनही ते जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

कशी झाली जगातली तिसरी श्रीमंत महिला?

फोर्ब्स मॅगझीनप्रमाणे मॅकेंजी यांनी 50 टक्के शेअर घेतले असते, तर बेजोस जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले नसते. जेफ बेजोस आणि मॅकेंजी यांनी जानेवारीत घटस्फोटाची घोषणा केली. त्यावेळी असा अंदाज होता की मॅकेंजी जगातली सर्वात श्रीमंत महिला होईल. दोघांनी 1994मध्ये लग्न केलं. दोघांना 4 मुलं आहेत.

कोण आहेत मॅकेंजी?

त्या कादंबरीकार आहेत. त्यांनी द टेस्टिंग आॅफ लुथर अलब्राइट अशी बरीच पुस्तकं लिहिलीयत. 1992मध्ये नोकरीसाठीच्या इंटरव्ह्यू दरम्यान जेफ बेजोससोबत त्यांची भेट झाली. त्या हेज फंड कंपनी डी ई शाॅमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेल्या होत्या. जेफ यांनीच त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता.

कोण आहेत जेफ बेजोस?

जेफ बेजोस ई काॅमर्स कंपनी अ‍ॅमेझाॅनचे संस्थापक आणि सीईओ. त्यांचा जन्म न्यू मॅक्सिकोमध्ये झाला. 1994मध्ये अ‍ॅमेझाॅनचा सुरुवात झाली. सुरुवातीला ही कंंपनी फक्त पुस्तकं विकायची. मग हळूहळू कंपनी इतर गोष्टीही विकू लागली. 2018मध्ये कंपनीची व्ह्यॅल्यू 900 बिलियन डाॅलर्स आहे. जेफ बेजोस यांची स्वत:ची संपत्ती 150 बिलियन डाॅलर्स आहे. त्यांनी बिल गेट्सलाही मागे टाकलं.

घटस्फोटाचा कायदा काय आहे?

वाॅशिंग्टनच्या कायद्यानुसार लग्नानंतर मिळवलेली संपत्ती घटस्फोटानंतर समान विभागून दिली जाते. असं झालं असतं तर जेफ बेजोस जगातल्या श्रीमंतांच्या यादीत चौथे आले असते.

दोघांच्या मध्ये झाला हा करार

या करारानुसार मॅकेंजी यांनी संयुक्त शेयर्समधले 75 टक्के शेअर्स बेजोसना देण्यास तयार झाल्या आणि स्वत:कडे 25 टक्के शेअर्स ठेवले. दोघांकडे अ‍ॅमेझाॅनचे 16 टक्के शेअर्स होते. त्यातले 4 टक्के मॅकेंजी यांच्याकडे आहेत. मॅकेंजींनी आपल्या हिश्श्याचे व्होटिंग राइट्स बेजोस यांना दिलेत.

बेजोस यांचं वर्तमानपत्र वाॅशिंग्टन पोस्ट आणि स्पेस कंपनी ब्लू ओरिजिन यांच्यातला वाटा मागितला नाही. बेजोस यांच्याकडे अ‍ॅमेझाॅनचे 12 टक्के शेयर्स राहिलेत.

VIDEO: राहुल गांधींनी पुण्याच्या ईशाला दिली लोकसभेची ऑफर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2019 01:43 PM IST

ताज्या बातम्या