मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जेफ बेझोसचं कमाल Ice-cream प्रेम! 24 तास कधीही खाता यावं म्हणून घरातच लावलं लाखोंचं मशीन

जेफ बेझोसचं कमाल Ice-cream प्रेम! 24 तास कधीही खाता यावं म्हणून घरातच लावलं लाखोंचं मशीन

जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी 24 तास घरातच आइस्क्रिम मिळावी यासाठी सीव्हीटी सॉफ्ट सर्व्ह (CVT Soft Serve) कंपनीची लाखो रुपयांची मशीन घरातच बसवली आहे.

जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी 24 तास घरातच आइस्क्रिम मिळावी यासाठी सीव्हीटी सॉफ्ट सर्व्ह (CVT Soft Serve) कंपनीची लाखो रुपयांची मशीन घरातच बसवली आहे.

जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी 24 तास घरातच आइस्क्रिम मिळावी यासाठी सीव्हीटी सॉफ्ट सर्व्ह (CVT Soft Serve) कंपनीची लाखो रुपयांची मशीन घरातच बसवली आहे.

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : जगात क्वचितच एखादी व्यक्ती सापडेल जिला आइस्क्रीम (Ice-cream) आवडत नसेल? जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असेले अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Amazon founder Jeff Bezos) यानांही आइस्क्रीम खूप आवडतं. बेजोस यांनी आइस्क्रीमची इतकी (Ice-cream Love)आवड आहे की त्यांनी स्वतःच्या घरात आईस्क्रीम मशीन बसवलं आहे. बेझोस यांनी नुकताच सीव्हीटी सॉफ्ट सर्व्ह (CVT Soft Serve) या कंपनीकडून आपल्या घरी एक आइस्क्रीम मशीन बसवून घेतल आहे. ज्यामुळे त्यांना सॉफ्ट सर्व्हच आइस्क्रीम खात येतंय.

जेफ बेझोस यांनी त्यांच्या लॉस एंजेलिस मधील घरी हे मशीन बसवलं आहे. CVT Soft Serveचे संस्थापक जो निची यांनी इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. जेफ बेझोस हे पहिले निवासी ग्राहक असून आता त्यांना त्यांच्या घरी 24 तास सॉफ्ट सर्व्हिस आइस्क्रीम मिळू शकेल असं त्यांनी लिहीलं आहे.

(Second Home घेणार असाल तर या 10 गोष्टी कायम लक्षात ठेवा!)

लाखो रुपये किंमत

जेफ बेझोस यांनी आपल्या घरात बसवलेली आईस्क्रीम मशीन लाखो रुपयांची आहे. सीव्हीटी एक अशी सॉफ्ट-सर्व्ह आइस्क्रीम मशीन आहे. जिच्या पुढच्या बाजूला सॉफ्टसर्व्ह प्लेट आहे. जे एखाद्या फूड ट्रकसारखे दिसतं.

(..म्हणून महिला जगतात पुरुषांपेक्षा दीर्घायुषी; तुम्हाला माहिती आहेत का करणं ?)

त्याच्या सिंगल सर्व्हिंग मशीनची किंमत जवळपास 6 लाख रुपये आहे. तर जास्त फ्लेवर्स असलेल्या मोठ्या आकाराच्या फ्लोअर मॉडेलची किंमत सुमारे 17 लाख रुपये आहे. ही कंपनी रेस्टॉरंट आणि व्यावसायिक सप्लायर आहे. जेफ बेझोस यांच्या बेवर्ली हिल्स व्हिलामध्ये मशीन बसवणं हा या कंपनीचा पहिला प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे.

बेझोस यांची आइस्क्रीम आवड

एका बिझनेस मॅगझिननुसार जेफ बेझोस दर सेकंदाला 3,715 डॉलर म्हणजेच सुमारे 4 लाख रुपये कमवतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही फार मोठी गोष्ट नाही. बेझोस आपल्या विचित्र छंदांसाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आयक्रिम आवडीवर तर, लोक फार चर्चा करतात. Amazonच्या दुसऱ्या हेड क्वार्टर बिल्डींगच्या रचनेवर तर, लोकांनी सोशल मीडियावर बरेच कमेंट केले आहेत.

(फोडणीसोबत बोल्डनेसचा तडका; रेसिपीपेक्षाही HOT CHEF)

लोकांच्यामते ही बिल्डींगसुद्धा सॉफ्ट-सर्व्ह आइस्क्रीमसारखी दिसते. त्यामुळे त्यांचं आइस्क्रीम प्रेम दिसून येतंय. ब्लू ओरिजिन कंपनीची स्थापना करणारे आणि अंतराळयानाने अंतराळात प्रवास करणारे जेफ बेझोस सध्या त्यांच्या नवीन छंदामुळे हेडलाईन्समध्ये आहेत.

First published:
top videos

    Tags: Amazon, Lifestyle