Love Story : नेहरूंच्या बहिणीच्या प्रेमात मिळाली शिक्षा, नोकरीच काय शहरच लागलं सोडायला

Love Story : नेहरूंच्या बहिणीच्या प्रेमात मिळाली शिक्षा, नोकरीच काय शहरच लागलं सोडायला

जवाहरलाल नेहरू यांची बहीण आणि संयुक्त राष्ट्रातल्या पहिल्या राजदूत विजयालक्ष्मी पंडित जेव्हा 19 वर्षांच्या होत्या तेव्हा त्या एका मुस्लीम तरुणाच्या प्रेमात पडल्या होत्या.

  • Share this:

मुंबई, 21 फेब्रुवारी : जवाहरलाल नेहरू यांची बहीण आणि संयुक्त राष्ट्रातल्या पहिल्या राजदूत विजयालक्ष्मी पंडित जेव्हा 19 वर्षांच्या होत्या तेव्हा त्या एका मुस्लीम तरुणाच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांना त्या तरुणाशी लग्न करायचं होतं. पण अख्खा नेहरू परिवार विरोधात होता. कुटुंबाच्या दडपणामुळे विजयालक्ष्मी यांना आपला इरादा बदलावा लागला. त्या मुस्लीम तरुणालाही अलाहाबादच्या बाहेर पाठवण्यात आलं.

ते मुस्लीम तरुण कुणी साधेसुधे नव्हते. खूप बुद्धिमान होते. शिकलेले. त्यांनी अमेरिकेत भारताच्या स्वातंत्र्याच्या बाजूनं मोठं आंदोलन केलं होतं. पुढे स्वत: नेहरूंनी त्यांना इजिप्तचे राजदूत बनवलं होतं. त्यांच्या निधनानंतर विजयालक्ष्मी त्यांच्या कबरीवर फुलं वाहायच्या.

या तरुणाचं नाव होतं सय्यद हुसेन. ते बंगालच्या एका प्रतिष्ठित आणि समृद्ध कुटुंबातले होते. उच्च शिक्षित होते. जेव्हा मोतिलाला नेहरूंनी अलाहाबादहून इंडिपेंडंट नावाचं वर्तमानपत्र काढलं, तेव्हा त्यांना हुशार, समजूतदार संपादकाची गरज होती.

सय्यद हुसेन कोलकत्त्यात जन्मले होते. त्यांचे डील सय्यद मुहम्मद त्या काळात बंगालचे रजिस्ट्रार जनरल होते. त्यांचे वडील नवाब लतीफ खान बहादुर बंगालमध्ये शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते.

हुसेन यांचं उत्तम  वक्तृत्व

सय्यद हुसेन यांची भाषेवर पकड होती. 1909मध्ये ते अमेरिकेला कायद्याचा अभ्यास करायला गेले. त्यानंतर ते भारतीय विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद स्पर्धेसाठी लोकप्रिय झाले होते. 1916मध्ये त्यांनी बाँबे क्राॅनिकल वर्तमानपत्रात काम केलं. मुंबईच्या होम रुलमध्येही ते कार्यरत होते. 1918मध्ये होम रुलनं त्यांना सेक्रेटरी म्हणून इंग्लडला पाठवलं.

मोतीलाल नेहरूंच्या वर्तमानपत्राचे ते संपादक बनले

त्यावेळी सय्यद हुसेन यांचं व्यक्तिमत्त्व असं काही होतं की देशातले मोठे नेते त्यांच्या प्रेमातच होते. गांधीजींचेही ते लाडके होते. मोतीलाल यांनी त्यांना इंडिपेंडंट वर्तमानपत्राचे संपादक बनवलं.

कमी वेळेत सय्यद यांनी वर्तमानपत्र लोकप्रिय केलं. त्यावेळी विजयालक्ष्मी 19 वर्षांच्या होत्या. हुसेन 31 वर्षांचे होते. विजयालक्ष्मी त्यांच्याकडे प्रभावित झाल्या.

विजयालक्ष्मी प्रेमात पडल्या

विजयालक्ष्मी प्रेमात पडल्या. हुसेन यांनी सुरुवातीला विरोध केला. पण हळूहळू दोघंही प्रेमात बुडाले. अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. विजयालक्ष्मींनी घरीही आपण हुसेन यांच्याशी लग्न करणार असं सांगितलं.

घरी वडील आणि भाऊ जवाहरलाल यांना हे नातं पसंत नव्हतं. प्रचंड विरोध झाला. विजयालक्ष्मी ऐकायला तयार नव्हत्या. अशात हुसेन यांना वर्तमानपत्र आणि अलाहाबाद सोडायला भाग पाडलं गेलं.

अफेअरची चर्चा

विजयालक्ष्मी-हुसेन यांच्या अफेअरची चर्चा जोरदार होती. गांधीजीही विरोधात होते. नेहरू आणि गांधीजी यांनी वेगळ्या धर्मामुळे हा विरोध केला होता.  1920मध्ये हुसेन खिलाफत आंदोलनाचा भाग बनले. इंग्लडला गेले. तिथून त्यांनी अमेरिका गाठली. 1946पर्यंत ते तिथेच राहिले.

विजयालक्ष्मी यांचं लग्न मराठी ब्राम्हण वकिलाशी झालं

यानंतर नेहरू कुटुंबानं विजयालक्ष्मींसाठी वर शोधायला सुरुवात केली. 1921मध्ये महाराष्ट्रातले ब्राम्हण वकील रंजीत सीताराम पंडित यांच्याशी त्यांचं लग्न झालं. त्यांना तीन मुलं झाली. पण विजयालक्ष्मी हुसेन यांना आपल्या हृदयातून कधीच बाहेर काढू शकल्या नाहीत.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सय्यद हुसेन यांचं योगदान मोठं आहे.

1949मध्ये हुसेन यांचं निधन

हुसेन यांनी कधीच लग्न केलं नाही. ते इजिप्तचे राजदूत होते. तिथेच त्यांचं निधन झालं. राजकीय सन्मानात त्यांना निरोप देण्यात आला. विजयालक्ष्मी या धक्क्यातून बाहेर पडल्या नाहीत. अनेक वर्ष त्या हुसेन यांच्या कबरीवर फुलं व्हायच्या. एक प्रेमकहाणी अधुरीच राहिली.

First published: February 21, 2019, 8:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading