मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

स्टार क्रिकेटर जसप्रीत बुमराह स्ट्रेस फ्रॅक्चर; काय आहे हा आजार आणि त्याची लक्षणं? जाणून घ्या

स्टार क्रिकेटर जसप्रीत बुमराह स्ट्रेस फ्रॅक्चर; काय आहे हा आजार आणि त्याची लक्षणं? जाणून घ्या

Jasprit Bumrah

Jasprit Bumrah

जर तुम्ही देखील तुमच्या शरीरावर प्रमाणापेक्षा जास्त दबाव टाकलात तर या समस्येला बळी पडू शकता.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 30 सप्टेंबर : स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे भारतीय क्रिकेट टीममधील फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह आगामी टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. पुढील काही महिने तो ग्राउंडवर खेळताना दिसणार नाही. ही बातमी समोर आल्यानंतर प्रत्येकजण स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की ही समस्या जास्त धावणं किंवा शारीरिक हालचालींमुळे निर्माण होऊ शकते. जर तुम्हीदेखील तुमच्या शरीरावर प्रमाणापेक्षा जास्त दबाव टाकलात तर या समस्येला बळी पडू शकता. स्ट्रेस फ्रॅक्चर नेमकं कोणत्या कारणांमुळे होऊ शकतं, हा त्रास कोणाला होऊ शकतो आणि तो कसा टाळता येईल, या विषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे काय?

'वेब एमडी'ने दिलेल्या माहितीनुसार, स्ट्रेस फ्रॅक्चर ही सर्वसामान्य स्पोर्ट्स इंज्युरी आहे. अनेकदा खेळताना हाडं किरकोळ स्वरुपात फ्रॅक्चर होतात. हाडांमध्ये ही क्रॅक धावण्यामुळे किंवा वारंवार तणावामुळे उद्भवते. ही समस्या खूप वेदनादायी असते आणि ती पूर्ण बरी होण्यास बराच कालावधी लागतो. बहुतेक खेळाडूंना या समस्येचा सामना करावा लागतो. ही समस्या किरकोळ जरी वाटत असली तरी योग्य वेळी उपचार न केल्यास ती गंभीर होऊ शकते आणि प्रसंगी शस्त्रक्रियादेखील करावी लागू शकते. बहुतांश लोकांमध्ये ही समस्या पायाच्या खालच्या भागात उद्भवते.

'ही' आहेत स्ट्रेस फ्रॅक्चरची लक्षणं

स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे धावताना, चालताना किंवा व्यायाम करताना शरीराच्या त्या भागात तीव्र वेदना जाणवते. इतकंच नाही तर काही वेळ उभं राहिल्यानंतरही वेदना सुरू होतात. अनेकदा फ्रॅक्चर झालेल्या भागाभोवती सूज येते. जे लोक व्यायाम करताना सावधगिरी बाळगत नाहीत आणि जास्त तीव्रतेचे वर्कआउट करतात, त्यांना या समस्येचा धोका वाढतो. काही वेळा लोकांना हलक्या वेदना जाणवतात आणि एक्स-रे काढूनही त्यात स्ट्रेस फ्रॅक्चर दिसून येत नाही. अशा स्थितीत एमआरआय किंवा न्युक्लिअर बोन स्कॅनच्या मदतीनं निदान केलं जातं.

या समस्येची कारणं आणि ते टाळण्यासाठी उपाय

जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या क्षमतेपेक्षा जास्त धावण्याचा किंवा जास्त तीव्रतेचा व्यायाम करते, तेव्हा हाडांवर दबाव वाढतो. यामुळे हाडं फ्रॅक्चर होऊ शकतात. हाडांवर अतिदबाव वाढल्याने ही समस्या उद्भवते. महिलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. ऑस्टिओपोरोसिस आजाराचा सामना करत असलेल्या लोकांना हा त्रास होण्याची शक्यता असते. याशिवाय मद्यपान, ईटिंग डिसॉर्डर, जास्त प्रमाणात धावणं आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हा आजार होऊ शकतो. खराब दर्जाचे रनिंग शूज किंवा उपकरणांमुळेदेखील ही समस्या निर्माण होऊ शकते. ही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी क्षमतेनुसार शारीरिक हालचाली करणं गरजेचं आहे.

स्ट्रेस फ्रॅक्चरवर केले जातात 'हे' उपचार

आजार आणि रुग्णाच्या स्थितीनुसार स्ट्रेस फ्रॅक्चरवर उपचार केले जातात. या समस्येतून मुक्त होण्यासाठी उपचारांसोबत दीर्घ काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. वेदना दूर होण्यासाठी डॉक्टर काही औषधं देतात. याशिवाय अनेक पर्यायांचा वापर करून या समस्येतून मुक्त होता येतं. जर रुग्णाची प्रकृती जास्त बिघडली तर अशा स्थितीत शस्त्रक्रिया केली जाते. या आजारातून बरं होण्यासाठी सुमारे 6 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागतो.

ज्या बुमराहमुळे या फ्रॅक्चरबद्दल अनेकांनी इंटरनेटवर माहिती सर्च केली त्या बुमराहलाही लवकर बरं वाटावं, अशी प्रार्थना करायला हवी.

First published:

Tags: Sports, Top trending, Viral news