Home /News /lifestyle /

कसं शक्य आहे? गेली 12 वर्षे फक्त 30 मिनिटंच झोपते ही व्यक्ती; तरी म्हणे, मला काहीच त्रास नाही

कसं शक्य आहे? गेली 12 वर्षे फक्त 30 मिनिटंच झोपते ही व्यक्ती; तरी म्हणे, मला काहीच त्रास नाही

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ही व्यक्ती स्वत: ला कमी वेळ झोपण्याचं प्रशिक्षण देत आहे.

    टोकियो, 18 सप्टेंबर : जगातील बहुतेक लोकांना झोपायला आवडतं. बरेच लोक 8 तास झोपतात, तर दुसरीकडे काही लोक त्यापेक्षा जास्त झोपतात. साधारण 7 ते 8 तासांची झोप घेणे खूप गरजेचे असते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. नाहीतर आरोग्याच्या समस्या बळावतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका तरुण गेली 12 वर्षे दिवसातून फक्त अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे (Japanese man sleeps for 30 minutes) झोपतो, तरीसुद्धा त्याला काहीच त्रास नाही. जपानमध्ये राहणारे 36 वर्षांचे डेसुके होरी. जपान शॉर्ट स्लीपर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ते स्वतःला तसंच इतरांना कमी झोप घेण्यासाठी प्रशिक्षण देतात. गेल्या 12 वर्षांपासून स्वत:ला कमी वेळ झोपण्याचं प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी शरीराला अशा प्रकारे प्रशिक्षण दिलं आहे की ते फक्त 30 मिनिटं झोपतो. विशेष म्हणजे त्याला कसला थकवाही जाणवत नाही. त्यांचं शरीर आता कमी झोपेने व्यवस्थित राहू शकत आहे. डेसुके सांगतात की दिवसभरात अशी अनेक कामे आहेत, जी वेळेच्या कमतरतेमुळे आपण करू शकत नाहीत. म्हणूनच ते दिवस-रात्र कामासाठी योग्य वेळ मिळावा ते फक्त 30 मिनिटे झोपतात. हे वाचा - Eye Care Tips: डोळ्याचा मेकअप करताना 'ही' काळजी घ्या; नाही तर गमावून बसाल दृष्टी जपानमध्ये डेसुकेंबद्दल कळल्यावर सर्वांनाच धक्का बसला. एका वृत्तवाहिनीने त्यांच्या दाव्याची चाचणी घेण्यासाठी त्यांच्यावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला. याअंतर्गत चॅनेलने कॅमरासह 3 दिवस दाईसुके यांच्यासोबत वेळ घालवला. चॅनेलला असेही आढळले की ते 3 दिवसात फक्त 30 मिनिटं झोपले. याबाबत त्यांनी सांगितलं की, भरपूर प्रशिक्षण घेऊन 8 तासांची झोप 30 मिनिटांपर्यंत मर्यादित केली आहे. डेसुके रोज सकाळी 8 वाजता जिमला जातात. मग जिममधून परतल्यावर, ते एक पुस्तक वाचतात आणि त्यांचा साप्ताहिक स्तंभ लिहितात. मग ते व्हिडिओ गेम खेळतात आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी बाहेर जातात. रात्रीचे जेवण करून परतल्यानंतर, ते YouTube चॅनेलसाठी काही व्हिडिओ बनवतात. ज्यामध्ये ते लोकांना कमी झोप घेण्याचे प्रशिक्षण देतात आणि नंतर ते रात्री 2 च्या सुमारास झोपतात. हे वाचा - कोरोनाऐवजी काढ्यानेचे पाडलं आजारी; व्हायरसचा काटा काढता काढता बळावले इतर आजार शो मध्ये दिलेल्या माहितीनुसार, ते फक्त 26 ते 30 मिनिटे झोपतात आणि अलार्मशिवाय उठतात आणि नंतर मित्रांसह सर्फिंगसाठी जातात. तेथून तो पुन्हा घरी येतो आणि नंतर 8 वाजता जिमसाठी निघतो. गंमतीची गोष्ट म्हणजे त्याचे मित्रही त्यांच्यासारखे कमी झोप घेणारे लोक आहेत, त्यामुळे ते सर्व रात्रीच्या वेळीही मजा करतात. त्यांनी सांगितलं की जेव्हा ते स्वत:ला प्रशिक्षण देत होता, तेव्हा तो झोपू नये म्हणून भरपूर कॉफी प्यायचा. कॉफीमध्ये कॅफीन असते, ज्यामुळे झोप कमी होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Sleep

    पुढील बातम्या