टोकियो, 11 जानेवारी : भारतात एखादं संकट टळावं, यश मिळावं यासाठी होम हवन केलं जातं. तसंच पवित्र नद्यांमध्ये स्नानंही केलं जातं पण जपानमध्ये (japan) मात्र नद्यांमध्ये नाही तर चक्क बर्फाच्या पाण्यात स्नान केलं जातं. आईस बाथ जो जपानमधील एक धार्मिक विधी आहे. कोरोना महामासाथीचा (corona pandemic) अंत व्हावा यासाठी रविवारी जपानी (Japan) नागरिकांनी टोकियोतील (Tokyo) मंदिरात शिंटो विधी (Shinto Shirine) करत आईस बाथ (बर्फाच्या पाण्याने स्नान) केलं.
टप्पू-झू इनारी या पवित्र स्थळी दरवर्षी हा विधी केला जातो. यंदा या विधीचे 66 वे वर्ष होतं. दरवर्षी दुसऱ्या रविवारी हा विधी आयोजित केला जातो. यंदा या वार्षिक विधीसाठी साथीच्या रोगांपासून दूर राहणं (Warding of epidemics) अशी संकल्पना निवडण्यात आली होती. जपानी पुरुषांनी पारंपारिक वस्त्रे तर महिलांनीदेखील पारंपारिक पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान केली होती. यावेळी मंत्रोच्चारण (Chanting) आणि टाळ्यांच्या गजरात बर्फाच्या पाण्याने स्नान करण्यात आलं.
प्राथमिक स्वरुपाचा व्यायाम केल्यानंतर मोकळ्या आकाशाखाली आणि 5.1 अंश सेल्सिअस तापमानात नऊ पुरुष आणि तीन महिलांनी मंत्रोच्चारण करत बर्फाच्या मोठ्या लाद्या असलेल्या थंडगार पाण्यात स्नानासाठी प्रवेश केला. या विधीनंतर या पवित्र स्थळाच्या यायोईकाई पॅरिशियनर गटाचे प्रमुख 65 वर्षीय शिंजी ओई यांनी या कोरोना महामाथीचा (Corona Pandemic) लवकरात लवकर अंत होऊ दे अशी प्रार्थना केली.
हे वाचा - कोरोना लशीसाठी घाई कराल तर खबरदार! PM मोदींची राजकारण्यांना तंबी
आरोग्यविषयक अडचणी बघता यंदा या कार्यक्रमात केवळ डझनभर नागरिकच सहभागी झाले होते. मागील वर्षी (2020) या कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता. तसंच यंदा या कार्यक्रमासाठी दर्शकांना परवानगी नाकारण्यात आली होती.
या विधीत सहभागी झालेले नाओकी यामागुची यांनी राॅयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं, की यंदा या शिंटो विधीत कमी नागरिकांचा सहभाग असल्यानं पाणी अधिकच थंड जाणवलं. सामान्यतः या विधीत अनेक नागरिक सहभागी होत असल्याने या पाण्याचे तापमान अल्प प्रमाणात का होईना पण अधिक जाणवतं. पण यंदा या विधीत केवळ 12 नागरिक सहभागी झाल्याने पाण्याचा थंडावा अधिकच जाणवल्याचं 47 वर्षीय यामागुची म्हणाले.
हे वाचा - ठरलं! फक्त एका टी-शर्टच्या किमतीत मिळणार पुण्याची CORONA VACCINE
टोकियोसह जपानमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी देशात 1494 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. हा संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने तेथील सरकारने टोकियोसह शेजारील तीन राज्यांमध्ये गुरुवारी मर्यादित आपात्कालीन स्थिती (Limited Emergency) जाहीर केली आहे.