टॉयलेट सीटवर बसताच तुम्हाला समजणार तुम्ही किती थकलात

टॉयलेट सीटवर बसताच तुम्हाला समजणार तुम्ही किती थकलात

एका मिनिटात टॉयलेटमार्फत (Toilet) तुम्हाला तुमचा थकवा मोजता येईल.

  • Share this:

टोकियो, 16 एप्रिल : 20 वर्षांत तंत्रज्ञानाने अत्यंत वेगाने प्रगती केली आहे. नवनवे शोध लागले आणि ते अगदी सामान्याच्या उपयोगाचे ठरले. मोबाईल फोन, इंटरनेट यांनी तर संपूर्ण जग इकडचं तिकडे करून टाकलं. माणसाचं आयुष्य संपूर्ण बदललं. आताही वेगवान प्रवासाची साधनं निर्माण होत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने माणसाचं जगणं अधिक सोपं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या तंत्रज्ञानाबाबत जगभरात आघाडीवर असलेल्या देशांची नावं घेतली तर त्यात सर्वांत आधी नाव येतं जपानचं (Japan).

जपानमध्ये माणसाचं जीवन प्रचंड सुसह्य करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यासाठी नवनवी संशोधन केलं जातं.जपानमधल्या संशोधकांनी एक नवं टॉयलेट (Toilet) तयार केलंय ज्यावर बसून तुम्ही शौच करेपर्यंत तुम्हाला तुमच्या तणावाची, थकव्याची स्थिती ते टॉयलेट सांगतं.आश्चर्य वाटलं ना?पण हे खरं आहे.

हे वाचा : कोरोनाविरोधातील लढाईत मोठं शस्त्र SaNOtize Spray; नाकातच करणार 99.99 व्हायरसचा खात्मा

जपानची राजधानी टोकियोपासून ड्रायव्हिंग करत 45 मिनिटं गेलं की तिथं कानागावा प्रिफिक्चर्स एबिना सर्व्हिस एरिया आहे. हा एरिया म्हणजे आपल्याकडे हायवेवर मॉल असतात तसाच आहे. ड्रायव्हरनी इथं थांबावं विश्रांती घ्यावी, खावं मग पुढच्या प्रवासाला जावं अशी ही सुविधा. पण या सर्व्हिस एरियात तुम्हाला उपलब्ध आहे हे अत्याधुनिक सार्वजनिक टॉयलेट. त्यामुळे तुम्हीही इथं गाडी थांबवू शकता. फूड कोर्टमध्ये थोडं खा, विश्रांती घ्या आणि तुम्ही या टॉयलेटचाही वापर करू शकता जे तुम्हाला तुम्ही किती थकला आहात हे सांगेल.

टॉयलेटमधली यंत्रणा कशी काम करते?

स्थानिक वृत्तपोर्टल सोरा न्यूज 24 ने दिलेल्या माहितीनुसार या टॉयलेटला जोडलेली एक टचस्क्रीन यंत्रणा आहे. तिचा वापर करून तुम्हाला पहिल्यांदा तुमची भाषा निवडावी लागेल. काही माहिती ते यंत्र विचारेल ती भरा आणि तुमचं काम चालू द्या. त्यानंतर ती यंत्रणा व्हायब्रेशन सेन्सर्स फवारेल आणि त्याच्या माध्यमातून पल्स फ्लक्चुएशन्स मोजतील. त्या यंत्रात तुमचं वय आणि तुम्ही किती दमलेले आहात किंवा अजिबात नाही ही माहिती भरावी लागेल. सगळ्यात शेवटी तुम्ही किती थकलेले आहात हे तुम्हाला ते यंत्र दाखवेल. एका मिनिटात सेन्सर्स तुमचा थकवा मोजतील.

हे वाचा : कोरोनाचं आता अधिक भयंकर रूप; RT-PCR टेस्टलाही देतोय चकवा

विशेषत:खूप थकलेल्या माणसामध्ये सिंपथेटिक नर्व्हस सिस्टीमवरचा ताण वाढलेला असतो आणि पॅरासिंपेथेटिक नर्व्हस सिस्टिमची क्रियाशीलता कमी झालेली असते. त्या टॉयलेटला जोडलेले सेन्सर पल्सचं म्हणजे नाडीचं रिडिंग आणि फ्लक्च्युएशन्स यांचं विश्लेषण करून एखाद्या व्यक्तीची मानसिक ताण शोधून काढतात. शेवटी तुम्ही थकलेले आहात, थोडे थकलेले आहोत किंवा अजिबात थकलेले नाही यापैकी एक पातळीवर तुम्हाला उत्तर मिळेल.

हे वाचा : लहान मुलांमध्ये दिसताहेत कोरोनाची ही लक्षणे; कशी घ्याल काळजी?

अर्थात हा प्रश्नही अनेकांना पडेल ही यंत्रणा कशासाठी पण ही हायवेवरील स्टॉपवर उपलब्ध केली आहे हेच त्याचं महत्त्व आहे. हायवेवर वाहन चालवताना अनेकदा ड्रायव्हर सलग काही तास प्रवास करत असतात. त्यांना विश्रांतीच मिळालेली नसते. शिणवट्यामुळे अपघात व्हायची शक्यता दाट असते. त्यामुळे जर वेळीच ड्रायव्हरला ते कळालं तर तो विश्रांती घेईल हा उद्देश आहे.

First published: April 16, 2021, 1:20 PM IST

ताज्या बातम्या