Home /News /lifestyle /

मुलांपेक्षा कुत्रे-मांजरच जास्त; प्राण्यांचे पालक होण्याकडेच जापनीज लोकांचा वाढता कल

मुलांपेक्षा कुत्रे-मांजरच जास्त; प्राण्यांचे पालक होण्याकडेच जापनीज लोकांचा वाढता कल

जपानमध्ये (japan) बालकांची (child) संख्या कमी झाली आहे आणि पाळीव प्राण्यांची (pet animal) संख्या वाढली आहे.

    टोकियो, 02 जानेवारी :  जपानमध्ये (Japan) जन्मदरात (Birth rate) लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे बालकांची (Child) संख्या कमी असल्याचं दिसून येतं. मात्र त्या उलट पाळीव प्राण्यांच्या संगोपनाकडे जपानी लोकांचा कल अधिक असल्याने पाळीव प्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. इथं कुत्री (Dogs) किंवा मांजर (Cat) पाळण्याकडे लोकांचा कल वाढला असल्याने बालकांच्या नोंदणीच्या तुलनेत पाळीव प्राण्यांची नोंदणी वाढली असल्याचं दिसून येत आहे. जपानमधील एखादी व्यक्ती जर असे प्राणी पाळत असेल किंवा त्यांना परदेशात सोबत घेऊन जाऊ इच्छित असेल तर त्या प्राण्यांची नोंदणी करणं आवश्यक असते. ही नोंदणी म्हणजे या प्राण्यांचे ओळखपत्र असते. मात्र गेल्या काही वर्षांत नवीन जन्मलेल्या बालकांपेक्षा या पाळीव प्राण्यांची नोंदणी अधिक प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. अर्थव्यवस्थेवर (Economy) नजर ठेवणाऱ्या गोल्डमन सॅचेसने जगभरातील देशांमधील अर्थव्यवस्थेच्या ट्रेंडचा शोध घेतला असता, त्यांना जपानमध्ये ही बाब दिसून आली. कमी जन्मदर हे जपानमधील अर्थव्यवस्थेतील घटीस कारणीभूत असून येथील लोक बालकांना जन्म देण्याऐवजी पशूपालनास अधिक प्राधान्य देत असल्याचं दिसून आले. बिझनेस इनसाइडरच्या वृत्तानुसार, जपानमध्ये बालकांची जागा आता पाळीव प्राण्यांनी घेतली आहे, असं नमूद करण्यात आलं आहे. हे वाचा - वेदनेनं व्याकूळ झाला 'साथी'; जखमी हत्तीसाठी डॉक्टर झाले हत्ती; पाहा VIDEO 2014 मध्ये गत 15 वर्षांच्या तुलनेत जपानमध्ये 16.5 दशलक्ष बालके होती. त्या तुलनेत कुत्री- मांजर या पाळीव प्राण्यांची संख्या 21.3 दशलक्ष होती. याचाच अर्थ दाम्पत्यांमध्ये मुलांना जन्म देण्याची इच्छा कमी होत आहे. याला अनेक कारणं आहेत. मात्र कामास अधिक महत्त्व देण्याची वृत्ती ही यामागील प्रमुख कारण मानली जात आहे. पुरुष आणि स्त्रियांमध्ये करिअरविषयी सारखंच प्रेम असल्यानं मुलांना जन्म कोण देणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. जपानी लोक कामातून सुट्टया घेण्याचं टाळत असल्यानं अखेरीस काही कंपन्यांनी कामगारांसाठी वर्षभरात किमान 14 दिवस सक्तीनं सुट्टी घ्यावी, म्हणजे त्यांची मानसिक स्थिती चांगली राहिल, असा नियम काढला आहे. बिझनेस इनसाइडरच्या वृत्तानुसार, जर जोडप्यांनी संतती जन्माकडे वेळेत लक्ष दिलं नाही तर येत्या 20 वर्षांत जपानमध्ये 35 टक्के लोकसंख्या ही 80 वर्षांवरील व्यक्तींची असेल. तसंच येत्या पाच वर्षांत म्हणजेच 2025 पर्यंत जपानमधील प्रत्येक 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती ही 65 वर्षांची असेल. वयस्कर व्यक्तींच्या संख्येत झालेल्या वाढीचा परिणाम एकूण लोकसंख्येवर होऊन ती कमी होईल. लोकसंख्येत जर वाढ झाली नाही तर येत्या 50 वर्षांत जपानमधील लोकसंख्या केवळ 80 दशलक्ष तर 100 वर्षांत 40 दशलक्ष होईल, अशी भीती तज्ज्ञांना वाटते. याचाच अर्थ केवळ ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत वाढ नाही तर एकूण लोकसंख्येत मोठी घट होऊ शकते. हे वाचा - PHOTO वाघ पाहायला सेलेब्रिटींची गर्दी! रणबीर-आलिया पाठोपाठ ही जोडी सुद्धा जंगलात दुसरीकडे जपान (Japan) हा पाळीव प्राण्यांच्या बाबतीत सुपरपाॅवर (Supar Power) झाला आहे. या देशात युवकांपेक्षा जास्त संख्या कुत्री आणि मांजरांची आहे. दरडोई उत्पन्नात अन्य देशांच्या तुलनेत आघाडीवर असणाऱ्या जपानमध्ये पाळीव प्राण्यांचे संगोपन शानदार पद्धतीनं केलं जातं. यात केवळ स्वच्छता, आहार किंवा लसीकरण या बाबींचा समावेश नाही तर सप्ताहाअखेरीस जपानी लोक पाळीव प्राण्यांसाठी मोठ्या प्रमाणात शॉपिंग करतात, नव्या स्टाईल्सचे कपडे देखील खरेदी करतात. अनेक मोठे डिझानर ब्रॅण्डस जपानमध्ये कुत्र्यांसाठी डिझाईनचे कपडे तयार करतात. टोकियोत भलेही लहान मुलांसाठीचे कपडे आणि जरुरी गोष्टी शोधण्यासाठी कष्ट घ्यावे लागत असतील मात्र कुत्र्यांचे कपडे आणि वस्तू अत्यंत सहजपणे उपलब्ध होतात. जनावरांसाठी आवश्यक गोष्टींचे उत्पादन करणाऱ्या उद्योग वर्षाला 8.2 अब्ज डॉलर कमवतात. यात कुत्र्यांसाठीच्या योगा क्लासेसचा देखील समावेश आहे. कुत्र्यांच्या लसीकरणात जपान अव्वल मानला जातो. 1957 नंतर येथे कुत्रे किंवा अन्य पाळीव प्राणी चावल्यामुळे रेबीज झाल्याची एकही घटना घडलेली नाही. लोकांना खात्री व्हावी यासाठी रेबीजची लस प्राण्याला दिल्यानंतर त्या प्राण्याचा मालक आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर एक विशिष्ट स्टिकर चिटकवतो. हे वाचा - 27 फूट महाकाय अजगरानं केला तरुणावर हल्ला, श्वास रोखून ठेवायला लावणारा VIDEO दुसऱ्या देशात खरेदी केल्याला प्राण्याला जपानमधील घरात सहजासहजी प्रवेश दिला जात नाही. त्यांना पहिलं क्वारंटाइन (Quarantine) केलं जातं. याला अॅनिमल क्वारंटाइन सर्व्हिस म्हणतात. यासाठी शहरात विविध ठिकाणे केंद्रे देखील असतात. मात्र ऑस्ट्रेलिया, तैवान, न्यूझीलंड आणि फिजीमधून आणलेल्या प्राण्यास क्वारंटाइन केलं जात नाही. केवळ जनावरांच्या संगोपनासाठीच नाही तर त्या प्राण्याचा मृत्यू झाल्यानंतर देखील येथील लोक लाखो रुपये खर्च करतात. द गार्डियनमधील वृत्तानुसार, कुत्र्यावर अंत्यसंस्कार करण्याच्या अनेक प्रथा येथे प्रचलित असून, त्यासाठी सामान्य, इकॉनॉमी आणि डिलक्स असे पॅकेज देखील आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Japan, Pet animal, World news

    पुढील बातम्या