मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

जपानी शेफने तयार केला पांढर्‍या कडा असलेला ब्रेड! शोधाचे कारण आहे खूप खास

जपानी शेफने तयार केला पांढर्‍या कडा असलेला ब्रेड! शोधाचे कारण आहे खूप खास

पांढरा ब्रेड खाण्याचे दुष्परिणाम

पांढरा ब्रेड खाण्याचे दुष्परिणाम

एका कंपनीने असा ब्रेड तयार केलाय, ज्याला क्रस्ट अर्थात बाहेरच्या कडा नाहीत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 सप्टेंबर : लहान मुलं ब्रेडच्या ब्राउन कडा काढून टाकतात आणि केवळ आतला पांढरा भाग तेवढा खातात. कारण हा पांढरा भाग सॉफ्ट किंवा मऊ असतो. तसंच सँडविच तयार करतानाही ब्राउन कडा काढून टाकण्यात येतात. केवळ पांढर्‍या भागाचा उपयोग सँडविचसाठी केला जातो. ब्राउन कडा काढून टाकणं हे नुकसानकारक ठरतं. कारण त्यातून अन्नाची नासाडी होते. म्हणूनच एक नवा प्रयोग करण्यात आलाय. एका कंपनीने असा ब्रेड तयार केलाय, ज्याला क्रस्ट अर्थात बाहेरच्या कडा नाहीत. किंबहुना, त्या असल्या तरी नसल्यासाखंच दिसतं. चक्रावून गेलात ना? पण हे खरं आहे.

ऑडिटी सेंट्रल वेबसाइटच्या रिपोर्टनुसार जपानच्या टोकियो शहरात इम्पीरियल हॉटेल कंपनी आहे. त्या हॉटेलमधले शेफ सुगीमोटो आणि त्यांच्या टीमने या ब्रेडची निर्मिती केलीय. या टीमने 6 महिने प्रचंड मेहनत आणि खूप संशोधन केलं आहे. त्यानंतर त्यांना पांढरा क्रस्ट असलेला ब्रेड तयार करण्यात यश मिळालं. हा ब्रेड पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की याला क्रस्ट अर्थात बाहेरची कडा नाहीच आहे. जपानमध्ये शोकुपान नावाचा दुधापासून बनलेला ब्रेड मिळतो. त्याचा पांढरा भाग हा मुलायम असतो; पण शोकुपानचं ब्राउन क्रस्टही मुलायम आहे. अर्थात, सगळीकडेच क्रस्ट काढूनच ब्रेड खाण्याची रीत आहे. त्यामुळे दुधापासून बनलेल्या या सॉफ्ट ब्रेडचं क्रस्टही काढून टाकलं जातं. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होते.

वाचा - रोज केळी खाल्ल्यास आरोग्य राहतं उत्तम; फक्त अशी हवी खाण्याची पद्धत आणि योग्य वेळ

कंपनीने बनवला पांढर्‍या क्रस्टचा ब्रेड

इम्पीरियल हॉटेल कंपनीने ब्रेड तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत फारसा खुलासा केला नाहीये; पण त्यांनी असं म्हटलंय, की शोकुपान ब्रेडच्या तुलनेत हा ब्रेड मंद आचेवर तयार केला गेलाय. म्हणूनच या ब्रेडच्या कडा पांढर्‍या आहेत. तसंच सर्वसामान्य ब्रेडच्या तुलनेत हा ब्रेड काहीसा ओलसर असतो. 1890 साली इम्पीरियल हॉटेल कंपनी सुरू झाली. तेव्हापासून कंपनी दुधापासून तयार केलेला ब्रेड क्रस्ट काढून ग्राहकांना खाण्यासाठी सर्व्ह केला जातो; पण 1 ऑक्टोबरपासून कंपनी नवा पांढरा क्रस्ट असलेला ब्रेड वापरणार असल्याचं कळतं.

पांढर्‍या क्रस्टचा ब्रेड तयार करण्यामागचं काय आहे कारण?

कंपनीने म्हटलंय, की पांढर्‍या क्रस्टचा ब्रेड बनवण्यामागचा उद्देश अन्नाची नासाडी टाळणं हा आहे. सध्या प्रत्येकजण ब्रेडचा क्रस्ट काढून ब्रेड खातात; पण या नव्या ब्रेडमुळे आता संपूर्ण ब्रेड खाल्ला जाईल. त्यामुळे नासाडी टळेल. कंपनीने पुढे म्हटलंय, हा नवा ब्रेड त्यांच्या ग्राहकांना सर्व्ह केला जाईलच. याशिवाय हा ब्रेड गर्गन्टुआ डेलिकेटसन नावाच्या जपानमधल्या प्रसिद्ध बेकरीतही विकत मिळू शकेल.

First published:

Tags: Food, Japan