Home /News /lifestyle /

ग्लोईंग स्कीनसाठी जान्हवी कपूर वापरते हा घरगुती फंडा; आपणही ट्राय करायला हरकत नाही

ग्लोईंग स्कीनसाठी जान्हवी कपूर वापरते हा घरगुती फंडा; आपणही ट्राय करायला हरकत नाही

एका मुलाखतीदरम्यान जान्हवीने सांगितले होते की, ती त्वचेची काळजी घेण्यासाठी केमिकल वापरत नाही तर नैसर्गिक गोष्टी वापरते. ती कशा पद्धतीने घरातील वस्तुंचा वापर स्कीनसाठी करते, त्याविषयी जाणून घेऊया.

  मुंबई, 30 जून : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (janhvi kapoor) अभिनयासोबतच तिच्या निखळ आणि चमकदार त्वचेसाठी ओळखली जाते. आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री आई श्रीदेवीने सुचवलेल्या घरगुती उपायांचा वापर करते. एका मुलाखतीदरम्यान जान्हवीने सांगितले होते की, ती त्वचेची काळजी घेण्यासाठी केमिकल वापरत नाही तर नैसर्गिक गोष्टी वापरते. तुम्हालाही जान्हवी कपूरसारखे सुंदर दिसायचे असेल, तर जाणून घेऊया ती घरी बनवत असलेला फेस मास्क आणि तो बनवण्याची (janhvi kapoor skin secret) योग्य पद्धत. डेड स्कीनसाठी दही आणि मधाचा फेस मास्क - हरजिंदगीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, दही आणि मध आजपासून नव्हे तर शतकानुशतके वापरला जात आहे. प्राचीन काळी स्त्रिया त्वचेची काळजी घेण्यासाठी मध वापरत असत. आजही हा प्राचीन उपाय चमकदार त्वचेसाठी प्रभावी आहे. याच कारणामुळे बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर देखील चमकदार त्वचेसाठी मध आणि दह्याचा फेस मास्क वापरते. हा फेस मास्क कसा बनवायचा - साहित्य - एक चमचा दही एक चमचा मध कोणतेही फळ (हंगामी) बनवण्याती प्रक्रिया -- प्रथम एक वाडगा घ्या. आता या भांड्यात एक चमचा मध आणि एक चमचा दही मिसळा. मिश्रण चांगले मिसळले की, तुम्ही या पेस्टमध्ये कोणतेही हंगामी फळ बारीक करून घालू शकता. उदाहरणार्थ, आपण दही आणि मधासह पपई मॅश मिक्स करू शकता. आता हा फेस मास्क चेहऱ्यावर लावा. एक मिनिट हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. 20 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. हा फेस मास्क आपण आठवड्यातून दोनदा लावू शकता. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार एलोवेरा आणि हनी फेशियल क्लिंझर - त्वचेला खोल पोषण देण्यासाठी फेशियल क्लींजर खूप फायदेशीर मानले जाते. जर हे क्लींजर घरीच बनवले असेल तर ते त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. घरच्या घरी फेशियल क्लिन्जर बनवणे खूप सोपे काम आहे.
  साहित्य -- अर्धा कप कोरफड जेल एक चमचा मध ऑलिव तेल करण्याची प्रक्रिया - प्रथम एक वाडगा घ्या. आता या भांड्यात कोरफडीचा जेल घ्या. या जेलमध्ये एक चमचा मध टाका. आता कोरफड आणि मध चांगले मिसळा. यानंतर या मिश्रणात थोडं ऑलिव्ह ऑईल घाला. झाला फेस क्लींजर तयार. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम चेहरा साफ करण्यासाठी कसं लावायचं -- कोणतेही ब्युटी प्रॉडक्ट लावण्याची योग्य माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्ही ब्युटी प्रोडक्टचा वापर चुकीच्या पद्धतीने करत असाल तर ते त्वचेसाठीही ते हानिकारक ठरू शकते. आम्ही तुम्हाला फेस क्लिन्जर कसे वापरावे ते सांगतो. प्रथम चेहरा धुवा. आता चेहऱ्यावर घरगुती क्लिंजर लावा. चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा. मसाज केल्यानंतर चेहऱ्यावर मिनिटभर राहू द्या. आता कापसाच्या साहाय्याने फेस क्लींजर स्वच्छ करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. - आठवड्यातून 2 ते 3 वेळा या क्लिंजरचा वापर करा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Janhavi kapoor, Skin, Skin care

  पुढील बातम्या