मुंबई, 10 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (janhavı kapoor) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडीओज ती सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र सध्या तिचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. हा जान्हवीचा डान्स व्हिडीओ आहे. तसं हा व्हिडीओ जुना आहे, मात्र तो जान्हवीच्या चाहत्यांना इतका आवडला आहे की या व्हिडीओने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
जान्हवी या व्हिडीओत बेली डान्स करताना दिसते आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी डान्स टीचर संजना मुथरेजा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.
हा व्हिडीओ ऑगस्टमध्ये शेअर केला गेला. मात्र आतापर्यंत या व्हिडीओवर प्रतिक्रिया उमटत आहेत. जान्हवीचा हा डान्स पाहून तिचं सर्वजण कौतुक करत आहेत. व्हिडीओत जान्हवी पिंक टॉप आणि व्हाइट शॉर्ट्समध्ये दिसते आहे. डान्स दिवाने थीम साँगवर ती बेली डान्स करते आहे. डान्स करताना तिचे हावभावही जबरदस्त आहेत.
हे वाचा - रणबीर कपूरच्या गाण्यावर आई नीतूने धरला ताल, 'घागरा'वर ठुमक्यांचा VIDEO एकदा पाहा
जान्हवीने धडक फिल्ममार्फत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या फिल्ममध्ये ती इशान खट्टरसह मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर घोस्ट स्टोरीतही मुख्य भूमिकेत दिसली. गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल हा जान्हवीचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट. यामध्ये जान्हवीने भारतीय महिला पायलेटची भूमिका बजावली. या फिल्ममध्ये जान्हवीशिवाय पंकज त्रिपाठी, अंगद बेदी आणि विनीत कुमार सिंहदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले.
हे वाचा - पतीविरुद्ध मारहाणीची तक्रार करणाऱ्या पूनम पांडेने आता रोमँटिक VIDEO शेअर करत काय
कोरोना महासाथीमुळे देशभर लॉकडाऊन लागू झाला आणि त्यामुळे ही फिल्म ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज करण्यात आली. या फिल्मबाबत प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. जान्हवी लवकरच करण जोहरची फिल्म तख्तमध्ये दिसणार आहे.