मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

उन्हाळ्यात केस आणि स्कीनसाठीही जांभूळ ठरतं गुणकारी; अशा पद्धतीनं वापरून बघा

उन्हाळ्यात केस आणि स्कीनसाठीही जांभूळ ठरतं गुणकारी; अशा पद्धतीनं वापरून बघा

नैसर्गिकरीत्या उष्णतेपासून त्वचा आणि केसांचे संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक गोष्टी प्रभावी ठरतात. जांभूळ हाही त्यातलाच एक उपाय आहे. उन्हाळ्यात उपलब्ध होणारं जांभूळ त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरू (Jamun Benefits) शकते.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 06 मे : उन्हाळ्यात त्वचेची निगा आणि केसांची काळजी घेण्यासाठी बहुतेक लोक नैसर्गिक गोष्टी वापरतात. केमिकल्स असलेली कॉस्मेटिक उत्पादने केस आणि त्वचेला हानी पोहोचवू शकतात, ही बाब लोकांच्या ध्यानात आली आहे. त्याचबरोबर नैसर्गिकरीत्या उष्णतेपासून त्वचा आणि केसांचे संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक गोष्टी प्रभावी ठरतात. जांभूळ हाही त्यातलाच एक उपाय आहे. उन्हाळ्यात उपलब्ध होणारं जांभूळ त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरू (Jamun Benefits) शकते. वास्तविक, कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह यांसारख्या खनिजांनी समृद्ध जांभूळ खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते. उन्हाळ्यातील त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवून त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठीही जांभळाचा वापर उपयुक्त ठरतो. म्हणूनच, स्किन केअरमध्ये जांभूळ वापरण्याच्या काही टिप्स जाणून घेऊया. उन्हाळ्यातही तुमची त्वचा सहज चमकदार बनू शकते. डाग - मुरुम आणि पिंपल्समुळे उन्हाळ्यात त्वचेवर डाग पडणे कॉमन झालं आहे. यासाठी 8-10 जांबळांचा रस काढा आणि त्यात मध घाला. आता ही पेस्ट कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. या फेस मास्कचा नियमित वापर केल्याने तुमचा चेहरा काही वेळातच चमकदार आणि डागरहित दिसेल. पुरळ निघून जातील - अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असलेले जांभूळ त्वचेवरील पुरळ आणि मुरुमे कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. जांभूळ रस चेहऱ्यावर लावल्याने पुरळ-मुरुमे कमी होतात. यासाठी जांभळाच्या बिया वेगळ्या करू रस काढा. आता हा रस कापसाच्या मदतीने थेट चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटे वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हे वाचा - घरामध्ये घड्याळ लावताना या चुका करू नका; दिशा चुकली तर अनेक गोष्टी बिघडतात जांभूळ हेअर मास्क - त्वचेसोबतच जांभळाचा वापर केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात केस निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी जांभळाचा हेअर मास्कही सर्वात प्रभावी उपाय आहे. यासाठी प्रथम जांबळाच्या बिया सुकवून बारीक करून घ्याव्यात. आता या पावडरमध्ये 4-5 चमचे मेंदी, दही आणि 1 चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. केसांना चांगले लावा आणि 2 तासांनंतर शॅम्पू करा. हे वाचा - heart attackचं कारण ठरू शकतात या 4 गोष्टी; आजपासूनच खाताना काळजी घ्या (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health, Lifestyle, Summer, Summer season

पुढील बातम्या