यामुळे आजही देशात इतर राज्यांपेक्षा जम्मू- काश्मीर आहे सर्वोत्तम

महिला साक्षरतेच्या दरातही जम्मू- काश्मीर हा देशातील इतर राज्यांपेक्षा अव्वल आहे. इथल्या महिलांचं साक्षरतेचं प्रमाण सर्वात जास्त आहे.

  • Share this:

जम्मू- काश्मीरमध्ये नवजात बाळाचा मृत्यूदर हा देशातील इतर राज्यांच्या मृत्यूदरापेक्षा कमी आहे. जम्मू- काश्मीरमध्ये नवजात बाळ जगण्याची शक्यता ही 73.5 टक्के असते. तर देशात नवजात बाळ जगण्याचा सरासरी दर हा 68.7 टक्के आहे. 2012 पासून ते 2016 पर्यंतचे हे आकडे आहेत.

जन्माच्यावेळी बाळांच्या सेक्स रेशोच्या दरात जम्मू- काश्मीर इतर राज्यांच्या पुढे आहो. जम्मू- काश्मीरमध्ये जन्माच्या वेळचा सेक्स रेशो हा 921 आहे, तर देशाचा सरासरी दर हा 919 आहे. गेल्या पाच वर्षांचे आकडे पाहिले तर लक्षात येतं की देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जम्मू- काश्मीरचा सेक्स रेशो जास्त चांगला आहे.

मोदी सरकारने स्वच्छ इंधनाच्या वापरावरही जोर दिला आहे. प्रत्येक घरात गॅस कनेक्शन असावं ही मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. या प्रकरणीही जम्मू- काश्मीर इतर राज्यांपेक्षा उजवं आहे. क्लीन कुकिंग फ्युएलमध्ये देशाचा सरासरी दर 43.8 आहे तर जम्मू- काश्मीरचा दर 57.6 आहे.

महिला साक्षरतेच्या दरातही जम्मू- काश्मीर हा देशातील इतर राज्यांपेक्षा अव्वल आहे. इथल्या महिलांचं साक्षरतेचं प्रमाण सर्वात जास्त आहे. महिला साक्षरतेमध्ये देशाचा सरासरी दर 68.4 टक्के आहे , तर जम्मू- काश्मीरमध्ये 69 टक्के महिला साक्षर आहेत. 10 वर्षांहून अधिक महिला शिक्षणाच्या दरात जम्मू- काश्मीर पुढे आहे. या प्रकरणी देशाचा सरासरी दर 35.7 टक्के आहे तर जम्मू- काश्मीरचा दर 37.2 टक्के आहे.

बाल विवाह किंवा कमी वयात मुलींचं लग्न लावण्यात जम्मू- काश्मीर सर्वात मागे आहे. देशभरात 18 वर्षांहून कमी वयात लग्न होणाऱ्या महिलांचा सरासरी दर 26.8 टक्के आहे. तर जम्मू- काश्मीरमध्ये हा दर फक्त 8.7 टक्के आहे.

या राज्यातील महिलांची आर्थिक स्थितीही देशातील इतर राज्यांमधील महिलांपेक्षा जास्त चांगली आहे. जम्मू- काश्मीरमध्ये 60.3 टक्के महिलांकडे स्वतःचं सेविंग अकाउंट आहे. तर देशाचा सरासरी दर 53 टक्के आहे. मोबाइल वापरण्यातही जम्मू- काश्मीरच्या महिला पुढे आहेत. इथल्या 54.2 टक्के महिलांकडे स्वतःचा मोबाइल आहे. तर भारताचा सरासरी दर 45.9 टक्के आहे.

रोजगाराच्या बाबतीतही जम्मू- काश्मीर अव्वल आहे. 2011-12 च्या आकड्यांनुसार, 1 हजार ग्रामीण पुरुषांचा रोजगार दर जम्मू- काश्मीरमध्ये 22 होता. तर भारताचा रोजगार दर फक्त 17 होता. जम्मू- काश्मीरमधील ग्रामीण महिलाही रोजगारच्या बाबतीत पुढे आहेत.1 हजार महिलांमध्ये 30 महिलांकडे रोजगार आहे. तर देशाचा सरासरी दर 17 आहे. इथल्या शहरी भागातील पुरुषही रोजगाराच्या बाबतीत पुढे आहेत. जम्मू- काश्मीरमध्ये रोजगार मिळालेल्या पुरुषांचा सरासरी दर 41 आणि महिलांचा 190 आहे.

प्रत्येक घरात वीज या बाबतीतही जम्मू- काश्मीर फार पुढे आहे. डोंगराळ भाग आणि अतीदुर्गम भाग असूनही इथे 97.4 टक्के घरांमध्ये वीज आहे. तर देशभरात 88.2 टक्के वीज पोहोचली आहे.

प्रत्येक घरात शौचालय यातही जम्मू- काश्मीरचा हात कोणीही पकडू शकत नाही. सॅनिटेशन फॅसिलिटीमध्ये देशाचा सरासरी दर 48.4 आहे तर जम्मू- काश्मीरचा दर 52.5 आहे. मोदी सरकारने नेहमीच प्रत्येक घरात शौचालय या सुविधेवर जोर दिला आहे. जम्मू- काश्मीरने याबाबतीतही बाजी मारली असचं म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 03:26 PM IST

ताज्या बातम्या