पावसाळ्यात आजारांना दूर ठेवायचं आहे; मग आवर्जून खा जांभूळ

पावसाळ्यात आजारांना दूर ठेवायचं आहे; मग आवर्जून खा जांभूळ

  • Last Updated: Aug 12, 2020 09:02 PM IST
  • Share this:

उन्हाळ्यात येणारी फळे पौष्टिक तर असतातच पण तितकीच औषधी पण असतात. जांभूळ हे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात खाण्याचे उत्तम असे फळ आहे. चाट मसाला टाकून खाल्ले तर ते अधिकच मस्त लागते. जांभूळ खाल्ल्याने पचन चांगलं होतं. पोटदुखी बरी होते. ज्यांना लघवीच्या नियंत्रणाची समस्या असते त्यांना जांभूळ उपयुक्त आहे.

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितल्यानुसार फक्त जांभूळच नाही तर त्याचे बी आणि पानंदेखील फायद्याचे आहेत. चला जाणून घेऊ जांभूळाचे विशेष गुण आणि ते खाल्ल्याने होणारे फायदे -

जांभूळ जीवाणूचा संसर्ग रोखते

जांभूळामध्ये फाइट्रॉन्यूट्रिएंट्स असतात जे शरीरातील जीवाणू आणि संसर्गाशी लढतात. त्यात सी जीवनसत्व भरपूर असते. त्याने रोग प्रतिकारकशक्ती मजबूत होते.

वजन घटवते जांभूळ

जांभूळामध्ये कॅलरी जवळपास नसतातच, मात्र तंतुमय पदार्थ अधिक असतात. त्याने पचनसंस्था चांगली होते. तंतुमय पदार्थांमुळे पोट भरलेले राहते. त्यामुळे खूप वेळ भूक लागत नाही. त्याचा परिणाम शरीरातील मेदावर होतो. जास्त न खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त मेद वापरले जाते आणि लठ्ठपणा कमी होतो.

रक्तशर्करा नियंत्रणात राहते

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, जांभूळ खाल्ल्याने रक्त शर्करा वाढत नाही. म्हणूनच जांभूळ खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. नेहमी पोषक तंतुमय पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो जांभूळ त्यातीलच एक आहे. जांभूळ शरीराचे चयापचय वाढवते. व्यायामानंतर जांभूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यानंतर खूप भूक लागते.

शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकते जांभूळ

जांभूळामध्ये जीवनसत्व ए आणि सी असतात ते शरीर विषमुक्त करतात. जांभूळ थंड प्रकृतीचे फळ आहे त्याने पोटात थंडावा राहतो. जुलाब होत असतील तर जांभूळ खूप उपयोगी आहे. मूळव्याध असणाऱ्यांनादेखील जांभूळ खायचा सल्ला दिला जातो कारण पचन चांगले झाले तर त्यांना आराम मिळतो.

हंगामी फळ आहे म्हणून जरूर खा

पावसाळ्यात हंगामी फळे खायला हवीत, त्याने रोग प्रतिकारक प्रणाली मजबूत राहण्यास मदत होते. पावसाळ्यात अनेकांची रोग प्रतिकारशक्ती कमजोर होत असते. जांभूळ उन्हाळा आणि पावसाळ्यात येतात. हे आश्चर्यकारक आहे की निसर्ग आरोग्यासाठी आवश्यक फळे त्या त्या हंगामात आपल्याला उपलब्ध करून देतो. तेव्हा जर आपण जांभूळाचे योग्य सेवन केले तर येणाऱ्या हंगामात आपली रोग प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि आपण स्वस्थ राहू.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - मधुमेह माहिती मराठी: लक्षणे, कारणे, उपचार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: August 12, 2020, 9:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading