Jallianwala Bagh massacre : जालियनवाला बाग हत्याकांडातील डायरला फाशी का झाली नाही?

Jallianwala Bagh massacre : जालियनवाला बाग हत्याकांडातील डायरला फाशी का झाली नाही?

जालियनवाला बाग हत्याकांडाला (Jallianwala Bagh massacre) 102 वर्षे पूर्ण झाली आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 एप्रिल : जगभरातील सर्वात भयावह नरसंहारापैकी एक असलेलं जालियनवाला बाग हत्याकांड (Jallianwala Bagh massacre) होय. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते. या घटनेनंतर जगात ब्रिटीश साम्राज्याची मोठी बदनामी झाली होती. भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना या घटनेनंतर कुठंही तोंड दाखवण्यास जागा राहिली नव्हती. त्यावेळी घाईघाईने कर्नल रेगिनाल्ड डायरला (Colonel Reginald Dyer) पदमुक्त करण्यात आलं होतं. परंतु या घटनेसाठी एकटा डायरच जबाबदार आहे, हे सुनावणीवेळी सिद्ध होऊ न शकल्यानं त्यास कोणतीही शिक्षा देण्यात आली नाही. नियमानुसार एवढ्या मोठ्या नरसंहारासाठी जबाबदार धरून त्यास फाशीची शिक्षा होणं अपेक्षित होतं. परंतु प्रथम हंटर आयोग (Hunter Commission) आणि नंतर ब्रिटीश साम्राज्यानं (British Empire) त्याला सोडून दिलं. ब्रिटनमध्ये परतल्यावर अनेक मंडळांसाठी तो नायक बनला होता. त्यामुळे भारतातील ब्रिटीश साम्राज्याचा पक्षपात आणि अमानवी कृत्याची ही कहाणीच होऊन बसली.

जालियनवाला बाग हत्याकांडानंतर तपासासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. मात्र जनरल डायरला वाचवणे हाच या समितीचा मुख्य उद्देश होता. या समितीचे अध्यक्ष लॉर्ड विल्यम हंटर होते. त्यांच्या नावामुळेच या समितीला हंटर कमिशन असं संबोधलं जाऊ लागलं. डायरला 19 नोव्हेंबरला या समितीपुढे हजर करण्यात आलं. यावेळी ज्या पद्धतीने चौकशी केली गेली त्यामुळे डायरने स्वतःच आपला गुन्हा कबूल केला. मात्र असं असूनही त्याला कोणतीही शिक्षा सुनावण्यात न आल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं गेलं. डायरला निर्दोष सिद्ध करायचं असा या समितीतील सर्व ब्रिटीश सदस्यांचा प्रयत्न होता. या समितीत सर चिमणलाल सीतलवाड हे भारतीय वकील देखील सहभागी होते. त्यांच्या जोरदार प्रयत्नांमुळे डायरला हे सांगायला भाग पाडण्यात आलं की त्यानं जे कृत्य केलं आहे ते त्याच्या मनानं नाही तर त्याला असं करायला भाग पाडण्यात आलं.

हे वाचा - या देशात पर्यटनासाठी जा आणि कमवा 200 युरो!

या कायदेशीर वादविवादातील काही अंशातून असं दिसतं की डायरने शेवटी हे मान्य केलं की जालियनवाला बागेत तो मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्याच्या इराद्यानंच गेला होता. याबाबत नॅशनल बुक ट्रस्टचे पुस्तक जालियनवाला बाग तसेच याविषयावर प्रकाशित अन्य पुस्तकांमध्ये तपशील देण्यात आला आहे.

प्रश्न : जेव्हा तू जालियनवाला बागेत गेलास तेव्हा तू काय केलंस?

उत्तर :मीबंदुकीतूनगोळ्याचालवल्या.

प्रश्न: लगेचच ?

उत्तर : हो लगेचच, मी विचार करून ठेवला होता की मला काय आणि कसं करायचं आहे.

प्रश्न : गोळी झाडल्यानंतर गर्दी पांगली का?

उत्तर : हो लगेचच

प्रश्न : त्यानंतरही तू गोळ्या झाडत राहिलास?

उत्तर : हो

प्रश्न : गर्दीतील लोकांनी बागेतील अन्य रस्त्यांवरुन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला का?

उत्तर : हो

प्रश्न : त्या ठिकाणी देखील खूप गर्दी झाली असेल ना?

उत्तर : हो

प्रश्न: कधी कधी तू फायरिंगचा रोख बदलत थेट त्या गर्दीवर गोळ्या झाडू लागलास?

उत्तर : हो कारण ते त्यावेळी योग्य होतं.

प्रश्न : हे खरोखर योग्य होतं?

उत्तर : हो हे योग्य होतं.

प्रश्न : जमावावर गोळीबार करण्याचं तू ठरवूनच आला होतास का?

उत्तर : हो मी निर्णय घेतला होता की मी तेथे पोहोचताच गोळीबार सुरू करणार. कारण कडक कारवाई करण्याची वेळ आली होती. जर मी असं केलं नसतं तर माझा कोर्ट मार्शल करण्यात आला असता.

प्रश्न : जर जालियनवाला बागेचा मार्ग विस्तीर्ण असता तर तू गाड्या घेऊन जात मशीनगनद्वारे फायरिंग केली असती का?

उत्तर : हो कदाचित मी तसंच केलं असतं.

प्रश्न : अशा स्थितीत मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा अधिक असता?

उत्तर : हो. अशी स्थिती जरूर झाली असती.

प्रश्न : आम्ही असं समजायचं का तू लोकांवर गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत होतास?

उत्तर : मी सैनिकाच्या दृष्टीकोनातून त्यांच्या (भारतीय स्वातंत्र्यसैनिकांच्या) मनावर तीव्र परिणाम निर्माण करू इच्छित होतो.

प्रश्न : ही दहशत केवळ अमृतसरमध्ये की पूर्ण पंजाबमध्ये?

उत्तर : हो सर्व पंजाबमध्ये. मी त्यांचा आत्मविश्वास आणि मनोधैर्य मोडून काढू इच्छित होतो.

हे वाचा - अजबच आहे! या गावात जन्माला येतात फक्त मुली; वैज्ञानिकही झाले हैराण

यानंतर डायरने हंटर कमिशनच्या अहवालाविरोधात टिप्पणी केली होती. ब्रिटीश संसदेतही डायरची निंदा करण्यात आली. जालियनवाला बागेतील 379 लोकांच्या मृत्यूसाठी त्याला एकट्याला जबाबदार धरण्यात आलं. या घटनेत हजारो लोक जखमी झाले. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. परंतु त्यानं केलेलं कृत्य पाहता त्याला अगदीच किरकोळ शिक्षा देण्यात आली. परंतु तरीदेखील काही ब्रिटीश अधिकारी त्याला हिरो मानत होते. या घटनेनंतर भारतातील ब्रिटीश सत्तेच्या अंताची अगदी निर्णायक दृष्टीकोनातून सुरुवात झाल्याचं इतिहासकार मानतात. डायरने जे कृत्य केले ते लष्कराच्या नियमांनुसार नव्हतं असं काही ब्रिटीश इतिहासकारांनी देखील नंतर मान्य केलं.

मृत्यू कसा झाला

या नरसंहारानंतर 8 वर्षांनी डायरला ब्रेनस्ट्रोक आजार झाला. स्ट्रोकमुळे त्याला पॅरालिसीस झाला. या आजारामुळे तो बोलू शकत नव्हता. 27 जुलै 1927 ला ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू सॉमरसेट येथील कॉटेजमध्ये झाला. त्याने त्याच्या पश्चात मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी ठेवली होती. शेवटपर्यंत त्याने त्याच्या कृत्याचं समर्थनच केलं.

First published: April 13, 2021, 8:20 PM IST
Tags: Punjab

ताज्या बातम्या